अभिनेता धनुष च्या चाहत्यांसाठी एक अत्यंत मोठी व आनंदाची बातमी आहे. ‘आडूकलाम’ आणि ‘रांझना’ सारख्या चित्रपटांचा लोकप्रिय अभिनेता धनुष आता रायन गॉसलिंग आणि ख्रिस इव्हान्स-स्टारर व अव्हेंजर्स या सुप्रसिद्ध सिनेमांच्या निर्मात्यांच्या आगामी ‘द ग्रे मॅन’ या बिग बजेट आंतराष्ट्रीय इंग्रजी सिनेमात प्रमुख भूमिकेत चमकणार आहे. 

dhanush

ऍंथोनी आणि जो रसो या जोडीचा हा आगामी नेटफ्लिक्स चित्रपट याच नावाच्या मार्क ग्रीनीच्या २००९ सालच्या कादंबरीवर आधारित असून एक सस्पेन्स थ्रिलर असणार आहे. याबाबतची घोषणा करतांना नेटफ्लिक्सने ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, नार्कोस स्टार वॅग्नर मौरा, वन्स अपॉन ए टाईम इन हॉलिवूड चा बाल कलाकार ज्युलिया बटर आणि गेम ऑफ थ्रोन्सची जेसिका हेनविक यांच्यासह धनुष या सिनेमाच्या प्रमुख कलाकारांमध्ये दिसेल. या कलाकारांच्या पात्रांबद्दल अद्याप  खुलासा करण्यात आलेला नाही. ग्रे मॅनमध्ये अभिनेत्री ऍना डी आर्मास देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

grey man netflix movie

जेम्स बाँड सिरीज सारखी, 200 दशलक्ष डॉलर्सच्या बजेटची ही नवीन फ्रँचायझी तयार करण्याची नेटफ्लिक्स ची योजना आहे. जो रस्सोने अ‍ॅव्हेंजर्स: एंड गेम चे पटकथा लेखक क्रिस्तोफर मार्कस व स्टीफन मॅकफिलीयांच्यासोबत या सिनेमाची पटकथा लिहिली आहे. चित्रपटाचे शूटिंग जानेवारी २०२१ मध्ये लॉस एंजेलिस येथून सुरु करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे. धनुषने यापूर्वी केन स्कॉट दिग्दर्शित ‘द एक्स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर’ या इंग्रजी भाषेतील चित्रपटात भूमिका केली आहे.

grey man dhanush

सध्या तो अक्षयकुमार आणि सारा अली खान यांच्यासमवेत आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ वर काम करत आहे.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.