-अशोक उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम

————————

Revisiting some of the Greatest Songs sung by singer Lata Mangeshkar. अवघ्या विश्‍वाला मोहिनी घालण्याची, मंत्रमुग्ध करण्याची जबरदस्त शक्ती असणारे सप्ताक्षरी नाव म्हणजेच लता मंगेशकर. लताचं गाणं म्हणजे सप्तसुरांचे जणू इंद्रधनुष्यच. भारतीय चित्रपट संगीत समृद्ध करण्याचं सारं श्रेय लताकडेच जातं. गीतकाराच्या शब्दांचं आणि संगीतकाराच्या स्वरांचं मोल वाढवलं ते लतानेच. एके काळी राजवाड्यापुरतं मर्यादित असलेलं अस्सल रागदारी संगीत सामान्यापर्यंत पोहचविण्याचं काम करणारी तसेच पार्श्‍वगायकांना मानाचं स्थान मिळवून देणारी ही एकमेव गायिका. भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांतून अश्रू काढण्याचं सामर्थ्य असलेला हा आवाज इंग्लंडच्या राणीला आकर्षित करू शकतो व त्या राणीला तिच्यासोबत वेळ घालविण्याचा आनंद मिळवून देतो. लताचं कर्तृत्व एवढं उदंड आहे की, तिच्याबाबत पुढील काळात अनेक ग्रंथ लिहिले जातील. भारतीय स्वातंत्र्यानंतर लंडनच्या रॉयल आल्बर्ट हॉलमध्ये गायनाची संधी मिळवून सलग चार दिवस आपल्या गळ्याचा चमत्कार दाखवून इतिहास निर्माण करणारी अशी ही एकमेव गायिका.

      मराठी रंगभूमीचे तेजस्वी सूर्य मास्टर दीनानाथ यांना 24 एप्रिल 1942 रोजी देवाज्ञा झाली तेव्हा चार भावंडं व आई यांचा सारा भार आपल्या खांद्यावर उचलणारी अवघी तेरा वर्षांची ही लता. वडिलांनी मरतेसमयी दिलेल्या आशीर्वादाच्या जोरावर तिने पुढे इतिहास घडविला. अफाट कष्ट, परिश्रम, मानहानी सहन करीत तिने आपल्या गळ्याच्या जोरावर 1947 मध्ये पार्श्‍वगायन क्षेत्रात पहिलं-वहिलं पाऊल ठेवलं. 1947 पासून सर्वच संगीतकारांनी या आवाजाचा पुरेपूर उपयोग करून घेऊन हिंदी चित्रपटांतून एकापेक्षा एक सुरेल रचना दिल्या आहेत. अपवाद आहे तो फक्त ओ. पी. नय्यर यांचा. लताच्या आवाजात अनेक संगीतकारांची जणू चांदीच झाली. लताचा आवाज विविध नायिकांना कसा फिट्ट बसतो याच उदाहरणच घ्यायचं झालं तर आर. के. बॅनरच्या “बरसात’’ या चित्रपटाची गाणी आठवावी लागतील.

      आपल्या ‘आग’ या पहिल्याच चित्रपटात मिळालेल्या दणदणीत अपयशानंतर राज कपूर पूर्णपणे निराश झाला होता. तेव्हा संगीतकाराची जोडी त्याने नव्यानं आणली होती. शंकर-जयकिशन यांना त्याने ‘बरसात’करिता सर्वप्रथम संधी दिली होती. संगीतकार शंकर-जयकिशन यांनी गायिका नायिका नर्गिस हिच्याकरिता लताचा आवाज वापरायचा असं ठरवलं होतं. केवळ नर्गिसकरिता लताचा आवाज वापरायचा असं ठरविणाऱ्या शंकर-जयकिशन यांना नंतर निम्मी व सहनायिका विमलाकरिताही लताचाच आवाज वापरण्याचा मोह झाला. ‘हवा में उडता जाये मेरा लाल दुपट्टा मलमलका’ हे गाणं विमलावर चित्रित झालं होतं. त्यातही लताचाच आवाज होता, परंतु लताने या तिन्ही नायिकांकरिता गाताना वेगळे परिश्रम घेऊन गाण्याचा ढंगही वेगळा ठेवला होता. सुरुवातीच्या काळातच मिळालेलं हे आव्हान तिने समर्थपणे पेलून दाखविले होते. लताच्या आवाजातील वेगवेगळी किमया आठवायची असेल तर ‘संत ज्ञानेश्‍वर’ हा चित्रपट आठवावा लागेल. ‘संत ज्ञानेश्‍वर’ आठवला की सर्वांनाच आठवणार, ‘ज्योत से ज्योत जगाते चलो’ हे गीत कमालीच लोकप्रिय ठरलं होतं. याच चित्रपटातील ‘एक दोन तीन चार, भय्या बनो होशियार’ हे गाणं लतानं एका वेगळ्याच ढंगात गायिलं होतं. या चित्रपटातील लताची गाणी ऐकताना एक वेगळाच आनंद मिळतो. ही गायनाची विविधता दाखविणारी कसरत फक्त लताच करू शकते. इतरांकडे हे सामर्थ्य फार कमी पाहायला मिळते.

      लता दीदीच्या गायनाकडे जर बारकाईने लक्ष दिलं तर लक्षात येतं की, सामान्य रसिकाच्या थेट अंत:करणापर्यंत पोहचविण्याची किमया लताने महत्‌ प्रयत्नाने साध्य केली आहे. भक्तिगीत, भावगीत, बालगीत, विरहगीत, उडत्या चालीचं गीत असो की कॅबरे गीत, ते गाऊन त्याला पूर्णत्वाकडे नेण्याची किमया केवळ तिच्याच आवाजात ऐकायला मिळते. आपल्या गाण्यांतून ती कधी हसविते तर कधी रडविते. आजही 16 वर्षाच्या नायिकेकरिता ती गाते म्हणजेच तिचा आवाज चिरतरुण आहे असंच म्हणावं लागेल. पूर्वीच्या आवाजापेक्षा आता तिचा आवाज अधिक पक्व झाला आहे, भारदस्त झाला आहे. लता आपल्याला कधी आईच्या रूपात दिसते, तेव्हा ती अंगाई गीत गाऊन आपल्यावर मायेचं पांघरूण घालते. आपल्या काही गाण्यांतून ती भावंडांना दिलासा देते तर लेकीच्या स्वरूपात माहेरी येताना किंवा सासरी जाताना दिसते.

      लताने भारतीय चित्रपटांतील विविध भाषांत गायन केले आहे. परंतु सर्वांत जास्त संख्या हिंदी गाण्यांची होय. असायला हवेत ते सारे गुण तिच्याजवळ आहेत. ती एक परिपूर्ण गायिका होय. एखादं गाणं त्या चित्रपटातील नायिकेचं असो वा त्या चित्रपटातील एखाद्या म्हाताऱ्या आईकरिता असो, लताच्या आवाजाची विविधता तेथेच दिसून येते. तिने लहान मुलाकरिता गायिलेलं, ‘मैं चूप रहूँगी’ या चित्रपटातील भजन ‘तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही’ हे ऐकताना जेवढा आनंद होतो तितकाच आनंद तिने आपल्या मादक स्वरात ‘इंतकाम’ या चित्रपटात हेलनकरिता गायिलेल्या ‘आ जाने जा’ या गाण्याने होतो. हा अनुभव काही निराळाच म्हणावा लागेल. प्रत्येक वेगळ्या व्यक्तिरेखेला आपल्या गाण्यातून जिवंत करण्याचं सामर्थ्य केवळ तिच्याच गळ्यात पाहायला मिळते. एखाद्या गीतात, त्याच्या चालीत काही जरी खास नसलं तरी आपल्या गायन कौशल्याने कोणत्याही गाण्याचं सोनं ती करून दाखवू शकते. संगीत हा जणू तिचा प्राणच होय व हे संगीत तिच्या रोमारोमांत भिनले आहे.

      नाना रसांची, नाना भावनांची गाणी लताच्या आवाजाचा सुरेल व पूर्ण उपयोग मदन मोहन यांनी करून घेतल्याची किती तरी उदाहरणं देता येतील. ‘अदालत’मधील लताच्या आवाजातील तीन गझला तर विसरायच्या म्हटलं तरी विसरता येणार नाहीत. ‘यूँ हसरतो के दाग’, ‘जाना था हमसे दूर बहाने बना लिये’, ‘उनको ये शिकायत है के हम कुछ नही कहते’ हीच ती अवीट गोडीची गाणी होत. ‘बागी’ या चित्रपटातील, ‘हमारे बाद अब महफिलमें अफसाने बयाँ होंगे’ तसेच ‘हम प्यारमें जलनेवालोंको चैन कहाँ, आराम कहाँ’ (जेलर), ‘तू प्यार करे या ठुकराये’, मेरी बीना तूम बीन रोये’ (देख कबीरा रोया), ‘आपकी नजरोंने समझा प्यार के काबील मुझे’, ‘है इसीमे प्यार की आबरू’ (अनपढ), ‘जो हमने दास्ता अपनी सुनाई’, ‘नैना बरसे रिमझिम’ (वह कौन थी), ‘अगर मुझसे मोहब्बत है’, ‘मुझे सब अपने गम दे दो’ (आपकी परछाईयाँ) ही सर्व गाणी मदन मोहन यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली लताने गायिली होती. आजदेखील या गाण्यांना तेवढीच लोकप्रियता लाभली आहे व पुढेही राहील. एके काळी लता मंगेशकर, राजा मेहंदी अलीखान व मदन मोहन असा संगीताचा त्रिकोण आपल्या यशाचा ध्वज दिमाखाने फडकावीत होता. लताची कारकीर्द येथे बऱ्यापैकी जम बसवत असतानाच भारतीय चित्रपट संगीतात अजून दोन गायिकांनी आपले बस्तान बसवायला सुरूवात केली होती. त्या दोघीपैकी सुमन कल्याणपूरच्या गायनावर लताच्या आवाजाची सावली इतकी दाट पडलेली होती की, या दोघींचा आवाज ओळखणे कित्येकदा कठीण जायचे.

