भारतीय चित्रपटसृष्टी महाराष्ट्राच्या या दोन व्यक्तींची कायम ऋणी राहील. जसे दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते तसेच बाबुराव पेंटर (KalaMaharshi Baburao Painter) यांना चित्रपटांच्या पोस्टर्सचे जनक मानले जाते. आज बाबुराव पेंटर यांचा जन्मदिन. बाबुराव मेस्त्री (Baburao Mestri) हे त्यांचे मूळ नाव व कोल्हापूर हे मूळ गाव. १८९० चा जन्म. वडील सुतारकाम, लोहारकाम करीत व त्यांच्याकडूनच शिल्पकला, हस्तिदंती, कोरीवकाम, यंत्रविद्या  व चित्रकला यांचे शिक्षण बाबुरावांना मिळाले. (Kalamaharshi Baburao Painter, who made an invaluable contribution to the foundation of Indian cinema)

नटवर्य केशवराव भोसले यांनी बाबुराव बाबुरावांचे मावस भाऊ आनंदराव यांना नाटकाचे पडदे रंगवायला मुंबईत बोलावले. मुंबईत या दोघा बंधूंनी अनेक मूकपट पाहून आपणही मूकपट काढायचा असे ठरविले. दादा मेस्त्री यांच्या साहाय्याने लेथ मशीनवर स्वदेशी बनावटीचा कॅमेरा तयार करायला बाबुरावांना दोन वर्षे लागली. कॅमेरा सज्ज झाल्यावर भांडवलाचा प्रश्न गायिका तानीबाई कागलकर यांच्याकडून मिळालेल्या अर्थसाहाय्याने सुटला. १० डिसेंबर १९१७ रोजी बाबुरावांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. 

Baburao Painter with his self-made ‘Swadeshi’ camera in Kolhapur, pc_ author’s collection___583x480
Baburao Painter with his self-made ‘Swadeshi’ camera in Kolhapur, pc_ author’s collection

१९२० ते १९५१ दरम्यान बाबुरावांनी बऱ्याच चित्रपटांचे दिग्दर्शन व कला दिग्दर्शनही केले होते. भक्त दामाजी, सिंहगड, मायाबाजार, कल्याण खजिना, सती पद्मिनी, श्रीकृष्णावतार, सती पद्मिनी, सावकारी पाशा असे ऐतिहासिक, पौराणिक व सामाजिक मूकपट बाबुरावांनी दिले. कलाक्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना कलामहर्षी या पदवीने गौरविण्यात आले. मध्यंतरी ज्येष्ठ सिनेअभ्यासक व बाबुरावांप्रमाणेच चित्रकलेत प्राविण्य मिळवलेले श्रीकांत धोंगडे सरांच्या ‘राहून गेलेल्या आठवणी’ पुस्तकात बाबुरावांबद्दल एक दुर्मिळ किस्सा वाचण्यात आला.

तो असा-

कलामहर्षी बाबुराव पेंटर यांनी ह.ना. आपटे यांच्या ‘गड आला पण सिंह गेला’ या कादंबरीवर आधारित ‘सिंहगड’ हा ऐतिहासिक चित्रपट काढला. आपल्याकडे चित्रपटाची सर्वप्रथम जाहिरात बाबुराव पेंटर यांनी १९२३ मध्ये ‘सिंहगड’ या चित्रपटासाठी केली होती. चांगले चित्रपट काढणं पुरेसे नाही, त्यांच्याकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधणं, त्यांची पावलं आपल्या चित्रपटांकडे वळवणं तेवढेच महत्वाचे आहे याची जाण बाबुराव पेंटर यांना होती. चित्रपटाचं कथासार, छायाचित्र यांचा वापर करून सुरुवातीपासून त्यांनी चित्रपटाच्या आकर्षक पुस्तिका काढल्या होत्या. ‘सिंहगड’ साठी त्यांनी उत्कृष्ट पोस्टर्स बनवले. मुंबईतील नॉव्हेल्टी सिनेमावर ते लागले. ‘जे. जे. स्कुल ऑफ आर्ट’ चे प्रिन्सिपल सॉलोमन ती पोस्टर्स पाहून खुश झाले. ती पोस्टर्स पाहण्यासाठी म्हणून त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना पाठवलं. बाबुरावांना शाळेत बोलावून त्यांचा सत्कार केला.

आज त्यांच्या जन्मदिनी या महान कलाकारास विनम्र अभिवादन.

  • नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा अनोखा कानमंत्र
  • Subhedar Movie Review सुभेदार
  • Rukmini Maitra will play the central role of "Draupadi", directed by Ram Kamal Mukherjee
    रुक्मिणी मैत्रा साकरणार "द्रौपदी"ची मध्यवर्ती भूमिका, राम कमल मुखर्जी करणार दिग्दर्शन
  • Kshitee Jog in Rocky Aur Rani Kii Prem Kahaani
    'रॉकी और रानी की प्रेम कहानी'त काम करण्याचा अनुभव विलक्षण- क्षिती जोग
Hema Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment