आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

The Makers of ‘The Kashmir Files’ are ready to bring the story of Kashmir genocide to the big screen! ‘द ताष्कंद फाइल्स’नंतर, निर्माता कश्मीर नरसंहार पीडीतांच्या सत्यकथेवर आधारित एक थक्क करणारा चित्रपट घेऊन परत येत आहेत.

दर्शकांना त्यावेळी काश्मीरात पसरलेला आतंकवाद आणि भयानक दहशतीची झलक देत, ‘द कश्मीर फाइल्स’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो आपल्याला काश्मीर मधील त्यावेळच्या दु:खद भावनेची रोलरकोस्टर सफर घडवतो. चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेता पल्लवी जोशी, प्रकाश बेलावडी, अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती तसेच, दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मंडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाइक अशा दिग्गजांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणतात, “काश्मीर नरसंहाराची कथा मोठ्या पडद्यावर आणणे सोपे काम नव्हते आणि ते अत्यंत संवेदनशीलतेने हाताळावे लागले. हा चित्रपट डोळे उघडण्याचे वचन देतो आणि प्रतिभावान कलाकारांच्या जोडीने, भारतीय इतिहासातील हा अध्याय वास्तविक कथनाद्वारे दर्शक पुन्हा एकदा पाहू शकतील.”

अभिनेत्री पल्लवी जोशी सांगतात, “एक चित्रपट तितकाच उत्तम असतो जितकी त्याची स्क्रिप्ट आणि द काश्मीर फाईल्सच्या सहाय्याने प्रेक्षक पात्रांच्या भावना अनुभवू शकतात आणि सहन करू शकतात ज्यातून ती पात्र गेली आहेत. प्रत्येक कलाकाराने स्वतःला त्या पात्रांमध्ये पूर्णपणे बुडवून घेतले आहे आणि ते ही धक्कादायक आणि दुःखद कथा सांगण्यासाठी वचनबद्ध आहे.”

‘द कश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले असून झी स्टुडिओज, आय एम बुद्धा आणि अभिषेक अग्रवाल आर्ट्सच्या बॅनरखाली तेज नारायण अग्रवाल, अभिषेक अग्रवाल, पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांची निर्मिती आहे.

हा चित्रपट 11 मार्च 2022 मध्ये प्रदर्शित होण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment