– अशोक उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

‘बिंदीया चमकेगी, चुडी खनकेगी’ या लता दिदीच्या ‘दो रास्ते’ या चित्रपटातील गीताने मुमताज (Actress Mumtaz) या नायिकेला बिनाका टॉपवर जाण्याचा सन्मान मिळाला केवळ १० वर्षात.  त्याकाळी लोकप्रिय असलेल्या रेडियो सिलोनच्या बिनाका गीतमालामध्ये १९७० साली हे गाणं पहिल्या क्रमांकावर होतं. मुमताज येथे दाखल झाली ती १९६० साली. व्ही. शांताराम यांच्या ‘स्त्री’ या संध्या-व्ही. शांताराम यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटात तिला सखी म्हणून काम मिळाले. सुनील दत्त यांच्या ‘मुझे जिने दो’ या चित्रपटात ती चमकली. सुरुवातीच्या काळात सी ग्रेड चित्रपटात दारासिंगची नायिका म्हणून ‘बॉक्सर’, ‘सॅमसन’, ‘टारजन’, ‘किंगकाँग’ इत्यादी मल्लपटात ही  नायिका होती. मारधाड चित्रपटांची नायिका म्हणून तिने काम सुरू केले; परंतु तमाम रसिकांचे लक्ष वेधून घेणारे तिचे काम पाहायला मिळाले तो चित्रपट होता ‘मेरे सनम’.  आशा भोसले यांच्या आवाजातील ‘ये है रेशमी जुल्फोंका अंधेरा ना घबरायिये’ या मादक गीतातील मुमताजची मादकता रसिकांना घायाळ करून गेली. त्याच काळात आलेल्या तिच्या ‘पत्थर के सनम’ या चित्रपटातील आशा भोसले यांनीच गायलेल्या ‘ऐ दुश्मन-ए-जाँ चल दिया कहाँ’ या गाण्यातील  तिचा सेक्सी अभिनय अप्रतिम झाला होता. (Hindi Cinema’s Glamorous Actress from Golden Era Actress Mumtaz)

सहायक नायिका म्हणून मोठमोठ्या बॅनरमध्ये तिने काम केले. ‘सेहरा’, ‘स्त्री’ या व्ही. शांताराम यांच्या चित्रपटानंतर ‘बुंद जो बन गयी मोती’ या चित्रपटात तिने ” जितेंद्रच्या पत्नीची भूमिका केली. भूगोल शिकवणारा व निसर्गाची ओळख आपल्या विद्यार्थ्यांना करून देणारा शिक्षक जितेंद्रने साकार केला होता. खरं तर सहायक नायिका म्हणजेच दुय्यम नायिका म्हणूनच तिचा रूपेरी पडद्यावर सुरुवातीला वावर झाला. या भूमिका सादर करताना तिने कधीकधी मुख्य नायिकांनादेखील मागे टाकले. ‘पत्थर के सनम’ या चित्रपटात तिची नायिका होती वहिदा रेहमान; परंतु भाव खाऊन गेली मुमताजच. शर्मिला टागोर सोबत तिने ‘सावन की घटा’मध्ये काम केले; परंतु शर्मिलापेक्षा तिलाच पसंती मिळाली. 

विश्वजित, आशा पारेख यांच्या ‘मेरे सनम’ या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेल्या ‘ये है रेशमी जुल्फों का अंधेरा’ या गीतामधील तिचा मादक झटका प्रेक्षकांना घायाळ करून गेला. ‘ब्रह्मचारी’ चित्रपट पाहताना शम्मी कपूरसोबतच्या तिच्या द्वंद्वगीतात प्रेक्षक तिच्या शरीराकडे पाहतच राहतात. एवढा कमनीय, सेक्सी बांधा असणारी ही नायिका यशाच्या पायऱ्या हळूहळू चढत गेली.

दारासिंग ते दिलीप कुमार हा प्रवास तिने ‘राम और श्याम’मध्ये पूर्ण केला. ‘बी ग्रेड’ चित्रपटाची नायिका लवकरच ‘ए ग्रेड’ वर जाऊन पोहोचली. या चित्रपटात नावाप्रमाणे दिलीप कुमारची दुहेरी भूमिका होती व मुमताज सोबत दुसरी नायिका म्हणून वहिदा रेहमानने काम केले होते. दिलीप नंतर स्वारी निघाली चॉकलेट हिरो देव आनंद कडे.  नवकेतनच्या ‘हरे राम हरे कृष्ण’मध्ये नायिका म्हणून मुमताज सुरेख दिसली तर याच देवसोबत तिने ‘तेरे मेरे सपने मध्ये काम केले. सायकलवर देवसोबत डबलसीट वर बसून ‘ये मैने कसम ली’. हे गाणं तर लता दिदीच्या आर्त  स्वरात राधाचं विरहगीत ‘जैसे राधाने माला जपी शाम की’ ऐकलं की मुमताज डोळ्यासमोर उभी  राहते. देव आनंद यांनी ‘हरे राम हरे कृष्णा’ चे चित्रीकरण नेपाळमध्ये केले होते. या चित्रपटांकरिता देव आनंदच्या आवाजातील ‘कांची रे कांची रे, प्रीत मेरी सांची’ या गीतात मुमताजचे सौंदर्य नेपाळ, काठमांडूच्या निसर्गरम्य परिसरात खुलून दिसले. ओ. पी. रल्हन तिला नायिका मानायला तयारच नव्हता, तरीदेखील त्याने ‘बंधे हाथ’ करिता तिला करारबद्ध केले. मोतीलाल, लीला देसाई यांच्या ‘मुजरीम’सारखे ‘बंधे हाथ’ या चित्रपटाचे कथानक होते. त्या काळी तो ‘मुजरीम’ चालला नाही व बदलत्या काळात या ‘बंदे हाथ’ला भेट द्यायला प्रेक्षक गेले नाहीत. 

