‘ये रिश्ता क्या केहलाता है’ मालिकेची सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भटनागर हिचे आज निधन झाले. दिव्या कोविड -१९ पासून त्रस्त होती व महिन्याभरापासून व्हेंटिलेटरवर होती. अभिनेत्री शिल्पा शिरोडकर ने आज ट्विटर व इंस्टाग्राम वरून तिच्या निधनाची बातमी कळविली. २ नोव्हेंबरला तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तिची आई आणि तिचा भाऊ तिची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच दिल्लीहून मुंबईत आले होते. तिचा भाऊ देवाशीषने नुकताच खुलासा केला होता की, दिव्याला कोरोना होण्याआधी ती न्यूमोनियाने ग्रस्त होती.

 

दिव्या भटनागरला ‘तेरा यार हूं मैं’चे शूटिंग चालू होते तेव्हा तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. कोरोना टेस्ट केल्यावर ती पॉझिटिव्ह आली होती. तिने ये रिश्ता क्या केहलाता है, उडान, जीत गयी तो पिया मोरे, सावरे सबके सपने, सेठजी आणि विष सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये देखील काम केले आहे.  

दिव्या भटनागर ला नवरंग रुपेरी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 

Website | + posts

1 Comment

  • admin
    On December 9, 2020 9:24 pm 0Likes

    Thanks for your precious comments

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.