विराजस कुलकर्णी-गौतमी देशपांडे यांच्या केमिस्ट्रीवर चाहत्यांनी लावले ‘मेड फॉर इच अदर’लेबल!

झी मराठीच्या ‘माझा होशिल ना’ मधल्या आदित्य आणि सई प्रमाणे विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे यांच्या केमिस्ट्रीवर चाहत्यांनी लावले ‘मेड फॉर इच अदर’चे लेबल! विराजस कुलकर्णी ने दिली मजेदार प्रतिक्रिया!

चाहत्यांना मालिकेतील पात्र आणि त्यांच्या व्यक्तिरेखा आणि कथांबद्दल नेहमीच रंजक आणि सुरस असे पाहायचे, ऐकायचे असते. झी मराठीच्या ‘माझा होशिल ना’ला मध्ये चाहत्यांना अशाच काही आकर्षक गोष्टी सापडल्या आहेत ज्या आपल्या रम्य कथानकातून आणि रंजक पात्रांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहे. अल्पावधीतच आदित्य आणि सई यांचे नाव प्रत्येक चाहत्याच्या तोंडी बसले असून विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे या लोकप्रियतेचा आनंद अनुभवत आहेत.

सोशल मिडीयावरील वेगवेगळ्या माध्यमांमुळे चाहते आणि त्यांचे आवडते तारेतारका यांच्यातील अंतर कमी झाले आहे. विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे यांचा देखील सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. आणि दोघेही आपल्या व्यस्त उपक्रमांतून वेळ काढून आपल्या चाहात्यांशी संवाद साधत असतात. नुकतेच एका चाहत्याशी विराजसचा मजेदार संवाद नेटिझन्सच्या पसंतीस उतरत आहे.

झी मराठीच्या ‘माझा होशिल ना’ या मालिकेमधून आगामी रोमँटिक ट्रॅकची झलक शेअर करताना विराजसने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यावर त्याने लिहिले, “माझे डीएम या बीजीएम ट्रॅकसाठीच्या विनंत्यांनी भरले आहेत, म्हणून आम्ही त्याला एका पूर्ण गाण्यामध्ये बदलले आहे!”

यावर एका चाहत्याने प्रतिक्रिया देताना लिहिले की, “विराजस आणि गौतमी एकमेकांसाठी बनले आहेत जसे की आदित्य आणि सई.” या टिप्पणीवर विराजसने ‘शक्तीमान’चा संदर्भ देत लिहिले की,“मला आठवते, पूर्वी जेव्हा लोक छप्परांवरुन उडी मारून शक्तीमान आपल्याला अलगद झेलेल आणि जमिनीवर उतरवेल अशी वाट पहायचे. रील आणि रिअल जीवन खूप भिन्न आहे.” त्याच्या विनोदी आणि मार्मिक उत्तरावर नेटकरी आणि चाहते जाम खुश आहेत.

सोशल मीडियावरील चाहत्यांशी नुकत्याच झालेल्या संवादात विराजस आणि गौतमी यांनी उघड केले की प्रेक्षकांसाठी ‘माझा होशिल ना’ या मालिकेत या आठवड्यात बरीच आश्चर्ये असणार आहेत आणि पुढच्या कथेसाठी आगामी भाग महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

दरम्यान, ‘माझा होशिल ना’ च्या सध्याच्या घटना आदित्य आणि साई यांनी एकमेकांबद्दलच्या आपल्या भावना कबूल केल्याभोवती फिरतील. तथापि, उलगडण्यासारखे बरेच काही आहे आणि याच उत्सुकतेने दर्शकांना या मालिकेकडे आकर्षित केले आहे. तसेच, येत्या दापोली सबप्लॉटने एका नवीन अध्यायची सुरूवात करण्याचे आश्वासन प्रेक्षकांना दिले असल्याने प्रेक्षक आनंदित आहेत. त्यामुळे आगामी भागांमध्ये कथा कशी पुढे जाते हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल. ‘माझा होशिल ना’चे आगामी भाग झी मराठी तसेच झी5वर पाहता येतील.

झी मराठीच्या ‘माझा होशिल ना’चे सर्व भाग एक दिवस आधी पहा झी5 क्लबवर!

(Press Release)

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.