– © विवेक पुणतांबेकर

३ नोव्हेंबर १९०६ ला पंजाब प्रांतातल्या ल्यालपूर जिल्ह्यातल्या समुंद्री गावातल्या खत्री कुटुंबात पृथ्वीराज जन्मले. त्यांचे वडिल दिवाण बसेश्वर पेशावर शहरात पोलिस अधिकारी होते. त्यांचे आजोबा केशवमल कपूर समुंद्री गावाचे तहसिलदार होते. शालेय शिक्षण संपवून पेशावर च्या एडवर्ड महाविद्यालयातून कायद्याची पदवी पृथ्वीराज नी मिळलली खरी पण पहिल्यापासून त्यांचा ओढा अभिनयाकडे होता. पेशावर, ल्यालपूर येथे नाटकात भूमिका त्यांनी केल्या होत्या.एके दिवशी अात्याकडून उसने पैसे घेऊन ते मुंबईला अर्देशिर इराणी यांच्या इंपेरियल फिल्म कंपनीत दाखल झाले. दो धारी तलवार या मूकपटात छोटासा रोल त्यांना मिळाला. यानंतर प्रमुख भुमिकेत त्यांना काम मिळू लागले. नऊ मूकपटात भुमिका केल्यावर ‘आलम आरा’ या पहिल्या भारतीय बोलपटात पृथ्वीराज नी सहाय्यक भुमिका केली.यानंतर विद्यापती सिनेमातली त्यांची भुमिका गाजली. यानंतर सोहराब मोदी यांच्या ‘सिकंदर’ सिनेमातल्या भुमिकेने पृथ्वीराज एकदम प्रसिध्द झाले. रंगमंचाची ओढ होतीच. त्यामुळे ग्रॅन्ट अंडरसन थिएटर या इंग्रजी नाटक कंपनीत ते दाखल झाले. रंगमंच आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात पृथ्वीराज आपले अभिनय कौशल्य दाखवत राहीले. १९४४ साली त्यांनी स्वतःची पृथ्वी थिएटर्स ही नाट्यसंस्था स्थापन केली. त्यांच्या नाटके देशभक्तीभर आणि प्रेरणा दायक असत. सलग १६ वर्षे अस्तित्वात असलेल्या या संस्थेने नाटकांचे २६५२ खेळ केले. या सगळ्या नाटकात प्रमुख भुमिकेत असत पृथ्वीराज. त्यांचे अतिशय गाजलेले नाटक होते पठाण. १३ एप्रिल १९४७ साली रंगमंचावर आलेल्या या नाटकाचे ६०० प्रयोग झाले. हा त्यावेळचा हा विक्रम होता. ©

 

त्यांचा खर्ज्यातला दमदार खणखणीत आवाज ज्याला मायक्रोफोन ची पण गरज लागत नसे. नाटकाला तिकीटे नसत. मात्र शेवटी स्वतः पृथ्वीराज झोळी फिरवत व प्रेक्षकांना आवाहन करत.प्रेक्षक स्वखुशीने देणगी देत असत. या नाट्यसंस्थेत अनेक गुणी कलाकार होते. राज , शम्मी, शशी तर होतेच पण सप्रू, हेमवती जयराज संगीतकार राम गांगुली, त्यांचे सहाय्यक शंकर सिंग रघुवंशी व जयकिशन पांचाळ, दत्ताराम वाडकर, इक्बाल हुसैन (हसरत जयपुरी) असे अनेक गुणी कलावंत हुडकून आपल्या जवळ बाळगले होते. ५० च्या दशकाचा कालखंड नाटक कंपन्यांसाठी खडतर होता. ठिकठिकाणी मिळणारा राजाश्रय बंद झाला. पन्नास साठ जणांचे कुटुंब बरोबर घेऊन देशभर दौरे करणे कठिण होत चालले. अनेक कलावंत , संगीतकारांनी सिनेविश्वाची वाट धरली.एकदा पठाण नाटकाच्या वेळी त्यांचा आवाज बसला.त्यांनी प्रेक्षकांची माफी मागितली. प्रेक्षक सांगू लागले तुमचा आवाज नसला तरी चालेल. आम्हाला तुमचा अभिनय पहायचा आहे.कसातरी नाटकाचा प्रयोग केला आणि आपली नाटक कंपनी बंद केली. सिनेमातल्या अभिनयावर लक्ष्य केंद्रीत केले. ©

वयाच्या सतराव्या वर्षी रामसरणी मेहरा उर्फ रमादेवी यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. रमादेवींना गाण्याची अतिशय आवड होती. आवाज छान होता.पंजाबी लोकगीते त्या छान म्हणत. राजकपूरकडे संगीताचा वारसा रमादेवींकडून आला. या दांपत्याला राज,देवींदर,रविनदर,शम्मी शमी ही मुले आणि उर्मिला ही मुलगी अशी सहा अपत्ये होती. यातला देवींदर न्यूमोनियाने गेला आणि रविनदर काही दिवसातच उंदराचे विष चूकून खाल्यामुळे गेला. आधी गिरगावात रहाणारे पृथ्वीराज नंतर माटुंगा येथे मसानी लेन मध्ये रहायला गेले. आपल्या मुलांनी शिकावे अशी त्यांची इच्छा होती. पण सगळ्यांनी अभिनयाची वाट पकडली.पृथ्वी थिएटर्स मध्ये पडेल ती कामे करत अभिनय करत राज,शम्मी आणि शशी घडले. राजकपूर सिनेमात आले तेव्हा तर चंदुलाल शहा कडे बिनापगारी हरकाम्या म्हणून नोकरीला राहीले. तशीच अट पृथ्वीराजनी चंदुलाल शहा ला घातली. यातूनच राजकपूर घडले आणि मोठे झाले. अनेक सिनेमात पृथ्वीराज नी कामे केली पण सगळ्यात लक्ष्यात राहिलेली भुमिका मुगले आझम मधल्या अकबराची. ही भुमिका ते अक्षरशः जगले. शाॅट द्यायच्या आधी बराच वेळ स्वस्थ बसून जो पर्यत पूर्ण समरस होत नसत कॅमेरा समोर जात नसत. अजमेर दर्ग्यातले चित्रण करताना भर उन्हात अनवाणी चालण्याचा शाॅट देताना पाय भाजून फोड आले तरी जिद्दीने शाॅट दिला. ©

आवाराच्या वेळी राजकपूर बरोबर काम करायला साशंक असलेले पृथ्वीराज ‘कल आज और कल’ च्या वेळी नातवाबरोबर रणधीरकपूर बरोबर काम करायला तयार झाले. चेनस्मोकर पृथ्वीराज कॅन्सर शी झुंज देत होते. अंगात ताप असतानाही नातवाचा सिनेमा पुरा झाला पाहिजे या भावनेने झपाटलेले होते. पौराणिक सिनेमात पण आपला ठसा ते उमटवून गेले. मराठी नाटकांवर विलक्षण प्रेम करणारे पृथ्वीराज मराठी नाटके आवर्जून पहायला येत. कथा आवडली तर कसलेही आढेवेढे न घेता भुमिका स्वीकारत. त्यांच्या चार पिढ्या चित्रपटसृष्टी गाजवत आहेत. खर्‍या अर्थाने अभिनयाची परंपरा चालत राहिली. संगीत नाटक अॅकॅडमी त्यांना ने दोनदा पुरस्कार दिला. भारत सरकार ने ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन १९६९ साली त्यांचा सन्मान केला. शेवटच्या कालखंडात अतिशय त्रास होत असतानाही निर्मात्यांचे नुकसान होऊ नये म्हणून जिद्दीने काम करत राहीले. ‘तीन बहुरानीयां’ च्या वेळी त्यांचा आवाज बिपिन पाल ने डब केला. ©

शेवटी टाटा हाॅस्पिटल मध्ये अॅडमिट केल्यावर सोहराब मोदीं बरोबर त्यांनी रमादेवींना निरोप पाठवला अब पृथ्वी वापस आनेवाला नही. रमादेवींनी निरोप पाठवला मै भी आपके पीछे आ रही हूं. दहा दिवसातच रमादेवी गेल्या. पृथ्वीराजना अवघे ६५ वर्षाचे आयुष्य लाभले.

अश्या या महान अभिनेत्याला माझी आदरांजली.

 

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment