लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित व निर्माता दिनेश विजन यांच्या मॅडोक फिल्म्स निर्मित आगामी ‘मिमी’ या चित्रपटाचे ट्रेलर आज प्रदर्शित झाले (Mimi Film Trailer) . अभिनेत्री क्रिती सॅनोन (Actress Kriti Sanon) यात मुख्य भूमिकेत असून सोबत पंकज त्रिपाठी (Pankaj tripathi) , सई ताम्हणकर (Sai Tamhankar), मनोज पहावा, सुप्रिया पाठक  यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

मिमी हा समृद्धी पोरे निर्मित-दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘मला आई व्हायचंय’ चा अधिकृत रिमेक आहे.  ‘मला आई व्हायचंय’ या २०११ साली प्रदर्शित मराठी चित्रपटात उर्मिला कानेटकर-कोठारे ची प्रमुख भूमिका होती. सरोगसी पद्धतीने होणारी गर्भधारणा विषयावर आधारित या चित्रपटास त्या सालचा उत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय सन्मान मिळाला होता. २०१३ साली तेलगू भाषेत ‘वेलकम ओबामा’ नावाने याचा रिमेक प्रदर्शित झाला होता ज्यात उर्मिला  कानेटकर हिचीच प्रमुख भूमिका होती. ‘लुका छिपी’ या २०१९ सालच्या हिंदी चित्रपट दिग्दर्शनातील पहिल्या यशस्वी प्रयत्नानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा ‘मिमी’ हा दुसरा हिंदी चित्रपट आहे. छायाचित्रकार म्हणून खन्ना अँड ऐय्यर, इंग्लिश विंग्लिश, डिअर जिंदगी, १०२ नॉट आउट या चित्रपटांची जबाबदारी लक्ष्मण उतेकर यांनी यशस्वीरीत्या सांभाळली होती. प्रसिध्द संगीतकार ए.आर. रेहमान  यांचे संगीत मिमी चित्रपटास लाभले आहे.  

२०१९ सालीच चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले होते व २०२० साली चित्रपट प्रदर्शित करण्याची निर्मात्यांची तयारी होती मात्र कोवीड च्या प्रादुर्भावामुळे ते नियोजन लांबले. मिमी आता ३० जुलै रोजी नेटफ्लिक्स व जिओ सिनेमा वर प्रदर्शित होणार आहे. 

हेही वाचा – भुज:द प्राइड ऑफ इंडिया चे धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, बघा इथे

Website | + posts

Leave a comment