— © नयना पिकळे

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

आज २६ सप्टेंबर ….. आजच्या दिवशी हिन्दी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन रोमॅन्टीक हीरो देव आनंदचा जन्म झाला आणि आजच मनाला भुरळ घालणाऱ्या आपल्या धीर गंभीर आवाजासाठी आजही लोकप्रिय असणाऱ्या हेमंतदांची पुण्यतिथी. म्हणूनच आज देवआनंद आणि हेमंतदा ह्या दोघांची एकत्र अशी हिंदी सिनेमातील काही उत्कृष्ट गाणी आहेत त्यांचाच आस्वाद घेऊया. (Revisiting the Melodious Songs  Sung by Hemant Kumar and pictured on Dev Anand)

तसं पाहिलं तर अनेक पार्श्वगायकांनी देव आनंदला आपला आवाज दिला आहे . मोहम्मद रफी , मुकेश , तलत मेहमूद हे तर त्याच्यासाठी गायलेच, पण मन्ना डे , जी एम दुर्रानी , सुरेंद्र आणि सी रामचंद्रांच्या आवाजात सुद्धा देव आनंदची काही अतिशय सुरेख गाणी आहेत. शिवाय देव आनंदची लोकप्रिय गाणी आठवायची झाली तर अनेकांना किशोर कुमारच्या आवाजातली त्याची गाणी चटकन आठवतील . साहजिकच आहे म्हणा , कारण दोघांनी मिळून काही अवीट गोडीची अफाट सुपर सुपर हीट गाणी दिलेली आहेत …..

पण खरंतर देव आनंदला कोणाचा आवाज सर्वात जास्त फिट्ट बसला असेल तर तो आहे हेमंतदांचा आवाज असं मला तरी प्रामाणिकपणे वाटतं . इतर पार्श्वगायकांच्या तुलनेत जरी देवआनंद आणि हेमंतदांची गाणी तशी मोजकी असली तरी हेमंतदांच्या आवाजातल्या देवला ऐकणं आणि पाहणं हा एक वेगळाच अनुभव आहे .

माझ्या माहितीप्रमाणे “सजा” (१९५१) चित्रपटात दोघे प्रथमच एकत्र आले ….यातलं

“आ गुपचूप गुपचूप प्यार करें ,

चूप चूप आँखे चार करें”

हे गाणं असंच भुरळ घालणारं.

चंद्राच्या साक्षीने आपल्याशीही कुणीतरी अशा प्रेमाच्या गुजगोष्टी गुपचूप गुपचूप कराव्या असं वाटायला लावणारं हे सुरेल गीत …….

हेमंतदांचा आवाज या चित्रपटात देवला असा काही सूट झाला की पुढील अनेक चित्रपटात हेमंतदा देवसाठी गायले ….जाल , पतिता , बादबान , मुनीमजी , हाऊस नं ४४ , सोलवा साल , बात एक रात की हे दोघांचे काही गाजलेले चित्रपट ….एक वेगळीच धुंदी चढते जेव्हा

“ये रात ये चांदनी फिर कहाँ ,

सुन जा दिल कि दास्ताँ”

म्हणत देव साद घालतो….

हेमंतदांच्या आवाजातील आर्तताच इतकी तीव्र आहे की नायिका गीता बालीचा स्वतःवर ताबा राहणं अशक्यच. नायक देवआनंदचं (टोनीचं) चित्रपटातील खरं रूप माहित असून सुद्धा ती अगतिकपणे आपणहून त्याच्या कडे ओढली जाते. “जाल” मधलं हे गाणं आजही एक सर्वोत्कृष्ट seductive song म्हणून गणलं जातं.

The best from Sahir , S .D. Burman , Hemant daa and Dev Anand .

“House No 44” चित्रपटातील गाणंही असंच. मनावर मोहिनी घालून प्रेमाच्या हळुवार दुनियेत घेऊन जाणारं . निरव रात्री जेव्हा सारं जग , धरती , चाँद , सितारे चिडीचूप असतात तेव्हा फक्त आणि फक्त त्याच्याच दिल की धडकन ऐकू येते आहे …

” चूप है धरती चूप है चाँद सितारे ,

मेरे दिल कि धडकन तुझको पुकारे “

तिच्यासाठी बेचैन झालेला तो चांदण्या रात्री तिच्या आठवणीत हरवून गेलेला आहे. आवाजातील उत्कटता इतकी धुंद करते की गाणं ऐकताना खूपदा आपला आपल्या मनावर ताबा नाही रहात. त्या मधाळ आवाजातील जादू आपल्याला आपल्याही नकळत त्या नीरव स्थळी खेचून घेऊन जाते . त्या बेचैनीतच मनाला चैन लाभतं , मन सुखावत , विसावतं आणी तिथून परतावसंच नाही वाटत .

This is again one of the best romantic songs from Sahir , S D Burman , Hemant daa and Dev Anand from ” House No 44 “.

तर ह्याच चित्रपटातलं

“तेरी दुनिया मे जीने से

तो बेहेतर है के मर जाये”

ह्या गीतातील वेदना नैराश्य पाहून काळीज गलबलून येतं.

पतिता चित्रपटातील

“याद किया दिलने कहाँ हो तुम”

ही उत्कट साद तर आजही विसरता येणं शक्य नाही. ही साद ऐकून

“प्यार से पुकारलो जहाँ हो तुम”

असा प्रतिसाद आपसूक आपल्याही ओठांवर आल्या शिवाय रहात नाही …

प्रेमात अपेक्षित असणारी एकमेकांविषयीची तळमळ, ओढ, विश्वास, आपुलकी सारं सारं काही ह्या गीतात आहे. हेमंतदा आणि लता दीदींच्या जादू भरल्या आवाजातील हे युगल गीत पडद्यावर देव आनंद आणि उषा किरण सोबत ऐकण पाहणं म्हणजे पर्वणीच. ह्या चित्रपटाची गमंत म्हणजे ह्यातली देव आनंदची इतर सगळी गाणी तलत मेहमूदने गायली आहेत. पण “याद किया दिल ने” साठी मात्र संगीतकार शंकर जयकिशन ह्यांना हेमंतदांचाच आवाज योग्य वाटला .

“बात एक रात की” ह्या चित्रपटात देखील इतर सर्व गाणी मोहम्मद रफींची आहेत आणि फक्त

“न तुम हमें जानो

न हम तुम्हें जाने

मगर लगता है कुछ ऐसा

मेरा हमदम मिल गया”

हे गाणं हेमंतदांच्या आवाजात आहे. आणि ह्या गाण्याची जी मोहिनी आजही रासिकांवर आहे ती वेगळी सांगायची गरजच नाही. गूढ स्तब्ध वतावरणाला साजेसाच हेमंतदांचा आवाज. अंतर्मनाला स्पर्शून जाणारी एक विलक्षण ओढ ह्या आवाजात जाणवते. एकमेकांची पुरेशी ओळख झालेली नसूनही एकमेकांची ओळख पटलेले, एकमेकांवर पूर्णपणे विश्वसलेले असे हे दोघं. ह्यांच्या नात्यातील उत्कटता दाखवण्यासाठी हेमंतदांच्या भारदस्त घुमावदार आवाजाला पर्यायच उरत नाही.

“सोलवा साल” चित्रपटातलं हेमंतदांनी देव आनंद साठी गायलेलं

” है अपना दिल तो आवारा ,

न जाने किसपे आयेगा “

हे गाणं म्हणजे मात्र एक सर्वस्वी वेगळाच अनुभव. यातली देवआनंदची wagabond type image आणि हेमंतदांचा एखाद्या तपस्व्या सारखा धीरगंभीर आवाज. ह्या दोन्हींचा मिलाप म्हणजे अक्षरश: total contrast. पण दोन्ही एकत्र आल्यावर जे काही रसायन तयार झालंय ते अफलातून. ती एकत्रित नशा आजही काही केल्या उतरत नाही.

थोडासा मनमौजी, थोडीशी बेफिकीरी, थोडेसे विनोदी, थोडी निराशा अशा अगदी पूर्णपणे विरुद्ध असणाऱ्या छटा ह्या गाण्यात दिसतात आणि हेमंतदांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजात ह्या गीताला अगदी पूर्ण न्याय दिलेला आहे.

मुनीमजी चित्रपटात हेमंतदांनी देव आनंद साठी गायलेली दोन्ही गाणी अगदीच वेगळ्या जॉनरची आहेत. ह्यातलं

“शिवजी बिहाने चले

पालकी सजायके

बभूती लगायके हो “

हे काहीसं उत्तरेकडील रामलीलेत वगैरे गायली जातात तशा प्रकारचं, विनोदी बाजाचं लोकगीत टाइप गाणं तर

“दिल की उमंगे है जवान

रंग मे डुबा है समा ”हे देखील प्रचंड धम्माल विनोदी गीत.

त्याच प्रमाणे “बादबान” चित्रपटातलं

“कैसे कोई जिये ,

जहर है जिंदगी

उठा तूफान वो”

हे गीत देव आनंदच्या आनंदी प्रतिमेच्या अगदी विरुद्ध आणि तरीही तितकंच श्रवणीय. आयुष्या बद्दलची विरक्ती, जळजळ, ह्यातला दर्द सारंच अस्वस्थ करणारं.

“मंझिल” मधलं “याद आ गई वो नशिली निगाहें”

” मिलाप” मधलं “ये बहारों का समां , चाँद तारो का समां “

आणि “आँधीया” मधलं “वो चाँद नहीं है दिल है किसी दिवाने का “

ही देखील देव आनंद आणि हेमंत कुमार ह्या दोघांची अतिशय सुरेल पण आज काहीशी विस्मृतीत गेलेली अप्रतिम गाणी आहेत.

हिंदी सिनेमाच्या अशाच जुन्या जमान्यातील गोल्डन इरा काळातील अधिक लेखांसाठी क्लिक करा

Nayana Pikle
+ posts

सौ नयना सतीश पिकळे

शिक्षण -
बी एस्सी रसायनशास्त्र
एम ए संस्कृत (वेदांत)
मोबाईल - ९९६७०५३९६७

एच एस बी सी बॅन्केत नोकरी (१९९२-२००३)

बी ए संस्कृतच्या खाजगी शिकवण्या .

मराठी विश्वकोशासाठी नोंदी करणे .

यशोवाणी संस्थेतर्फे अंध मुलांसाठी आॅडियो बुक्सचे रेकाॅर्डींग करणे .

सांगितिक कार्यक्रमांसाठी स्क्रीप्ट लिहिणे आणि निवेदन करणे.

सिने-संगीत व सिनेमा विषयक लेखन करणे .

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.