      अनेक संगीतकारानी लता उपलब्ध नसताना सुमन कल्याणपूरच्या आवाजाचा उपयोग करून घेतला. शंकर-जयकिशन या संगीतकारांचा लताशी वाद झाला तेव्हा त्यांनी शारदा नामक गायिकेला पुढे आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पूर्णपणे अयशस्वी ठरला व लताचं स्थान तिच्यापासून कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही हे दिसून आले. संगीतकार शंकर यांच्या निधनानंतर लताने अगदी व्याकूळ स्वरात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. याच शंकर-जयकिशन यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली लताने गायिलेल्या गाण्यांना कसं विसरायचं. ‘पतिता’, ‘शिकस्त’, ‘बादशहा’, ‘सीमा’, ‘मयूरपंख’, ‘बसंत बहार’, ‘हलाकू’, ‘चोरी चोरी’, ‘कठपुतली’, ‘कन्हैय्या’, ‘उजाला’ किती म्हणून सांगायचे चित्रपट. नुसतीच चित्रपटांची नावे व त्यातील एक गाणं द्यायचं म्हटलं तरी पाने पुरणार नाहीत. शंकर-जयकिशन यांच्या संगीतातील लताची गाणी अगदी झपाटून टाकणारी होती. भारतीय लोक संगीताचा पुरेपूर उपयोग करून घेऊन आपले चित्रपट संगीत लोकप्रिय करणाऱ्या नौशाद यांच्याकडे लतानं गायिलेली गाणी किती म्हणून सांगावीत. त्यापैकी ‘उठाये जा उनके सितम’ (अंदाज), ‘मोहे भूल गये सावरियाँ’ (बैजू बावरा), ‘लो प्यार की हो गयी जीत’ (जादू), ‘ले जा मेरी दुवाये ले जा’ (दीदार), ‘तुम्हे खो दिया हमने पाने के बाद’ (आन), ‘घुंघट नही खोलूंगी सैंया तोरे आगे’ (मदर इंडिया), ‘न मिलता गम तो बरबादी के अफसाने कहाँ जाते’ (अमर) किती म्हणून नोंद करायची?

***

लता मंगेशकर यांची गाजलेली चित्रपट गीते

 

1)   अजीब दास्तां है ये, कहां शुरू कहां खतम – चित्रपट – दिल अपना और प्रीत पराई,

     गीतकार – हसरत जयपुरी, संगीत – शंकर-जयकिशन

2)   अहसान तेरा, होगा मुझ पर – चित्रपट – जंगली, गीतकार – हसरत

      जयपुरी, संगीत – शंकर-जयकिशन

3)   अगर मुझसे मुहब्बत है, मुझे सब अपने गम दे दो – चित्रपट – आपकी परछाइयां,

      गीतकार – राजा मेहंदी अली खां, संगीत – मदन मोहन

4)   अजनबी, तूम जाने-पहचाने-से लगते हो – चित्रपट – हम सब उस्ताद है,

      गीतकार – आनंद बख्शी, संगीत – लक्ष्मीकांत-प्यारेलाल

5)   अजी रूठकर काहा जाइएगा – चित्रपट – आरजू,

      गीतकार – हसरत जयपुरी, संगीत – शंकर-जयकिशन

6)   अकेले हैं चले जाओ जहां हो – चित्रपट – राज, गीतकार – इंदिवर,

      संगीत – कल्याणजी-आनंदजी

7)   अब तो है तुमसे हर खुशी अपनी – चित्रपट – अभिमान,

      गीतकार – महरूह सुल्तानपुरी, संगीत – एस. डी. बर्मन

8)   आज की मुलाकात बस इतनी – चित्रपट – भरोसा,

      गीतकार – राजेंद कृष्ण, संगीत – रवि, सहगायक – महेंद्र कपूर

10) आज मदहोश हुआ जाए रे – चित्रपट – शर्मिली, गीतकार – नीरज,

      संगीत – एस.डी. बर्मन, सहगायक – किशोर कुमार

11) आजा रे परदेसी, मैं तो कब से खडी इस पार – चित्रपट – मधुमती,

      गीतकार – शैलेंद्र, संगीत – सलिल चौधरी

12) आहा, रिमझिम के ये प्यारे-प्यारे गीत लिए – चित्रपट – उसने कहा था,

      गीतकार – शैलेंद्र, संगीत – सलिल चौधरी, सहगायक – तलत महमूद

13) आप मुझे अच्छेे लगने लगे, सपने सच्चे लगने लगे – चित्रपट – जीने की राह,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – लक्ष्मीकांत-प्यारेलाल