१९७० पासून राजेश खन्नाचा काळ सुरू झाला होता. त्या काळचा सुपरस्टार ही पदवी त्याला रसिकांनी दिली होतीच. याच राजेश खन्नासोबत तिचा फॅमिली ड्रामा, ‘दो रास्ते’ तर पुन्हा एकवार दुहेरी भूमिका असलेला ‘सच्चा झूटा’ रसिकांना आवडले. लव्ह स्टोरी असलेला ‘आपकी कसम’ देखील ‘जय जय शिवशंकर’ या गाण्याने गाजविला तर या गीतांच्या वेळची किशोर-आशा या मादक आवाजाची नशा मुमताज-राजेश यांनी पडद्यावर सुरेख साकार केली.

खरं तर फिरोज खान सोबत मुमताजचा विवाह होणार अशी त्याकाळी चर्चा होती; परंतु माशी कुठे शिंकली समजू शकले नाही. फिरोज खान यांच्या सोबतचा ‘मेला’ गाजला. एफ. के. इंटरनॅशनल या फिरोज खान यांच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘अपराध’ मध्ये मुममाजच्या अभिनयाचे रंग पाहायला मिळाले. ‘गोरी के हाथ मे जैसे ये छल्ला’ या गीतात झटका देऊन ‘छुने ना दूंगी उंगली मै बाबू’ असं झटका देत उत्तर देणारी नकटी अप्रतिम होती. राजेश खन्ना सोबतच्या ‘अपना देश’मध्ये तिने आर. डी.-आशा यांच्या गीतावर सुरेख रॉक नृत्य केले.  राजेश खन्ना सोबत तिचे ‘रोटी’, ‘प्रेम कहानी’ हे चित्रपटदेखील गाजले. ‘गहरा दाग’ या चित्रपटात सुरुवातीच्या काळात राजेंद्र कुमारसोबत तिने काम केले तर नंतर एकदम तिचा तो ‘टांगेवाला’ झाला.

मुमताजचा अभिनय पाहायला मिळाला तो ‘खिलौना’ या चित्रपटात. संजीव कुमारसारख्या वेड्यासोबत संसार करायला तयार झालेली ही नायिका नंतर त्याला वेडातून बाहेर काढते. ‘खिलौना’ चित्रपटाची भूमिका तिला अभिनयाचे फिल्मफेअर देऊन गेली. १९९६ साली तिला फिल्मफेअर तर्फे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड देण्यात आले. ‘राम और शाम’ आणि ‘आदमी और इन्सान’ या चित्रपटाच्या सहाय्यक नायिकेच्या पुरस्काराकरिता तिला फिल्मफेअरचे नॉमिनेशन मिळाले होते. 

‘आईना’ या चित्रपटानंतर तिने मयूर माधवानी या करोडपतीसोबत १९७४ मध्ये विवाह केला. कॅन्सरचा लढा यशस्वीरित्या जगून आनंदी आयुष्य जगणारी नायिका म्हणून मुमताजचा उल्लेख करावा लागेल. हिंदी चित्रपटसृष्टीत वाव नसताना आपले वेगळे स्थान निर्माण करणारी नायिका म्हणून मुमताजचा उल्लेख करावा लागेल. ‘प्यार किये जा’ चित्रपटात तिची मेहमूद सोबत कॉमेडी छानच जमली होती. राज कपूर सोडला तर टॉपच्या नायकांसोबत ती चमकली. तिला ‘मुमु’ असे संबोधले जात असे. पडद्यावर या नकटीचा वावर नाक असणाऱ्या नायिकांना घाम सोडायला लावत असे. रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर मुमताज उभी राहते ती ‘ब्रह्मचारी’मधील ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे या गीतामुळे. मुमताजच्या सौंदर्याचे अनोखे दर्शन रसिकांना घडले. 

मुमताज ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

हिंदी सिनेमाच्या अशाच जुन्या जमान्यातील गोल्डन इरा काळातील अधिक लेखांसाठी क्लिक करा

 

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.