भारताची क्लायमेट चॅम्पियन नात्याने भूमीने ‘काउंट अस इन’ सोबत केली भागीदारी. 

गेल्या काही काळामध्ये भूमी पेडणेकर या अभिनेत्रीने भारतात हवामान परिवर्तनाकडे सातत्याने लोकांचे लक्ष वेधले आहे. पर्यावरणासंदर्भात जागृत नागरिक असलेल्या भूमीने ‘क्लायमेट वॉरियर’ हा सुप्रसिद्ध ऑनलाईन आणि ऑफलाइन उपक्रम सुरू केला असून त्याद्वारे ती भारताच्या नागरिकांना पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी योगदान देण्यासाठी एकत्रित करत आहे. यासंदर्भातील जागतिक उपक्रम ‘काउंट अस इन’ ची भूमी आता सक्रीय सदस्य बनणार असून, हा उपक्रम विविध संघटनांनी एकत्र येऊन सुरू केला आहे आणि युनायटेड नेशन्स च्या माजी हवामान प्रमुख क्रिस्टियाना फिग्युअर्स यांचे समर्थन यास आहे. भूमीची स्टबर्न ऑप्टिमिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे – जी हवामानातले कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी भारतीयांना प्रशिक्षण आणि प्रेरणा देईल व सोबत कार्य करेल. यात ‘क्लायमेट वॉरियर’ हा भूमीचा  उपक्रम देशभरातील भारतीयांना जोडण्यासाठी आणि शिक्षणासाठी  ‘काउंट अस इन’ बरोबर काम करेल.

bhumi pednekar climate warrior

याबद्दल बोलतांना भूमी म्हणते की, “पर्यावरणाचे रक्षण करणे हे आता  माझ्या आयुष्याचे मुख्य उद्दिष्ट बनले आहे आणि हवामान बदलांविषयी भारतामध्ये अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘काउंट अस इन’ बरोबर भागीदारी करण्याचा मला विशेष आनंद झाला आहे. ख्रिस्तियाना फिगर्स या अत्यंत प्रेरणादायक व्यक्ती आहेत ज्यांनी आपले जीवन पृथ्वीला वाचवण्यासाठी समर्पित केले आहे. भारतात या विषयावर त्यांच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. माझा वाटते की या नाजूक विषयावर भारतीय तरुणांनी पुढे येणे खूप गरजेचे आहे. आपण सर्वांनी आपल्या ग्रहाच्या रक्षणासाठी निरंतर प्रयत्न केले पाहिजेत कारण प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर आपल्याकडे प्लॅनेट बी नाही.” 

 

‘काउंट अस इन’ आणि भूमीचा उपक्रम ‘क्लायमेट वॉरियर’ स्थानिक लोकांना आणि संघटनांना मनापासून तयार करण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. हवामानातील बदलापासून त्यांच्या प्रिय गोष्टींचे संरक्षण करणार्‍या या चळवळीचा लोकांना भाग बनविणे हे उद्दिष्ट यात ठरविण्यात आले आहे. ‘काउंट अस इन’ हा लोकांचा आणि संघटनांचा एक असा समुदाय आहे जे आपल्या प्रिय गोष्टींना हवामान परिवर्तना पासून वाचवण्यासाठी व्यावहारिक पावले उचलेल. पुढील दशकात, जगभरातील १०० कोटी लोकांना प्रेरणा देण्याचे उद्दीष्ट या संस्थेचे आहे. 

Website | + posts

Leave a comment