Ruperi Retro

‘नवरंग रूपेरी’- प्रवास तीन दशकांचा! 

‘नवरंग-रूपेरी  दीपोत्सव विशेषांक’ आता  “24×7”   ऑनलाईन वेबसाईट स्वरूपात वाचकांच्या सेवेत हजर झाली आहे  याचा सर्वांत जास्त आनंद मला होणे स्वाभाविक आहे. पुत्रप्राप्तीच्या वेदना माता समजू शकते व नंतर त्या मुलावर-मुलीवर मोठा होईपर्यंत जिवापाड प्रेम करीत असते, तसेच काही माझे नवरंग-रूपेरीसोबत नाते होय.

१९८६-८७ या वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा वृत्तपत्र विद्या विभागातून वृत्तपत्र पदवी घेतल्यानंतर स्थानिक दैनिकात लिखाण करीत वाटचाल सुरू केली. या प्रवासात एक दिवस श्री. धनंजय मांडाखलीवर आता त्यांचं बारसं धनंजय कुलकर्णी असं झालं आहे. त्यांनी दिवाळी अंकाची कल्पना सुचवली. दैनिक अजिंठा येथे बिनपगारी पूर्ण अधिकारी थाटात काम करताना, ‘रंग-रूपेरी’ दिवाळी अंकाची कल्पना सुरू झाली. त्यावेळी शाम डागा, सुधीर सेवेकर, किरण देशपांडे, अरविंद गं. वैद्य ही मंडळी सोबत होती.

विज्ञानवर्धिनी हायस्कूल येथे नोकरी करीत ‘रंग-रूपेरी’ दिवाळी अंकाचा कारभार सुरू झाला. अजिंठा येथे काम करीत असल्यामुळे नासिक येथील गावकरीचे दादासाहेब पोतनीस, अरविंद पोतनीस, वंदन पोतनीस, डॉ.रत्नाकर पंडित यांची मदत झाली. रसरंगच्या कलर स्कॅनिंगचा उपयोग करीत 1987 साली जयाप्रदाचा फोटो असलेला ‘रंग-रूपेरी’ दिवाळी अंकाची सुरूवात झाली. 70 पानाच्या या अंकाना धनंजय मांडाखलीकर, अरविंद वैद्य, शाम डागा, सुधीर सेवेकर, सुधाकर लिमकर, किरण देशपांडे, वि.ल.धारूरकर, रवींद्र जोशी यांचा सहभाग होता. मराठवाड्याच्या राजधानीत प्रथमच चित्रपटविषयक दिवाळी अंकाची सुरूवात एका सिनेपत्रकाराने केली. त्याचा प्रकाशन सोहळा डॉ. लक्ष्मण देशपांडे, डॉ. मोरेश्‍वर सावे, डॉ. सुधाकर पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. ३०० अंक विकले गेले व ७०० अंकाचे मोफत वाटप करण्यात आले. अंकाची किंमत रू. १५/- इतकी. आज महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागात उच्चपदी काम करीत असलेले श्री. अनिरूद्ध अष्टपुत्रे यांनी अंक विक्री करून मला मदत केली.

त्यानंतर १९८८ साली एकदम ऑफसेट अंक दिला व या अंकावर श्रीदेवीचा फोटो होता. पहिली काही वर्षे जयहिंद प्रिंटिंग प्रेसमध्ये अंकाची छपाई झाली. प्रगत तंत्रज्ञान झाले होते; परंतु आर्थिक प्रगती झाली नव्हती. त्यामुळे आपल्या बजेटमध्येच काम केले. श्रीदेवीनंतर भानुप्रिया, अश्‍विनी भावे, किशोरी शहाणे यांचे फोटो वापरण्यात आले. १९९२ साली दिल्ली येथील कार्यालयातर्फे रंग-रूपेरी दिवाळी अंकास नवरंग-रूपेरी हे टायटल मिळाले. याच वर्षी टी-सिरीजतर्फे प्रथमच माझ्या संगीत विशेषांकास अनुराधा पौडवाल यांची जाहिरात मिळाली. त्यावर्षी मात्र ऑफसेट छपाईचाा अंक रसिकांना देण्यात आला व ही परंपरा चालू आहे. १९९३ पासून वेगवेगळ्या विषयावर अंक काढण्यास सुरूवात झाली.

