-विवेक पुणतांबेकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Happy Birthday to Veteran Indian actress, dancer and parliamentarian Vyjayanthimala. “तुम्हे याद करते करते जायेगी रैन सारी…” ‘आम्रपाली’ मधले गाणे ऐकले की डोळ्यासमोर उभी रहाते नृत्यांगना अभिनेत्री वैजयंतीमाला. आपल्या दमदार अभिनयाने सर्वांना मोहवून टाकणारी आणि वेळीच निर्णय घेऊन संसारात रमणारी अश्या वैजयंतीमाला चा जीवन प्रवास मोठा रंजक आहे. तामिळनाडु च्या पार्थसारथी मंदिराजवळ असलेल्या त्रिप्लीकेन गावातल्या एका अयंगार ब्राम्हण कुटुंबात वैजयंतीमाला चा जन्म झाला. वसुंधरादेवी आणि मध्यमधती रामन हे तिचे आई-वडिल. पण वैजयंती चे सारे बालपण आपल्या आजीकडे यदुगिरी देवी कडे गेले. वैजयंतीमाला चे पूर्वज मैसूर चे होते. तिची आई तामिळ सिनेमातली आघाडीची नायिका होती. तिने पहिल्यांदा अभिनय केलेला सबाथम (१९४०) हा तामिळमधला पहिला सुपरहीट सिनेमा. वयाच्या चोथ्या वर्षी वैजयंतीमाला ला दहावे पोप यांच्या सन्मानार्थ रोमला व्हॅटिकन सिटीत केलेल्या समारंभात भरतनाट्यम सादर करायची संधी मिळाली.

वैजयंती चे शालेय शिक्षण चेन्नई च्या चर्च पार्क काॅन्वेंट मध्ये झाले. वझहूर रमिहा पिल्ले यांच्याकडून ती भरतनाट्यम शिकली तर कर्नाटक संगीताचे शिक्षण तिने मक्कल सिवराजा अय्यर यांच्या कडून घेतले. वयाच्या १३ व्या वर्षी अरेंगत्रम सादर केले आणि तामिळनाडू मध्ये भरतनाट्यम चे कार्यक्रम करायला सुरुवात केली. तिचे आजोबा मध्यमधती गोपालाचार्य यांनी नारायण शास्री रोड मैसूर येथे १९३८ साली नर्सिंग होम सुरु केले. चेन्नईच्या गोखले हाॅलमध्ये एकदा वैजयंती चा कार्यक्रम होता. सिने दिग्दर्शक एम.वी. रामन आपल्या सिनेमासाठी एका नव्या अभिनेत्रीच्या शोधात होते. ते या कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी वैजयंती ला आपल्या सिनेमात अभिनय करायला बोलावले. तिची आजी यदुगिरीदेवी ने सुरुवातीला विरोध केला. आपली नात वयाने फार लहान आहे आणि यामुळे तिचे शिक्षण खंडीत होईल अशी तिला भीती वाटत होती. पण एम.वी. रामन यांनी यदुगिरीदेवींना समजावले व त्यांची परवानगी मिळवली. वज्जकई हा तिचा पहिला सिनेमा. यात तिने एका काॅलेज सुंदरी चा अभिनय केला होता. या सिनेमाला लाभलेल्या यशानंतर याचा तेलगू भाषेत रिमेक केला (जीवीथम) वैजयंतीने यात अभिनय करताना आपल्या वडिलांकडून तेलगू भाषा शिकून घेतली. इतके प्रभुत्व मिळवले की डबींग साठी कोणाचीही मदत घ्यावी लागली नाही. १९५० सालच्या विजयाकुमारी या सिनेमात तिने एक छोटीसी भुमिका केली. जरी हा सिनेमा फारसा यशस्वी झाला नाही तरी तिने केलेलू पाश्चात्य पध्दतीचे नृत्य प्रेक्षकांना फार आवडले.

वज्जकई ला मिळालेल्या यशामुळे एम.वी. रामन यांनी १९५१ साली हा सिनेमा हिंदी मध्ये बहार नावाने निर्माण केला. हा तिचा पहिला हिंदी सिनेमा. यात तिचा नायक होता करण दिवान. संगीतकार होते एस.डी. बर्मन. गीतकार आणि पटकथाकार होते राजेंद्रकृष्ण. बहार पासून वैजयंती आणि राजेंद्रकृष्ण यांच्यात मैत्री झाली. या सिनेमाच्या वेळी त्यांनी वैजयंतीला सल्ला दिला की तुझ्या उच्चारांवरची दाक्षिणात्य छाप काढण्यासाठी एखाद्या हिंदी पंडिताची शिकवणी सुरु कर. तिने त्याप्रमाणे बनारसच्या पंडिताची शिकवणी सुरु केली. हिंदी मध्ये आलेल्या दाक्षिणात्य अभिनेत्रींमध्ये वैजयंतीचे हिॅदी उच्चार निर्दोष होते. बहार सिनेमा यशस्वी झाला.

बहार च्या यशानंतर वैजयंतीने परत एकदा ए.वी. एम प्राॅडक्शनस च्पा बहुभाषिक सिनेमात अभिनय केला. पेन्न हा तिचा शिवाजी गणेशन आणि अंजली देवी बरोबरचा हा सिनेमा खूप गाजला. हाच सिनेमा तेलगू भाषेत संघम नावाने निर्माण झाला. वैजयंतीने अभिनय केलेले हे दोन्ही सिनेमे गाजले. हाच सिनेमा किशोरकुमार भारत भूषण आणि वैजयंतीमाला यांना घेऊन हिंदी मध्ये लडकी (१९५३) नावाने निर्माण झाला. यशस्वी झाला. यातली तिची नृत्ये पण खूप लोकप्रिय झाली. १९५४ साली फिल्मिस्तान निर्मित नागिन सिनेमा प्रदर्शित झाला. वैजयंतीमाला प्रदिप जोडीचा हा सिनेमा प्रचंढ यशस्वी झाला. यातली वैजयंतीमाला ची नृत्ये रंगीत होती. नागिन च्या यशामुळे वैजयंती आघाडीची नायिका बनली. त्याच वर्षी किशोर कुमार बरोबर मिस माला या सिनेमात वैजयंती ने अभिनय केला. हा सिनेमा पण प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला. कन्नड सिनेमा आशा निराशा मध्ये वैजयंतीने अभिनय केला. पण हा तिचा प्रथम कन्नड सिनेमा अपयशी झाला.

१९५५ ला ५ हिंदी सिनेमात वैजयंतीमाला ने अभिनय केला. यास्मिन, पहली झलक, सितारा, जसन आणि देवदास. देवदास मधली तिने साकारलेली चंद्रमुखी ची भुमिका प्रभावी होती. ही भुमिका नर्गिस, बीना राय आणि सुरैय्याने नाकारली होती. तिची चंद्रमुखीच्या भुमिकेसाठी झालेली निवड निर्माते दिग्दर्शक बिमल राॅय यांच्या निकटवर्तीयांना पण फारशी आवडली नव्हती. या भुमिकेसाठी वैजयंतीला मिळालेला सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार तिने नाकारला कारण तिच्या मते चंद्रमुखी ची मध्यवर्ती भुमिका होती.देवदास फारसा यशस्वी झाला नाही.

१९५६ साली ताज, पटरानी, अनजान, किस्मत का खेल, देवता (तामिळ सिनेमा कनावनेय कंकडा देवीम चा हिंदी रिमेक) या हिंदी सिनेमात वैजयंती ने अभिनय केला. देवता मधली तिची नकारात्मक भुमिका आणि नृत्ये पण गाजली. सोहराब मोदींच्या राजहठ सिनेमातली भुमिका व्यस्त कामांमुळे तिने नाकारली. ती भुमिका नंतर मधुबाला ने केली. या नंतर किशोरकुमार सह अभिनय केलेल्या नई दिल्ली सिनेमात तिने अभिनय केला. पंजाबी मुलगा आणि दाक्षिणात्य मुलगी यांची धमाल प्रेमकथा असलेला, शंकर जयकिशन च्या मधुर संगीताने नटलेला हा सिनेमा खूप यशस्वी झाला. याच वर्षी मर्मा वीरन या तामिळ सिनेमात पण तिने भुमिका केली.

१९५७ साली नया दौर सिनेमाच्या वेळी झालेल्या वादामुळे आणि कोर्टबाजीमुळे त्रस्त झालेल्या बी.आर.चोप्रांनी मधुबाला ला काढून ती भुमिका वैजयंतीला दिली. या पूर्वी वैजयंतीने दिलिपकुमार बरोबर देवदास सिनेमात अभिनय केलाच होता. हा सिनेमा अविस्मरणीय ठरला. यशस्वी ठरला. फिल्मीस्तान च्या तुमसा नही देखा साठी आधी देवानंद वैजयंती जोडीला घेतले होते. पण नंतर हा सिनेमा शम्मी अमिताला घेऊन निर्माण केला. याच वर्षी तिने अमिया चक्रवर्ती यांच्या कठपुतली मधली नृत्यप्रधान नायिकेची भुमिका स्वीकारली. सिनेमा अर्धवट असतानाच अमिया गेले. मग नितिन बोस नी हा सिनेमा पुर्ण केला. शंकर जयकिशन च्या मधुर संगीताने आणि वैजयंतीच्या अभिनयाने हा सिनेमा यशस्वी झाला. १९५८ ला राजेंद्रकुमार आणि प्रदिपकुमार बरोबर एक झलक सिनेमा, किशोरकुमार बरोबर आशा ( यातले वैजयंतीमाला चे गाणे इना मिना डिका रंगीत होते.)

१९५८ साली आलेल्पा जन्मजन्मांची कहाणी सांगणार्‍या आणि जास्तीत जास्त फिल्मफेअर बक्षिसे मिळवणार्‍या मधुमती सिनेमात वैजयंतीने ३ भुमिका साकारल्या. (मधुमती, राधा आणि मधुमती चा आत्मा) नैनिताल ला बाह्यचित्रणाच्या वेळी पायाला दुखापत झालेली असताना सुध्दा तिने चित्रण पूर्ण केले. मधुमती चे चित्रण संपले तरी तिचा पाय बरा झाला नव्हता. ५० च्या दशकात सर्वाधिक अधिक उत्पन्न असलेल्या सिनेमात मधुमती चा पाचवा नंबर लागतो. या वर्षी बी.आर चोप्रा यांच्या साधना सिनेमात वैजयंतीने गणिकेची भुमिका केली. हे एक प्रकारचे साहस होते. साधना यशस्वी झाला.त्याच वर्षी फिल्मफेअर मध्ये सर्वोकृष्ट अभिनेत्रीची दोन नामांकने वैजयंतीने मिळवली. मधुमती आणि साधना. साधनासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या वर्षी देवानंद बरोबर अमरदीप ( तामिळ फिल्म अमरा दिपम चा रिमेक), सितारोंंसे आगे आणि पिया मिलन या सिनेमात तिने अभिनय केला. जेमिनी गणेशन यांच्या बरोबर वंज्जकोटाई वलिबन या तामिळ सिनेमात वैजयंतीमाला ने भुमिका साकारली. याचाच हिंदी रिमेक राज तिलक नावाने प्रदर्शित झाला पण तामिळ सिनेमा इतके यश याला लाभले नाही. दिलिपकुमार वैजयंतीमाला ही जोडी एस.एस. वासन यांच्या पैगाम सिनेमात परत एकत्र आली. यात वैजयंतीमालेच्या आईने वसुधंरादेवी ने पण अभिनय केला. हा सिनेमा यशस्वी झाला. प्रदिपकुमार सह जवानी की हवा सिनेमात वैजयंती ने काम केले. हे वर्ष होते १९५९. १९६० मध्ये मात्र वैजयंतीने जास्तीत जास्त तामिळ सिनेमातच अभिनय केला. शम्मी कपूर बरोबर तिने केलेला सिनेमा काॅलेज गर्ल बर्‍यापैकी धंदा करुन गेला.

दिलीपकुमार वैजयंतीमाला ही जोडी परत एकत्र आली गंगा जमना सिनेमात या साठी तिने भोजपुरी भाषा आत्मसात केली. ही तिची भुमिका एकदम प्रभावी होती. गंगा जमना १९६१ चा सर्वाधिक उत्पन्न देणारा सिनेमा होता. तिला १९६१ चा सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार गंगा जमना साठी मिळाला. या वर्षी राजकपूर बरोबर नझराना (तामिळ सिनेमा कल्याणा परिसु चा हिंदी रिमेक) सिनेमात तिने काम केले. नंतर जे.ओमप्रकाश यांच्या आस का पंछी मध्ये तिचा नायक होता राजेंद्रकुमार. मनोजकुमार सह अभिनय केलेला डाॅक्टर विद्या ( मराठी सिनेमा शिकलेली बायको ) रंगोली, झुला या सिनेमांना फारसे यश लाभले नाही. बंदिनी मधली भुमिका तिने नाकारली. १९६२—६३ या दोन वर्षात फारसा प्रभाव न पाडणार्‍या वैजयंतीला १९६४ च्या संगम मध्ये राजकपूरनी तिला निवडले. या सिनेमाने इतिहास घडवला. त्यावर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार संगम साठी तिला मिळाला. दिलिपकुमार सह अभिनय केलेला तिचा लिडर सिनेमा अपयशी झाला. रामानंद सागर यांच्या जिंदगी सिनेमात, फूलोकी सेज, इशारा असे तिचे सिनेमे १९६४ ला प्रकाशित झाले.

१९६५ साली आलेले सिनेमा नया कानून अपयशी ठरला. नाम इरुवार हा तिचा शेवटचा तामिळ सिनेमा याच वर्षी आला. १९६६ चा तिचा सिनेमा दो दिलोकी दास्तान अपयशी झाला तर राजेंद्रकुमार बरोबरचा सूरज अविस्मरणीय आणि यशस्वी झाला. आम्रपाली या लेख टंडन यांच्या महत्वाकांक्षी सिनेमा आम्रपाली मध्ये तिने भुमिका साकारली. आम्रपाली अपयशी झाला. १९६७ साली राम और श्याम मधून दिलीपकुमार बरोबर झालेल्या वादामुळे तिला काढून टाकले. देवानंद अशोककुमार यांच्या बरोबर तिने अभिनय केलेला जुवेल थिफ सिनेमा खूप गाजला. उत्तमकुमार बरोबर छोटीसी मुलाकात बरोबर तिने काम केले. हा सिनेमा अपयशी झाला. या वर्षी तिने अशोककुमार यांच्या बरोबर हटे बाजारे या बंगाली सिनेमात अभिनय केला ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९६८ साली संघर्ष, साथी, दुनिया हे सिनेमे तिला मिळाले. या नंतर तिने सिनेसृष्टीचा निरोप घेतला. 

हिंदी चित्रपटाच्या गोल्डन इरा काळातील इतर लेखांसाठी क्लिक करा

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.