कोविड च्या या संकटात अनेक कलाकारांनी आपापल्या परीने लोकांना मदतीचे काम जोमाने सुरु ठेवले आहे. यात आता मेगास्टार अमिताभ बच्चन यांची भर पडली आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी नुकतेच दिल्लीच्या श्री गुरु तेग बहादुर कोविड केअर सेंटरला  रु. २ कोटी मदत म्हणून दिले आहेत. (Amitabh Bachchan donates Rs. 2 crore to Delhi’s Sri Guru Tegh Bahadur Covid Care Centre)

अकाली दल पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते असलेले मनजिंदरसिंग सिरसा यांनी ट्विटरवर अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या निधीबद्दल माहिती देतांना लिहिले आहे की, ‘शीख धर्मीय हे महान लोकं आहेत, त्यांच्या कार्याला सलाम’. हे अमिताभ बच्चन यांचे शब्द होते जेंव्हा त्यांनी २ कोटी रुपयांचा निधी अर्पण केला. “‘Sikhs are Legendary, Salute To Their Service’. These were the words of Amitabh Bachchan when he contributed Rs 2 crore to Sri Guru Tegh Bahadur Covid Care Facility.”  

 

अमिताभ बच्चन लवकरच ‘कौन बनेगा करोडपती’ च्या पुढच्या म्हणजेच १३व्या पर्वाच्या  शूटिंगला सुरुवात करणार आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासमवेत अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात ते दिसणार आहेत. शिवाय  इमरान हाश्मी आणि रिया चक्रवर्ती यांच्यासमवेत त्यांचा चित्रपट ‘चेहरे’ सुद्धा प्रदर्शनास तयार असून सध्या कोविड परिस्थितीमुळे ते लांबणीवर टाकण्यात आले आहे.  अभिनेता अजय देवगण दिग्दर्शित ‘मे डे’, नागराज मंजुळेचा ‘झुंड’, नाग अश्विनचा पुढचा चित्रपट आणि ‘द इंटर्न’ रीमेक या चित्रपटातही ते काम करीत आहेत. 
Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.