वास्तविक जीवनातील नायकांद्वारे प्रेरणा घेऊन काही भव्य चित्रपट निर्माण केल्यानंतर, या स्वातंत्र्यदिनी अजय देवगण बहुप्रतिक्षित युद्धपट ‘भुजः द प्राइड ऑफ इंडिया’ घेऊन येत आहे.  आज अजय देवगणने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्सद्वारे सिनेमाचेट्रेलर रिलीज केले. (Trailer of Bhuj The Pride of India Film)

ट्रेलर रिलीज करतांना ट्विट मध्ये अजय लिहितो की, ” When bravery becomes your armour, every step leads you to victory! Experience the untold story of the greatest battle ever fought, #BhujThePrideOfIndia. Trailer out now. Releasing on 13th August only on Disney Plus Hotstar Multiplex”

१९७१ च्या भुज एअरबेस वर पाकिस्तानसोबत लढल्या गेलेल्या युद्धाच्या दृश्यांच्या पार्श्वभूमीवर या देशभक्तीने भारावलेल्या अशा ट्रेलर मध्ये अत्यंत उत्कंठावर्धक दृश्यांची रेलचेल दिसून येते. ट्रेलरवरून सिनेमा अत्यंत उत्तम दर्जाचा असणार याची खात्री वाटते. १५ ऑगस्टच्या देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात सिनेमा प्रदर्शित होत असल्याने निश्चितच भुज हा एक वेगळा अनुभव असणार आहे. 

या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, अम्मी विर्क, नोरा फतेही आणि शरद केळकर हे देखील मुख्य भूमिकेत आहे. इंडियन एअर फोर्सच्या भुज एअर बेसचे स्क्वॉड्रॉन विजय कर्णिक यांच्या शौर्याची कथा आपल्याला यात बघायला मिळणार आहे. तानाजी नंतर अजय देवगण पुन्हा एकदा यात एक वीर मराठ्याच्या भूमिकेत दिसून येणार हे त्याच्या ट्रेलरमधील ‘मराठा मरता है या मारता है’ या संवादावरून लक्षात येते. संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या सुद्धा चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत हे ट्रेलर बघितल्यावर दिसून येत आहे. 

टी-सीरिज आणि अजय देवगण फिल्म्स प्रस्तुत, ‘भुज: प्राइड ऑफ इंडिया’ची निर्मिती भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, गिन्नी खानुजा, वजीर सिंग आणि बनी संघवी यांनी केली आहे. अभिषेक दुधैया दिग्दर्शित अभिषेक दुधैया, रमण कुमार, रितेश शहा आणि पूजा भवोरिया हे चित्रपटाचे लेखक असून हा चित्रपट १३ ऑगस्ट २०२१ रोजी फक्त डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपी वर रिलीज होणार आहेत.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.