-धनंजय कुलकर्णी, पुणे 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम

————————

Singer K. L. Saigal with Noor Jehan.Two contemporary great artists could never come together आज १८ जानेवारी. कुंदनलाल सैगल यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने एक आठवण!

हिंदी सिनेमा बोलायला लागला १९३१ सालच्या ’आलम आरा’ पासून. १९३५ च्या ’धूप छांव’ पासून पार्श्वगायनाचे तंत्र विकसित झाले असले तरी कुंदन लाल सैगल आणि नूरजहां यांनी पडद्यावर फक्त स्वत: साठीच गायन केले. चाळीसच्या दशकाच्या पूर्वार्धातील संपूर्ण कालखंड या दोन स्वरांनी व्यापून गेला होता. सैगल कलकत्त्याच्या न्यू थिएटरच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर आला. अवघं ४२ वर्षांचं आयुर्मान लाभलेल्या सैगलची रूपेरी कारकिर्द उणीपुरी पंधरा वर्षांची. शरतचंद्र यांच्या देवदासचा (बालम आओ बसो मेरे मन मे) तो नायक बनला १९३५ साली.

पुढे कलकत्त्यात राहून त्याने प्रेसीडेंट (इक बंगला बने न्यारा), स्ट्रीट सींगर (बाबुल मोरा नैहर छोटो भे जाये), दुष्मन (करू क्या आंस निरास भई), धरती माता (दुनिया रंगरंगीली बाबा), जिंदगी (सो जा राजकुमारी सो जा) हे चित्रपट केले. अभिनया पेक्षा त्याचा गाण्यावर अधिक जीव होता. प्रेक्षक सुध्दा त्याच्या गाण्याचे दिवाने होते. एव्हाना त्याच्या स्वराची डंका मुंबईत देखील वाजू लागली होती. १९४१ साली सैगल मुंबई आला व रणजित स्टुडिओच्या ’भक्त सूरदास’(निस दिन बरसत नैन हमारे) चा नायक बनला.

मुंबईत आल्यावर माय सिस्टर (दो नैना मतवारे हन्म पर जुलुम करे) ,तानसेन (बाग लगा दूं सजनी), शहाजहान (गम दिये मुश्तकील कितना नाजूक है दिल) या सिनेमांनी मोठी लोकप्रियता मिळविली. याच कालखंडाला समांतर अशी मलिका – ए-तरन्नूम नूरजहांची कारकिर्द होती. १९४२ साली ती प्राण सोबत ’खानदान’ (तू कौनसी बदली में मेरे चांद है आजा) पासून पडद्यावर नायिकेच्या रूपात आली. दोस्त (बदनाम मुहोब्बत कौन करे) जीनत (नाचो सितारो नाचो) गांव की गोरी(बैठी हूं तेरी याद का लेकर के सहारा) बडी मां (आ इंतजार है तेरा) जुगनू (हमे तो शाम ए गम मे काटनी हैं जिंदगी अपनी) अनमोल घडी (जवां है मुहोब्बत हंसी है जमाना). १९४५ साली सैगल आणि नूरजहां यांची रूपेरी कारकिर्द अगदी शिखरावर होती. मग विचार येतो या दोघांनी एकत्र एकही गाणं कां म्हटल नसेल? या दोन सुपरस्टार्सला घेवून सिनेमा बनवावा असं कुणालाच कसे वाटले नसेल?

या दोघांना एकत्र येण्याचा योग जुळून येणार होता. तशी तयारी पण सुरू झाली होती. नूरजहांचे पती निर्माते दिग्दर्शक शौकत हुसैन रिझवी यांच्या डोक्यात एक कथानक होते व त्या कथेवर ते या दोघांना घेवून एक सिनेमा बनविणार होते. मुस्लीम सोशल सिनेमाचे कथानक असलेली हि कहाणी लखनौ या नवाबी शहरात घडणार असते. सारी तयारी झाली होती पण सैगलची तब्येत आता त्याला साथ देत नव्हती. देशातील राजकीय वातावरण देखील तापले होते. १८ जानेवारी १९४७ ला सैगलचे निधन झाले व या सिनेमाच्या निर्मितीवर कायमचा पडदा पडला. दोन समकालीन ग्रेट कलावंत कधीच एकत्र नाही येवू शकले. पुढे फाळणी नंतर नूरजहां तिच्या पती सोबत पाकला निघून गेली. पुढे तब्बल १४ वर्षांनी गुरूदत्तने याच कथेवर एक सिनेमा बनविला जो सुपर हीट ठरला. सिनेमा होता ’चौदहवी का चांद’. जर सिनेमा पूर्वीच आला असता नूरजहां ’चौदहवी का चांद’ मधील नायिकेच्या रूपात दिसली असती! पण हा योग नव्हता. 

हिंदी चित्रपट संगीताच्या गोल्डन इरा काळातील दर्जेदार माहितीपूर्ण लेखांसाठी क्लिक करा 

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment