-धनंजय कुलकर्णी

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Remembering finest Actor of Hindi Cinema Farooq Sheikh भारतीय सिनेमातील नायकाची चिरपरीचित असलेली साचेबध्द चौकट तोडणारा अभिनेता म्हणून फारूख शेख यांचे वर्णन करावे लागेल. कारण तोवर नायकाची पडद्यावरची इमेज ही एकतर रोमॅंटीक असायची किंवा रिव्होल्यूशनरी असायची. म्हणजेचं प्रेम करणं अथवा बंड करणं अशा ठाशीव साच्याची प्रतिमा ठरलेली असायची. प्रेक्षक देखील समजूतदारपणे अशाच अदाकरीला स्विकारायचे.

या ट्रॅडीशनल वॉल ला धडका देणारा काही फारूख पहिलाच अभिनेता नव्हता. मोतीलाल, बलराज सहानी, संजीव कुमार हे कलावंत त्या अर्थाने बंडखोर होते. त्या मानाने  फारूख शेख सुदैवी म्हटला पाहीजे कारण त्याचा रूपेरी पडद्यावर उदय झाला सत्तरच्या दशकात. तो वर समांतर सिनेमा इथे दाखल झाला होता. त्याचा प्रेक्षक वर्ग देखील तयार होत होता. मेन स्ट्रीम मध्ये देखील सकारात्मक बदलांचे वारे वाहू लागले होते. कमर्शियल सिनेमा आणि पॅरलल सिनेमा या पेक्षा वेगळा असा  ’मध्यम वर्गीय’ सिनेमा देखील ( जो प्रामुख्याने ऋषिकेश मुखर्जी, बासू चटर्जी, सई परांजपे करीत होते) बाळसे धरू लागला होता.

नेमक्या याच स्थित्यंतराच्या वेळी फारूख शेख दाखल झाला होता. आज तो गेल्या नंतर आपण त्याच्या चित्र कारकिर्दीचं विश्लेषण करताना आपल्याला दिसतं, फारूख ने भलेही फार मोठ्ठ यश मिळविले नसेल, भले त्याचा मोठा फॅन फॉलोअर नसेल पण जेवढं काम करायला त्याला मिळालं त्याचं सोनं करून दाखवलं! एम एस सथ्थू यांच्या गाजलेल्या ’गर्म हवा ’ (१९७३) या सिनेमातून त्याचा रूपेरी प्रवेश झाला. त्या वेळी त्याचे वय २५ होते. (जन्म २५ मार्च १९४८)

सत्यजित रे यांनी आपल्या ’शतरंज के खिलाडी’ करीता त्याला निवडलं. १९७८ साली त्याचा महत्व पूर्ण सिनेमा आला ’गमन’ मुज्जफर अली या सिनेमाचे दिग्दर्शक होते. शहरीयार यांची गाणी जयदेव यांनी संगीतबध्द केली. सीने मे जलन ,  आपकी याद आती रही रात भर ही गाणी जाणकारांना आवडली गेली. त्याला पहीली फुल लेन्थ भूमिका मिळाली चोप्रांच्या नूरी या सिनेमात. ही चोप्रांची म्युझिकल लव्ह स्टोरी होती. तो नेहमी चांगल्या स्क्रिप्ट च्या शोधात राहिला. मुज्जफर अली यांनीच त्याला ’उमराव जान’ (१९८१) करीता साईन केलं. सई परांजपे यांच्या ’चश्मे बद्दूर ’ (१९८२) मध्ये पहिल्यांदा त्याची नॉन मुस्लिम भूमिका गाजली. यातील त्याने रंगविलेला ’ सिध्दार्थ पाराशर’ सर्वार्थाने वेगळा होता.

अभिनयाच्या सेकंड इनिंग मध्ये तो टी व्ही कडे वळाला. ’जीना इसिका नाम है’ हा त्याचा शो खूप गाजला. मूळात तो रंगभूमीवरील कलाकार असल्याने त्याच्या अभिनयात नैसर्गिक जिवंतपणा होता. त्याचा पिंड डाव्या विचारसरणीचा असल्याने इप्टा शी तो निगडीत होता. रूपा जैन या त्याच्या मैत्रीणी सोबत त्याचा तो प्रेम विवाह होता. एक शांत आयुष्य तो जगला… आणि कुणालाही न सांगता, भारतापासून दूर दुबई त २८ डिसेंबर २०१३ ला तो अल्ला ला प्यारा झाला.

हिंदी सिनेमाच्या १९७० व ८० च्या दशकातील अनेक दर्जेदार लेखांसाठी क्लिक करा 

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment