बर्थडे स्पेशल …सदाबहार चिरतरुणी – हेलन

– © नयना पिकळे


 

 

लहानपणी सिनेमे पाहताना हिरो म्हणजे सद्गुणांचा पुतळा ….
हिरॉईन म्हणजे सालस , सोज्वळ ….
व्हिलन बेरकी , दगाबाज …..
आणि व्हॅम्प म्हणजे ती स्त्री जी हेरॉईन वर कायम जळत असते , हिरोला आपल्या नादाला लावायचा प्रयत्न करते , तोकडे revealing कपडे घालते , सिगरेट ओढते , ड्रिंक्स घेते आणि प्रसंगी कॅब्रे सुद्धा करते .
ह्याच ठोकताळ्यांमुळे पुढे अनेक वर्ष
“प्रेमचोप्रा हा प्रत्यक्षात खूप सज्जन माणूस आहे” ….
“प्राण सारखा gentleman संपूर्ण सिनेजगतात दुसरा नाही”
ही वक्तव्यं पचनी पडायला खूप वर्ष लागली.
बिंदू , अरुणा इराणी बद्दलही अशीच काहीशी इमेज मनात तयार झालेली .
पण हेलनच्या बाबतीत मात्र असं कधीच झालं नाही …. ….

 

ह्याचं कारण असंही असेल की मी खूप लहान होते तेव्हा “माऊंट मेरी” च्या जत्रेत तिला प्रत्यक्ष पाहिलं होतं ….
प्लेन सफेद साडी , नितळ पारदर्शी चेहरा , तोंडावर पुसटसाही मेकअप नाही आणि डोळे अतिशय स्वच्छ , पाणीदार ….
तेव्हापासून तिची ती इमेज मनात घट्ट घर करून बसलिये ती अगदी आजतागायत .
आणि म्हणूनच ती कधीच टिपिकल व्हॅम्प वाटली नाही.
तिचा अभिनय , तिचं नृत्य मनापासून आवडायचं .
अत्यंत sexy figure आणि मोहक हालचाली असल्या तरी तिच्या नृत्यात , अभिनयात , मादकते बरोबरच जी एक grace होती त्याला तोड नाही .
“Her glamour quotient was , is and will forever remain incomparable and unparalleled”
अगदी तिचा कॅब्रे सुद्धा कधीही vulgar किंवा भडक नाही वाटला ….
उलट पडद्यावर तिला पाहताना लक्षात राहतात तिच्या सहज सुंदर विलोभनीय हालचाली , कमनीय बांधा , बोलका चेहरा आणि निरागस तरीही गहिरे डोळे ….
सर्वच सिनेरसिकांची ही सर्वात आवडती व्हॅम्प असेल ह्यात वादच नाही …
हेलन खूप लहान असताना तिचे वडील गेले आणि कुटुंबाला हातभार लावून आपल्या आईला मदत करण्यासाठी हेलन वर काम शोधण्याची पाळी आली ….
त्याकाळी हिंदी सिनेसृष्टीत कुक्कु नावाच्या आयटम गर्लची चलती होती .
तिनेच हेलनला हिंदीचित्रपट सृष्टीत काम मिळवून द्यायला मदत केली.

राजकपूर नर्गिसच्या आवारा (१९५१) चित्रपटात chorus dancers मध्ये हेलन सर्वात पहिल्यांदा नाचली .
त्यानंतर आलेल्या
“दिल का न करना ऐतबार कोई” (हलाकू – १९५६)
“बेचैन दिल खोयी सी नजर” (यहुदी – १९५८)
मध्ये तिच्या गोड चेहऱ्याने आणि गोबऱ्या गालांनी अनेकांना भुरळ घातली ….
आणि हावरा ब्रिज – १९५८ मधल्या
“मेरा नाम चीन चीन चू” ह्या सदाबहार गाण्याने मात्र ती रसिकांच्या हृदयावर विराजमान झाली ती कायमचीच…..
आणि सिनेरसिकांसाठी सुरु झाला अक्षरशः डोळ्यांचं पारण फिटवणारा एक अतिशय नेत्रसुखद प्रवास …..
हेलन म्हटलं की क्षणार्धात डोळ्यांसमोर तिची असंख्य नृत्यप्रधान गाणी दिसू लागतात ….
“इतनी बडी मेहफील और इक दिल किसको दू” (दिल अपना और प्रीत पराई – १९६०)
“नाम मेरा निम्मो” (सपने सुहाने – १९६१)
“मतवाली आँखोवाले ओ अलबेले दिलवाले” (छोटे नवाब – १९६१)
“तोरा मन बडा पापी” (गंगा जमुना – १९६१1)
“मेरे दिल कभी तो कोई आयेगा” (मै चूप राहुंगी – १९६२)
“यम्मा यम्मा यम्मा तु परवाना मै शम्मा” (चायना टाउन – १९६२)
“तुमको पिया दिल दिया कितने नाज से” (शिकारी – १९६३)
“ऊई मां ऊई मां ये क्या हो गया” (पारसमणी – १९६३)
“हुजुरे वाला जो इजाजत” (ये रात फिर ना आयेगी – १९६६)
“ओ हसिना जुल्फोवाली जाने जहां” (तिसरी मंझिल – १९६६)
“आ जाने जा” (इंतेकाम – १९६९)
“पिया तू अब तो आ जा” (कारवां – १९७१)
“आओ ना गले लगाओ ना” (मेरे जीवनसाथी – १९७२)
“आज की रात कोई आने को है रे बाबा” (अनामिका – १९७३)
“मेहबुबा मेहबुबा” (शोले – १९७५)
“मुंगडा मुंगडा” (इन्कार – १९७८)
“ये मेरा दिल प्यार का दिवाना” (डॉन – १९७८ )
तिच्या गाण्यांची नुसती लिस्ट वाचतानासुद्धा चैतन्याची एक लाट अंगभर सळसळत गेली असेल ना ? ….
विजेलाही लाजवतील अशा तिच्या उत्स्फुर्त नखरेल अदा , लवलवणारा लवचिक देह , चमचमणारी सोनसळी कांती कलेजा खल्लास केल्याशिवाय राहत नाही …..
खरंतर तिच्या नृत्यापुढे तिच्यातील अभिनेत्रीला कधीच फारसा वाव मिळाला नाही …
पण तरीही काही मोजक्या चित्रपटात हेलनला ज्या काही लहानसहान भूमिका मिळाल्या त्यात तिने स्वत:ची अशी वेगळी छाप उमटवलीच ….
दारासिंग बरोबर आया तुफान , आवारा अब्दुल्ला अशा काही B Grade चित्रपटातून हेलनने प्रमुख भूमिका केल्या आहेत ….

सुनेहरी नागीन – १९६३ आणि चा चा चा – १९६४ चित्रपटात सुद्धा हेलनची मुख्य भूमिका होती … सिनेमा पाहिलेला नाहीये पण त्यातल्या
“वो हम न थे वो तुम न थे” मधला तिचा भावूक चेहरा
“एक चमेली के मंडवे तले” मधली लाजरी हेलन तर प्रचंड गोड दिसते .
वो कौन थी – १९६४ मधल्या “छोडकर तेरे प्यार का दामन” गाण्यात नेहेमीच्या नृत्यांगना हेलनच एक वेगळं लोभस रूप पाहायला मिळत ….
हम दिल दे चुके सनम – १९९९ मध्ये तर सलमान खानच्या आईच्या छोटाश्या पण अतिशय रुबाबदार आणि तितक्याच भावूक भूमिकेत हेलन प्रचंड भाव खाऊन गेली आहे …..
लहानपणा पासून आपण खूप मोठा त्याग केल्याचा किंवा दुख सोसल्याचा अविर्भाव नाही की केलेल्या कष्टांबद्दल कधीच मोठेपणाचा आव नाही आणला हेलनने ….
चेहरा सदैव हसरा , तृप्त , मायाळू पण डोळ्यात मात्र खूप गहिऱ्या भावना …. अशा या सदाबहार चिरतरुणीने आज वयाची चक्क ८२ वर्ष पूर्ण केली आहेत ….
गुमनाम – १९६४ चित्रपटात तिच्याच एका सुरेख गाण्यात तिने आयुष्याचं सार अगदी सहजपणे उलगडून सांगितलेलं आहे ….
“इस दुनिया मे जीना है तो
सुन लो मेरी बात
गम छोड के मनाओ रंगरेली”
गेली अनेक वर्ष ती सुद्धा नक्की हेच तत्त्व पाळत असावी ….
आणि म्हणूनच इतकी सगळी दुख पचवूनही आज मोकळेपणाने , स्वच्छ मनाने ती आयुष्याला सामोर जाऊ शकते असं वाटतं ….
तिचं ह्या पुढचं आयुष्य देखील असंच अतिशय सुखाचं आणि समाधानाचं जाओ हीच आज तिच्या वाढदिवशी आम्हा सर्व चाहत्यांची सदिच्छा ….

 

 

 

Nayana Pikle
+ posts

सौ नयना सतीश पिकळे

शिक्षण -
बी एस्सी रसायनशास्त्र
एम ए संस्कृत (वेदांत)
मोबाईल - ९९६७०५३९६७

एच एस बी सी बॅन्केत नोकरी (१९९२-२००३)

बी ए संस्कृतच्या खाजगी शिकवण्या .

मराठी विश्वकोशासाठी नोंदी करणे .

यशोवाणी संस्थेतर्फे अंध मुलांसाठी आॅडियो बुक्सचे रेकाॅर्डींग करणे .

सांगितिक कार्यक्रमांसाठी स्क्रीप्ट लिहिणे आणि निवेदन करणे.

सिने-संगीत व सिनेमा विषयक लेखन करणे .

2 Comments

 • Sandip Pendharkar
  On November 21, 2020 10:40 pm 0Likes

  खुप छान लेख.

  • admin
   On November 22, 2020 7:37 am 0Likes

   खूप खूप धन्यवाद

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.