१९९३ साली प्रथमच नायक विशेषांक घेतला. अमिताभ बच्चनची छबी असलेला अंक रसिकांना आवडला, तर १९९४ साली माधुरी दीक्षितचा फोटो कव्हरसाठी वापरून नायिका विशेषांक देण्यात आला. त्यानंतर प्रेमकथा, जागतिक चित्रपटांची शंभरी, खानदान, दिग्गज, चित्रपटांतील सुपर हीटस, गायक, संगीतकार, गीतकार, विनोदी कलांवत असे अंक निघत राहिले. इ.स. २००१ पासून दिवाळी अंकाची धुरा चि. अजिंक्य उजळंबकर यांनी घेतल्यामुळे अंकाचा ‘लूक’ बदलत राहिला. अमिषा पटेलचा जरा ‘बोल्ड’ फोटो वापरल्याबद्दल घरीच कुटुंबाकडून हजेरी घेण्यात आली; परंतु बाहेरच्या जगात रसिकांना अंक आवडला. इ.स. २००३ मध्ये चमत्कारच झाला. ‘मैं तो प्रेम की दिवानी’ ही चित्रपट प्रदर्शित झाला व हृतिक रोशन, करिना कपूर व अभिषेक बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या माहितीकरिता मी मुंबईत राजश्रीचे दार ठोठावले. त्यांच्या कार्यालयातून करिनाचा फोटो मिळवून अंक तयार करण्यात आला व त्याच वर्षी आमच्या अंकाला पुणे येथील विद्यारत्न प्रतिष्ठानतर्फे उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार मिळाला. चित्रपटविषयक अंकाला पुरस्कार ही बाब जरा हटकेच होती; परंतु आम्ही तो करून दाखविला.

२००४ साली मिळालेल्या या पुरस्कारामुळे आमची जिद्द वाढली. आम्हाला प्रेरणा मिळाली. त्यानंतर आजपर्यंत सतत पुरस्कार मिळत आहेत. २०१० साली महाराष्ट्र राज्य मुद्रण परिषदेचा उत्कृष्ट छपाईचा पुरस्कार आम्हाला मिळाला. प्रिंटवेल यांना तो देण्यात आला. के.एल. सहगलची जन्मशताब्दी, रफीच्या मृत्यूची २५ वर्षे, लता मंगेशकर ८१ व्या वर्षात पदार्पण, हिंदी चित्रपटसृष्टीची ७५ वर्षे, मराठी चित्रपटसस्रष्टीची ७५ वर्षे, हिंदी चित्रपटातील नवीन प्रवाह, शैलेंद्रच्या आठवणी, अमीन सायानी, रेडिओ सिलोनच्या आठवणी, असे असंख्य विषय गेल्या दहा वर्षात आम्ही रसिकांना दिले. चित्रपटाच्या अंकाला साहित्यिक दर्जा देण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही केला. ‘रसरंग’ चे संपादक व चित्रपषट पत्रकारितेचे महागुरू इसाक मुजावर यांना आम्ही विनंती केली व त्यांनी आमच्याकडे लिखाण सुरू केले.

या प्रवासात औरंगाबाद येथे राहून असंख्य पत्रकार मित्र मिळत गेले. त्यापैकी सुभाष जाधव, शशिकांत किणीकर, द्वारकानाथ संझगिरी, वसंत भालेकर, कमलाकर नाडकर्णी, शाम डागा, अजित प्रधान पद्माकर पाठकजी, सुलभा तेरणीकर, कैलास झोडगे, दिलीप ठाकूर, हर्षदा वेदपाठक, शांताराम मंकीकर, प्रल्हाद अवरूसकर, सदानंद गोखले, सुभाष भुरके, प्रकाश कामत, बंडो यज्ञोपवित, वि.भा. देशपांडे, प्रवीण दवणे, चंद्रशेखर जोशी, मधू पोतदार, कवी पीटरजॉन, यु.म. पठाण, अभय परांजपे, मंगला खाडीलकर, सुरेश चांदवणकर अशी लेखक मंडळी सहकार्य करीत राहिली. आजही नवी पिढी तयार होत आहे. मुंबई, पुणे येथील नवीन लेखक मंडळी आता ‘नवरंग-रूपेरी’ च्या टीममध्ये दाखल झाल्यामुळे अंक नवा-जुना असा झाला आहे. नवी पत्रकार मंडळी आपले गुणगान गात आहेत, तर माझे माझ्या काळातील मित्र आपला बाजा वाजवणे चालू ठेवीत आहेत. आम्ही आता नव्या-जुन्यांना घेऊन पंचवीस वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. धनंजय कुलकर्णी (मांडाखलीकर) पहिल्या अंकापासून सातत्याने लिहीत आहेत. विजय पाडळकर, प्रदीप भिडे (अतिस्थि संपादक) यांची मोलाची साथ मिळाली आहे.

या कामात छपाईच्य बाबतीत मला सर्वप्रथम दै. गावकरीचा पोतनीस परिवार म्हणजे आजोबा दादासाहेब, सुपुत्र अरविंदराव, त्यांचे सुपुत्र वंदनराव पोतनीस यांची खूपच मदत मिळाली. त्यानंतर जयहिंद प्रिटिंग प्रेस, स्कायलाईन प्रिटिंग प्रेस, प्रतीक ऑफसेट, सानिया ऑफसेट यांचे सहकार्य मिळाले. विनायक भाले, श्रीकांत कुलकर्णी, प्रमोद परदेशी, विजय न्यायधिश, अन्वर, नितीन अलकरी, सौ. वैशाली अलकरी, संजय बनसोडे, गोविंद भावसार यांची मदत मिळाली. मा.खा. मोरेश्‍वर सावे यांचा परिवार शुभारंभापासून मला पाठिंबा देत आहे. औरंगाबाद शहरातील चित्रपटगृहाचे संचालक, व्यवस्थापक, मल्टिप्लेक्सचे व्यवस्थापन यांचे सहकार्य मिळाले. माझी पत्नी सौ. हेमा उजळंबकर सतत पाठराखण करीत आहे. २००५ पासून ही धुरा माझा मुलगा अजिंक्य उजळंबकर यांच्याकडे गेली आहे.  कै. सुखराम हिवराळे, कै. सुधाकर पवार, डॉ. रत्नाकर पंडित, डॉ. वि. ल. धारुरकर, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. सुरेश पुरी यांचा हा अंक तीस वर्षे सातत्याने सुरु राहण्यात सिंहाचा वाटा आहे. या प्रवासात अनेक चित्रपटविषयक अंक सुरू झाले व बंद झाले; परंतु केवळ दिवाळी अंक काढणे एवढे एकच स्वप्न मी पाहिले व त्याकरिता दिवस-रात्र मेहनत घेतली. आजही केवळ ‘नवरंग-रूपेरी’ हा केवळ एकच ध्यास असतो.

आता ऑनलाइनचा जमाना आहे. म्हणून नवरंग रुपेरी आता एका पूर्णवेळ वेबसाईटच्या रूपात सिनेरसिकांच्या सेवेत उपलब्ध करून देत आहोत. ही वेबसाईट म्हणजे हिंदी/मराठी चित्रपट, रंगभूमी, दूरदर्शन, ओटीटी आदी सर्व करमणूक माध्यमांविषयी मराठी भाषेतून भाष्य करणारी वेबसाईट आहे. यात रसिकांना जुन्या-नव्या चित्रपटांविषयीचे, रंगभूमीविषयीचे दर्जेदार लेख, सिनेमा परीक्षण, मुलाखती, नवीनतम ताज्या घडामोडींविषयीच्या बातम्या इत्यादी सर्व काही उपलब्ध आहे. नवरंग रुपेरीच्या फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम व यु-ट्यूब वरील अधिकृत अकाउंट्सला फॉलो करण्यासाठीच्या लिंक्स सुद्धा इथे उपलब्ध आहेत. तिथे भेट देऊन लाईक/फॉलो/सबस्क्राईब वर क्लिक केल्यास वेबसाईटवरील सर्व लेखांची लिंक आपणास आपल्या फेसबुक/ट्वीटर वर सुद्धा उपलब्ध होईल. शिवाय यु-ट्यूब च्या अकाउंटला सबस्क्राईब केल्यास सर्व व्हिडीओज आपण बघू शकाल. सर्व प्रकारची माहिती लवकरात लवकर वाचकांपर्यंत पोहोचावी असा आमचा प्रयत्न नेहमीच असणार आहे. शिवाय नवरंग रुपेरीच्या पूर्व इतिहासाला अनुसरून जास्तीत जास्त दर्जेदार लेख देण्याचा आमचा भविष्यात प्रयत्न असेल. त्याकरिता मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद व महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये असलेल्या आमच्या लेखकांची मदत याकरिता पूर्वीप्रमाणेच यापुढेही होणार आहे याची मला खात्री आहे.

राज कपूरच्या जोकरप्रमाणे ‘कल खेल में हम हो ना हो, गर्दीश में तारे रहेंगे सदा। भुलोगे तुम, भुलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा॥’ इतकंच मी म्हणू शकतो. या माझ्या दीपोत्सव विशेषांकाची वेबसाईट पाहण्याचे भाग्य मला ईश्‍वराने दिले. तुमच्या शुभेच्छा तर राहणार आहेतच. रसिकहो, मराठवाड्याच्या मातीतील हा सिनेपत्रकारितेचा सुगंध आता जगभर दरवळत राहील यातच मी आनंदी आहे.

– अशोक उजळंबकर

संस्थापक संपादक, नवरंग रूपेरी

Our Journey

1987

नवरंग रुपेरी च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन करतांना वऱ्हाडकार लक्ष्मण देशंपांडे

नवरंग रुपेरी च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन करतांना वऱ्हाडकार लक्ष्मण देशंपांडे

1988

नवरंग रुपेरी च्या दुसऱ्या अंकाचे प्रकाशन करतांना साहित्यिक कवी फ.मु. शिंदे

नवरंग रुपेरी च्या दुसऱ्या अंकाचे प्रकाशन करतांना साहित्यिक कवी फ.मु. शिंदे

1992

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना पंडित नाथराव नेरळकर, सोबत गोपाळ साक्रीकर, वि.ल. धारूरकर, अरविंद वैद्य

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना पंडित नाथराव नेरळकर, सोबत गोपाळ साक्रीकर, वि.ल. धारूरकर, अरविंद वैद्य

1993

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना यशवंत देशमुख, सोबत श्याम डागा, सदानंद पांडे व अरविंद वैद्य

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना यशवंत देशमुख, सोबत श्याम डागा, सदानंद पांडे व अरविंद वैद्य

1994

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना लोकमत समूहाचे राजेंद्र दर्डा

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना लोकमत समूहाचे राजेंद्र दर्डा

1996

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना औरंगाबादचे तत्कालीन पोलीस आयुक्त उल्हास जोशी, सोबत साहित्यिक वसंत कुंभोजकर

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना औरंगाबादचे तत्कालीन पोलीस आयुक्त उल्हास जोशी, सोबत साहित्यिक वसंत कुंभोजकर

1997

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना साहित्यिक रा. रं. बोराडे

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना साहित्यिक रा. रं. बोराडे

1998

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना औरंगाबादचे तत्कालीन पोलीस आयुक्त श्रीपाद कुलकर्णी, श्री.दि. इनामदार व अरविंद वैद्य

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना औरंगाबादचे तत्कालीन पोलीस आयुक्त श्रीपाद कुलकर्णी, श्री.दि. इनामदार व अरविंद वैद्य

2000

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना रोटेरिअन लक्ष्मण पेठे, नंदकुमार मुळे व अरविंद वैद्य

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना रोटेरिअन लक्ष्मण पेठे, नंदकुमार मुळे व अरविंद वैद्य

2001

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना शायर बशर नवाज, जनता सहकारी बँकेचे अभय बापट, उद्योजक प्रकाश मालखरे

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना शायर बशर नवाज, जनता सहकारी बँकेचे अभय बापट, उद्योजक प्रकाश मालखरे

2002

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना नाटककार दिलीप घारे, सोबत रोटरीचे माजी प्रांतपाल प्रफुल्ल मिरजगावकर

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना नाटककार दिलीप घारे, सोबत रोटरीचे माजी प्रांतपाल प्रफुल्ल मिरजगावकर

2003

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना साहित्यिका व रंगकर्मी अनुया दळवी, ऍडव्होकेट नरहरी काकडे

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना साहित्यिका व रंगकर्मी अनुया दळवी, ऍडव्होकेट नरहरी काकडे

2005

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना औरंगाबादचे तत्कालीन पोलीस आयुक्त उद्धव कांबळे, प्रदीप कुलकर्णी

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना औरंगाबादचे तत्कालीन पोलीस आयुक्त उद्धव कांबळे, प्रदीप कुलकर्णी

2007

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना ग्रंथालय सहाय्यक संचालक श्री मुंडे, विजय न्यायाधीश व प्रकाश नाईक

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना ग्रंथालय सहाय्यक संचालक श्री मुंडे, विजय न्यायाधीश व प्रकाश नाईक

2008

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना आयुक्त श्री मुगळीकर, निवासी जिल्हाधिकारी शेळके

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना आयुक्त श्री मुगळीकर, निवासी जिल्हाधिकारी शेळके

2009

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना प्रख्यात गायिका सौ आशालता करलगीकर व श्री करलगीकर

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना प्रख्यात गायिका सौ आशालता करलगीकर व श्री करलगीकर

2010

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना स्टेट बँक ऑफ हैदराबादचे तत्कालीन महाप्रबंधक अजॉय नकीब , सोबत डॉ नंदकुमार उकडगावकर, सुनील कस्तुरे आदी

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना स्टेट बँक ऑफ हैदराबादचे तत्कालीन महाप्रबंधक अजॉय नकीब , सोबत डॉ नंदकुमार उकडगावकर, सुनील कस्तुरे आदी

2011

नवरंग रुपेरी च्या रौप्यमहोत्सवी अंकाचे प्रकाशन करतांना मा मंत्री एकनाथ खडसे, आमदार शेख, उपमहापौर प्रशांत देसरडा, आमदार श्रीकांत जोशी

नवरंग रुपेरी च्या रौप्यमहोत्सवी अंकाचे प्रकाशन करतांना मा मंत्री एकनाथ खडसे, आमदार शेख, उपमहापौर प्रशांत देसरडा, आमदार श्रीकांत जोशी

2011

नवरंग रुपेरी च्या रौप्यमहोत्सवी अंकाचे मुंबईत प्रकाशन करतांना ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा, प्रदीप भिडे, पूजा सामंत, दिवाकर गंधे आदी

नवरंग रुपेरी च्या रौप्यमहोत्सवी अंकाचे मुंबईत प्रकाशन करतांना ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा, प्रदीप भिडे, पूजा सामंत, दिवाकर गंधे आदी

2011

नवरंग रुपेरी च्या रौप्यमहोत्सवी अंकाचे पुण्यात प्रकाशन करतांना दिग्दर्शक गुरुदत्त यांचे चिरंजीव अरुण दत्त, सोबत कृपाशंकर शर्मा व धनंजय कुलकर्णी

नवरंग रुपेरी च्या रौप्यमहोत्सवी अंकाचे पुण्यात प्रकाशन करतांना दिग्दर्शक गुरुदत्त यांचे चिरंजीव अरुण दत्त, सोबत कृपाशंकर शर्मा व धनंजय कुलकर्णी

2013

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना इनॉक डॅनियल्स, सोबत विलासदत्त राऊत, श्रीकांत कुलकर्णी, मधू पोतदार, नारायण फडके, कृपाशंकर शर्मा, डॉ प्रकाश कामत, धनंजय कुलकर्णी व अनिल पेंडसे

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना इनॉक डॅनियल्स, सोबत विलासदत्त राऊत, श्रीकांत कुलकर्णी, मधू पोतदार, नारायण फडके, कृपाशंकर शर्मा, डॉ प्रकाश कामत, धनंजय कुलकर्णी व अनिल पेंडसे

2015

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना लीला गांधी , सोबत विजय न्यायाधीश व धनंजय कुलकर्णी

नवरंग रुपेरी च्या अंकाचे प्रकाशन करतांना लीला गांधी , सोबत विजय न्यायाधीश व धनंजय कुलकर्णी

नवरंग रुपेरी दिवाळी अंक पुरस्कार

 • विद्यारत्न प्रतिष्ठान, पुणे – २००३
 • शब्दसागर उद्योगवेध, पुणे – २००४
 • उद्योगवेध, पुणे – २००५,२००६, २००९, २०१०, २०१२
 • रोटरी क्लब, पुणे पर्वती लोकमान्य नगर – २००५, २००६, २००७, २००८, २००९, २०१०,२०११, २०१२, २०१३
 • साहित्य विचार मंथन, कल्याण – २००६, २००७, २००८, २००९, २०१०
 • संत बहिणाबाई प्रतिष्ठान, ठाणे -२००७
 • साहित्य दरवळ मंच, दादर – २००८
 • अक्षररंग व्यासपीठ, कल्याण – २०१०, २०११, २०१२, २०१३
 • नीलनन्दा फाउंडेशन, अंधेरी, मुंबई -२०१०, २०११, २०१२, २०१३
 • महाराष्ट्र राज्य मुद्रक संघाचा उत्कृष्ट छपाईचा तिसरा पुरस्कार -२०१०
 • मराठी वृत्तपत्र लेखक संघ पुरस्कार – २०११
 • करवीर काशी फाउंडेशन, कोल्हापूर, उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार – २०१३
 • पत्र सारांश, इंदोर तर्फे  उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार – २०१३

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.