14) आ जाओ – तडपते हैं अरमां – चित्रपट – आवारा

      गीतकार – हसरत जयपुरी, संगीत – शंकर-जयकिशन

15) आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे – चित्रपट – अनपढ,

      गीतकार – राजा मेहंंदी अली खान, संगीत – मदन मोहन

16) आ, लौट के आजा मेरे मीत, तुझे मेरे गीत बुलाते हैं – चित्रपट – रानी रूपमती,

      गीतकार – भरत व्यास, संगीत – एस. एन. त्रिपाठी

17) आज कल में ढल गया दिन हुआ तनाम – चित्रपट – बेटी-बेटे,

      गीतकार – शैलेंद्र, संगीत – शकंर-जयकिशन

18) इन्हीं लोंगों ने, इन्हीं लोगों ने – चित्रपट – पाकीजा,

      गीतकार – मजरूह, संगीत – गुलाम मोहम्मद

19) इस मोड से जाते हैं – चित्रपट – आंधी, गीतकार – गुलजार,

      संगीत – राहुल देव

20) इस जमाने में, इस मोहब्बत ने – चित्रपट – महबूब की मेहंदी,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – लक्ष्मीकांत-प्यारेलाल

21) ईश्‍वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है – चित्रपट – सत्यम्‌ शिवम्‌ सुदंरम्‌,

       गीतकार – नरेंद्र शर्मा, संगीत – लक्ष्मीकांत-प्यारेलाल

22) उनको ये शिकायत है कि हम कुछ नहीं कहते – चित्रपट – अदालत,

      गीतकार – राजेंद्र कृष्ण, संगीत – मदन मोहन

23) एक तू जो मिला सारी दुनिया मिली – चित्रपट – हिमालय की गोद में,                 

       गीतकार – इंदीवर, संगीत – कल्याणजी-आनंदजी

24) ऐ मेर वतन के लोगो, तुम खूब लगा लो नारा – देशभक्तिपर गीत,

      गीतकार – प्रदीप, संगीत – सी. रामचंद्र

25) ए मेरे दिले नादा, तू गम से न घबराना – चित्रपट – टॉवर हाऊस,

      गीतकार – असद भोपाली, संगीत – रवि

26) ओ सजना, बरखा बहार आई, रस की फुहार लाई – चित्रपट – परख,                   

       गीतकार – शैलेंद्र, संगीत – सलिल चौधरी

27) कैद मे है बूलबुल, सैयाद मुस्कराए – चित्रपट – बेदर्द जमाना क्या जाने,

      गीतकार – भरत व्यास, संगीत – कल्याणजी-आनंदजी

28) कांटो से खींच के ये आंचल तोडके बंधन बांधी पायल – चित्रपट – गाइड,

      गीतकार – शैलेंद्र, संगीत – एस. डी. बर्मन

30) कहीं दीप जले कहीं दिल जरा देख ले आकर परवाने – चित्रपट – बीस साल बाद,

      गीतकार – शकील बदायुनी, संगीत – हेमंत कुमार

31) कदर जाने ना, हो कदर जाने ना – चित्रपट – भाई-भाई,

      गीतकार – राजेंद्र कृष्ण, संगीत – मदन मोहन

32) कभी-कभी मेरे दिल में खयाल आता है – चित्रपट – कभी-कभी,

      गीतकार – साहिर, संगीत – खय्याम

33) कोरा कागज था ये मन मेरा – चित्रपट – आराधना,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – एस.डी. बर्मन

34) खामोश है जमाना, चुपचाप है सितारे – चित्रपट – महल,

      गीतकार – नक्श लालपुरी, संगीत – खेमचंद प्रकाश

35) गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा – चित्रपट – शिरी-फरहाद,

      गीतकार – तनवीर नकवी, संगीत – एस. महेन्द्र

36) घर आया मेरा परदेसी – चित्रपट – आवारा, गीतकार – शैलेंद्र,

      संगीत – शंकर-जयकिशन

37) चुप-चुप खडे हो, जरूर कोई बात है – चित्रपट – बडी बहन,

      गीतकार – राजेंद्र कृष्ण, संगीत – हुस्नलाल-भगतराम

38) चले जाना नहीं नैन मिलाके – चित्रपट – बडी बहन,

      गीतकार – राजेंद्र कृष्ण, संगीत – हुस्नलाल-भगतराम

38) चांद फिर निकला मगर तुम न आए – चित्रपट – पेइंग गेस्ट,

      गीतकार – मजरूह, संगीत – एस. डी. बर्मन

39) चलो सजना, जहां तक घटा चले – चित्रपट – मेरे हमदम मेरे दोस्त,                     

      गीतकार – मजरूह, संगीत – लक्ष्मीकांत-प्यारेलाल

40) छुप गया कोई रे, दूर से पुकार के – चित्रपट – चम्पाकली,

      गीतकार – राजेंद्र कृष्ण, संगीत – हेमंत कुमार

41) छुप गए सारे नजारे ओए क्या बात हो गई – चित्रपट – दो रास्ते,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – लक्ष्मीकांत-प्यारेलाल,

      सहगायक – किशोर कुमार

42) जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते है लोग – चित्रपट – दाग,

      गीतकार – साहिर, संगीत – लक्ष्मीकांत-प्यारेलाल

43) जो हमने दास्तां अपनी सुनाई, आप क्यों रोए – चित्रपट – वो कौन थी,

      गीतकार – राजा मेहंदी अली खान, संगीत – मदन मोहन

44) जिया ले गयो जी मेरा सांवरिया – चित्रपट – अनपढ,

      गीतकार – राजा मेहंदी अली खान, संगीत – मदन मोहन

45) जरा सामने तो आओ छलिए – चित्रपट – जनम-जनम के फेरे,

      गीतकार – भरत व्यास, संगीत – एस. एन. त्रिपाठी, सहगायक – रफी

46) टाई लगा के माना बन गए जनाब हीरो – चित्रपट – भाभी,

      गीतकार – राजेंद कृष्ण, संगीत – चित्रगुप्त

47) तेरा जाना, दिल के अरमानों का लुट जाना- चित्रपट – अनाडी,

      गीतकार – शैलेंद्र, संगीत – शंकर-जयकिशन

48) तडपाओगे, तडपा लो, हम तडप-तडप कर भी, तुम्हारे गीत गाएंगे – चित्रपट – बरखा,

     गीतकार – राजेंद्र बक्षी, संगीत – चित्रगुप्त

49) तेरे होंठो के दो फूल प्यारे – चित्रपट – पारस, गीतकार – गुलशन बावरा,

      संगीत – कल्याणजी-आनंदजी

50) तेरी महफिल में किस्मत आजमा कर हम भी देखेंगे –चित्रपट – मुगले-आजम,

       गीतकार – शकील बदायुनी, संगीत – नौशाद, सहगायक – शमशाद बेगम

51) दीदी तेरा देवर दीवाना – चित्रपट – हम आपके हैं कौन,

      गीतकार – देव कोहली, संगीत – राम-लक्ष्मण,

      सहगायक – एस.पी. बालसुब्रमण्यम

52) दिल-विल, प्यार-व्यार मैं क्या जानूं रे – चित्रपट – शागिर्द,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – लक्ष्मीकांत-प्यारेलाल

53) दो हंसो का जोडा बिछड गयो रे – चित्रपट – गंगा-जमुना,

      गीतकार – शकील बदायुनी, संगीत – नौशाद

54) दिल का न करना ऐतबार कोई – चित्रपट – हलाकू, गीतकार – शैलेंद्र,

      संगीत – शंकर जयकिशन

55) प्यार हुआ इकरार हुआ है – चित्रपट – श्री चार सौ बीस,

      गीतकार – शैलेंद्र, संगीत – शंकर जयकिशन

56) परबत के पीछे चम्बेला गांव – चित्रपट – महबूबा,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – आर. डी. बर्मन

57) मेरे नैना सावन भादों, फिर भी मेरा मन प्यासा – चित्रपट – महबूबा,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – आर. डी. बर्मन

58) मिलती है जिंदगी में मुहब्बत कभी-कभी – चित्रपट – आंखें,

      गीतकार – साहिर, संगीत – रवि

59) महलेों का राजा मिला, कि रानी बेटी राज करेगी – चित्रपट – अनोखी रात,

     गीतकार – इंदिवर, संगीत – रोशन

60) मस्ती भरा है समां – चित्रपट – परवरिश,

      गीतकार – हसरत जयपुरी, संगीत – दत्ताराम

61) यशोमती मैया से बोले नंदलाला – चित्रपट – सत्यम शिवम सुंदरम्‌,

      गीतकार – विठ्ठल भाई पटेल, संगीत – लक्ष्मीकांत-प्यारेलाल

62) याद किया दिल ने कहां हो तुम – चित्रपट – पतिता,

      गीतकार – हसरत जयपुरी, संगीत – शंकर-जयकिशन

63) ये हरियाली और ये रास्ता – चित्रपट – हरियाली और रास्ता,

      गीतकार – शैलेेंद्र, संगीत – शंकर-जयकिशन

64) राजा की आएगी बारात, रंगीली होगी रात – चित्रपट – आह,

      गीतकार – शैलेंद्र, संगीत – शंकर-जयकिशन

65) रूक जा रात ठहर ओ चंदा, बीते न मिलन की बेला –चित्रपट – दिल एक मंदिर,

      गीतकार – शैलेंद्र, संगीत – शंकर-जयकिशन

66) रंगीला रे, तेरे रंग में, यूं रंगा है मेरा मन – चित्रपट – प्रेम पूजारी,

      गीतकार – इंदिवर, संगीत – एस. डी. बर्मन

67) रसिक बलमा… हाय – चित्रपट – चोरी चोरी, गीतकार – शैलेंद्र,

      संगीत – शंकर-जयकिशन

68) राधा न बोले ना बोले ना बोले रे – चित्रपट – आजाद,

      गीतकार – राजेंद्र कृष्ण, संगीत – सी. रामचंद्र

69) लूटे कोई मन का नगर बनके मेरा साथी – चित्रपट – अभिमान,

      गीतकार – मजरूह, संगीत – एस. डी. बर्मन

70) सारी-सारी रात तेरी याद सताए – चित्रपट – अजी बस शुक्रिया,

      गीतकार – राजेंद्र कृष्ण, संगीत – रोशन

71) संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे –चित्रपट – चित्रलेखा,

       गीतकार – साहिर लुधियानवी, संगीत – रोशन

72) हमने देखी है उन आंखों की महकती खुशबू – चित्रपट – खामोशी,                        

      गीतकार – गुलजार, संगीत – हेमंत कुमार

73) है इसी में प्यार की आबरू, वो जफा करें मैं वफा करूं – चित्रपट-अनपढ,

      गीतकार-राजा मेहंदी अली खान, संगीत – मदन मोहन

74) अब चाहे मां रूठे या बाबा यारा मैंने तो हां कर ली – चित्रपट – दाग,

      गीतकार – साहिर लुधियानवी, संगीत – लक्ष्मीकांत-प्यारेलाल, सहगायक – किशोरकुमार

75) अकेले ही अकेले चला है कहां – चित्रपट – गोपी,

      गीतकार – राजेंद्र कृष्ण, संगीत – कल्याणजी-आनंदजी

76) अल्ला तेरो नाम, ईश्‍वर तेरो नाम – चित्रपट – हम दोनों,

      गीतकार – साहिर लुधियानवी, संगीत – जयदेव

77) अब मेरा कौन सहारा – चित्रपट – बरसात,

      गीतकार – हसरत जयपुरी, संगीत – शंकर-जयकिशन

78) अपने होंठों की बंसी बना ले मुझे – चित्रपट – गॅम्बलर,

      गीतकार – नीरज, संगीत – एस.डी. बर्मन

79) अगर दिलबर की रूसवाई हमें मंजूर हो जाए – चित्रपट – खिलौना,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – लक्ष्मीकांत-प्यारेलाल

80) आ जा, आयी बहार, दिल है बेकरार – चित्रपट – राजकुमार,

      गीतकार – शैलेंद्र, संगीत – शंकर-जयकिशन

81) आज मेरे मन में सखी बांसुरी बजाए कोई – चित्रपट – आन,

      गीतकार – शकील बदायुनी, संगीत – नौशाद अली

82) आएगी जरूर चिट्ठी मेरे नाम की, सब देखना – चित्रपट – दुल्हन,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – लक्ष्मीकांत-प्यारेलाल

83) आजा, अब तो आजा, मेरी किस्मत के खरीदार – चित्रपट – अनारकली,

      गीतकार – राजेंद्र कृष्ण, संगीत – सी. रामचंद्र

84) आजा सनम मधुर चांदनी में हम तुम मिलें तो – चित्रपट – चोरी-चोरी,

      गीतकार – हसरत, संगीत – शंकर-जयकशिन, सहगायक – मन्ना डे

85) आजा शाम होने आई मौसम ने ली अंगडाई – चित्रपट – मैंने प्यार किया,

      गीतकार – देव कोहली, संगीत – राम-लक्ष्मण, सहगायक – बाल सुब्रमण्यम

86) आसमां के नीचे हम आज अपने पीछे – चित्रपट – ज्वैल थीफ,

      गीतकार – मजरूह, संगीत – एस.डी. बर्मन, सहगायक – किशोर कुमार

87) आज हम अपनी दुआओं का असर देखेंगे – चित्रपट – पाकीजा,

      गीतकार – कैफ आजमी, संगीत – गुलाम मोहम्मद

88) इक दुखियारी कहे बात ये रोते-रोते – चित्रपट – राम तेरी गंगा मैली

      गीतकार – हसरत जयपुरी, संगीत – रविंद्र जैन

89) उठाए जा उनके सितम, और लिए जा – चित्रपट – अंदाज,

      गीतकार – शकील, संगीत – नौशाद

90) ए, बी, सी, डी छोडो नैनों से नैना जोडो- चित्रपट – राजा जानी,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – लक्ष्मीकांत-प्यारेलाल

91) ओ गंगा मैया ओ गंगा मैया – चित्रपट – चंदन का पालना,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – आर. डी. बर्मन

92) ओ बाबुल प्यारे ओ रोए पायल की छमछम – चित्रपट – जॉनी मेरा नाम,

      गीतकार – इंदिवर, संगीत – कल्याणजी-आनंदजी

93) कहे झूम-झूूम रात ये सुहानी – चित्रपट – लव मैरिज,

      गीतकार – शैलेंद्र, संगीत – शंकर-जयकिशन

94) कांची रे कांची रे प्रीत मेरी सांची – चित्रपट – हरे रामा हरे कृष्णा,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – आर.डी. बर्मन

95) कल के सपने आज प्रीतम को भी साथ में लाना – चित्रपट – आदमी,

      गीतकार – शकील, संगीत – नौशाद

96) कजरा लगा के, गजरा सजा के – चित्रपट – अपना देश,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – आर.डी. बर्मन, सहगायक – किशोर

97) करवटें बदलते रहे सारी रात हम – चित्रपट – आपकी कसम,

गीतकार – आनंद बक्षी, संगीत – लक्ष्मीकांत-प्यारेलाल, सहगायक – किशोर

98) कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा – चित्रपट – मैंने प्यार किया,

गीतकार – असद भोपाली, संगीत – राम-लक्ष्मण, सहगायक – बाल सुब्रमण्यम

99) कितने भी तू कर ले सितम – चित्रपट – सनम तेरी कसम,

      गीतकार – गुलशन बावरा, संगीत – राहुल देव बर्मन

100) खुदाए बरतर ! तेरी मर्जी पर जमीं की खातिर ये जंग क्यों है – चित्रपट – ताजमहल,

      गीतकार – साहिर, संगीत – रोशन

101) गंगा में डुबा न जमना में डुबा – चित्रपट – अपने रंग हजार,

      गीतकार – अनजान, संगीत – लक्ष्माकांत-प्यारेलाल

102) गुमनाम है कोई, बदनाम है कोई – चित्रपट – गुमनाम,

      गीतकार – हसरत जयपूरी, संगीत – शंकर – जयकिशन

103) घुंघट नहीं खोलुंगी सैयां तोरे आगे – चित्रपट – मदर इंडिया,

      गीतकार – शकील, संगीत – नौशाद

104) घडी-घडी मेरा दिल धडके – चित्रपट – मधुमती,

      गीतकार – शैलेंद्र, संगीत – सलिल चौधरी

105) चेहरे पे खुशी छा जाती है आंखों में सुरूर आ जाता है –चित्रपट – वक्त,

        गीतकार – साहिर, संगीत – रवि

106) चुपके-चुपके चल री पुरवैया बांसुरी बजाये रे – चित्रपट – चुपके-चुपके,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – एस.डी.बर्मन

107) छोटी-सी उमर में लग गया रोग – चित्रपट – बैराग,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – कल्याणजी-आनंदजी

108) जिया बेकरार है, छाई बहार है – चित्रपट – बरसात,

      गीतकार – हसरत जयपुरी, संगीत – शंकर-जयकिशन

109) जिसे तू कुबूल कर ले, वो अदा कहां से लाऊं – चित्रपट – देवदास,

      गीतकार – साहिर लुधियानवी, संगीत – एस. डी. बर्मन

110) जादूगर सैयां, छोड मोरी बैयां – चित्रपट – नागिन,

      गीतकार – राजेंद्र कृष्ण, संगीत – हेमंत कुमार

111) जो दिल में खुशी बनकर आए – चित्रपट – बडी बहन,

      गीतकार – राजेंद्र कृष्ण, संगीत – हुस्नलाल-भगतराम

112) जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात – चित्रपट – बरसात की रात,

      गीतकार – साहिर लुधियानवी, संगीत – रोशन

113) जब हम जवां होंगे जाने कहां होंगे – चित्रपट – बेताब,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – एस. डी. बर्मन, सहगायक – रफी

114) झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो – चित्रपट – बॉबी,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – लक्ष्मीकांत-प्यारेलाल

115) झूम-झूम ढलती रात, के लेके चली मुझे अपने साथ – चित्रपट – कोहरा,

      गीतकार – कैफी आजमी, संगीत – हेमंत कुमार

116) तेरा जलवा जिसने देखा, वो तेरा हो गया – चित्रपट – उजाला,

      गीतकार – हसरत जयपुरी, संगीत – शंकर जयकिशन

117) तेरे कारन तेरे कारन मेरे साजन – चित्रपट – आन मिलो सजना,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – लक्ष्मीकांत प्यारेलाल

118) तमन्ना लूट गई फिर भी तेरे दम से मुहब्बत है – चित्रपट – अमर,

      गीतकार – शकील, संगीत – नौशाद

119) तुम्हें और क्या दूं मैं दिल के सिवाय – चित्रपट – आई मिलन की बेला,

      गीतकार – हसरत, संगीत – शंकर जयकिशन

120) तेरे सुर और मेरे गीत – चित्रपट – गूंज उठी शहनाई,

      गीतकार – भरत व्यास, संगीत – वसंत देसाई

121) तेरे मेर बीच में कैसा है ये बंधन अंजाना – चित्रपट – एक दूजे के लिए,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – लक्ष्मीकांत प्यारेलाल

122) तकदीर जगाकर आई हूं, जगाकर आई हूं – चित्रपट – दुलारी,

      गीतकार – शकील बदायुनी, संगीत – नौशाद

123) तेरी राहो में खडे हैं दिल थाम के – चित्रपट – छलिया,

      गीतकार – कमर जलालाबादी, संगीत – कल्याणजी-आनंदजी

124) तू जहां-जहां चलेगा, मेरा साया साथ होगा – चित्रपट – मेरा साया,

      गीतकार – राजा मेहंदी अली खान, संगीत – मदन मोहन

125) दुआ कर गमे-दिल, खुदा से दुआ कर – चित्रपट – अनारकली,

      गीतकार – राजेंद्र कृष्ण, संगीत – सी. रामचंद्र

126) दिल अपना और प्रीत पराई – चित्रपट – दिल अपना और प्रीत पराई,

      गीतकार – शैलेंद्र, संगीत – शंकर-जयकिशन

127) दिल में तुझे बिठाके – चित्रपट – फकीरा,

      गीतकार – रवींद जैन, संगीत – रवींद्र जैन

128) दुनिया वालों से दूर जलने वालों से दूर – चित्रपट – उजाला,

      गीतकार – शैलेंद्र, संगीत – शंकर-जयकिशन

129) धीरे-धीरे मचल ए दिले बेकरार कोई आता है – चित्रपट – अनुपमा,

      गीतकार – कैफी आजमी, संगीत – हेमंत कुमार

130) नैना बरसे रिमझिम-रिमझिम – चित्रपट – वो कौन थी,

      गीतकार – राजा मेहंदी अली खान, संगीत – मदन मोहन

131) न कोई उमंग है, न कोई तरंग है – चित्रपट – कटी पतंग,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – राहुल देव बर्मन

132) पंछी बनूं उडती फिरू मस्त गगन में – चित्रपट – चोरी-चोरी,

      गीतकार – शैलेंद्र , संगीत – शंकर-जयकिशन

133) फूल तुम्हें भेजा है खत में – चित्रपट – सरस्वती चंद्र,

      गीतकार – इंदिवर, संगीत – कल्याणली-आनंदजी

134) बिदिंया चमकेगी, चूडी खनकेगी – चित्रपट – दो रास्ते,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – लक्ष्मीकांत-प्यारेलाल

135) बनवारी के जीने का सहारा तेरा नाम रे – चित्रपट – एक फूल दो कांटे,

      गीतकार – हसरत जयपुरी, संगीत – शंकर – जयकिशन

136) मेरे नसीब में तू है कि नहीं – चित्रपट – नसीब,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – लक्ष्मीकांत-प्यारेलाल

137) मैं तेरी दुश्‍मन दुश्‍मन तू मेरा, मैं नागिन तू सपेरा – चित्रपट – नगीना,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – लक्ष्मीकांत-प्यारेलाल

138) मेरे महबूब तुझे मेरी मुहब्बत की कसम – चित्रपट – मेरे महबूब,

      गीतकार – शकील बदायुनी, संगीत – नौशाद

139) मेरे हाथों में नौ-नौ चुडियां है – चित्रपट – चांदनी,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – शिव-हरि

140) मार दिया जाए कि छोड दिया जाए – चित्रपट – मेरा गांव मेरा देश,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – लक्ष्मीकांत-प्यारेलाल

141) मुहब्बत की झूठी कहानी पे रोए – चित्रपट – मुगले आजम,

      गीतकार – शकील बदायुनी, संगीत – नौशाद

142) मौसम है आशिकाना – चित्रपट – पाकीजा,

      गीतकार – कमाल अमरोही, संगीत – गुलाम मोहम्मद

143) मारे गए गुलफाम अजी हां मारे गए – चित्रपट – तीसरी कसम,

      गीतकार – शैलेंद्र, संगीत – शंकर-जयकिशन

144) ये गलियां ये चौबारा, यहां आना ना दोबारा – चित्रपट – प्रेम रोग,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – लक्ष्मीकांत-प्यारेलाल

145) ये जिंदगी उसी की है – चित्रपट – अनारकली,

      गीतकार – राजेंद्र कृष्ण, संगीत – सी. रामचंद्र

146) ये केसा सूर मंदिर है जिसमें संगीत नहीं – चित्रपट – प्रेम नगर,

      गीतकार – आनंद बक्षी, संगीत – एस. डी. बर्मन

147) वो चांद खिला, वो तारे हंसे, ये रात अजब मतवाली है –

      चित्रपट – अनाडी, गीतकार – शैलेंद्र, संगीत – शंकर -जयकिशन

***

हिंदी चित्रपट संगीताच्या गोल्डन इरा काळातील दर्जेदार माहितीपूर्ण लेखांसाठी क्लिक करा 

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment