© विवेक पुणतांबेकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

परवा एका वाहिनीवर जुन्या गाण्यांच्या कार्यक्रमात ‘ज्युली’ मधले ‘ये राते नयी पुरानी’ लागले. ऐन तारुण्यातली रिटा भादुरी (Actress Rita Bhaduri) दिसली आणी या देखण्या अभिनेत्रीच्या आठवणी जागवल्या. अनेक जण तीला जया भादुरी ची बहिण समजायचे. पण या दोघींचे नाते अजिबात नाही. जया भादुरीच्या बहिणीचे नाव रिटा आहे पण ती अभिनेत्री नाही. ती राजीव वर्मा या चरित्र अभिनेत्याची पत्नी. अभिनेत्री रिटा भादुरी अविवाहित होती. (Remembering Rita Bhaduri known for her acting in Hindi and Gujarati Cinema and Television Shows)

रिटा भादुरी चे वडिल रमेश चंद्र भादुरी ब्रिटीश राजवटीत इस्टेट कमिशनर होते. नोकरी निमित्ताने मध्य भारतात अनेक ठिकाणी जावे लागे. अखेरीस ते इंदोर ला स्थायिक झाले. तिच्या आईचे नाव चंद्रिमा भादुरी. तीने पण सिने अभिनेत्री होती. ११ जानेवारी १९५० ला इंदोर मध्ये रिटा भादुरी चा जन्म झाला. तीन बहिणी आणि एक भाऊ. यात सगळ्यात लहान रिटा. १९५७ साली भादुरी कुटुंब मुंबई पहायला आले. मुंबई इतकी आवडली की कायमचे मुंबईला स्थायिक झाले. छोटी रिटा सात वर्षाची होती. मुंबईत आल्यावर तिच्या आईला नवनीत या हिंदी मासिकात सहसंपादकाची नोकरी मिळाली. अनेक बंगाली परिवाराशी भादुरी कुटुंबाचा संबंध आला. यातूनच दुर्गा पुजा उत्सवातल्या सांस्कृतिक कार्यक्रमात भादुरी कुटुंबाचा सक्रिय सहभाग सुरु झाला. अश्याच एका कार्यक्रमात निर्माता दिग्दर्शक नितिन बोस आणि बिमल राॅय यांना चंद्रिमा भादुरी यांचे नाटकातले काम फार आवडले आणि त्यांनी आपल्या सिनेमात काम करायची आॅफर दिली. नितिन बोस यांच्या नर्तकी आणि बिमल राॅय यांच्या बंदिनी सिनेमात चंद्रिका भादुरी यांनी भुमिका केल्या. हे दोन्ही सिनेमे १९६३ साली रिलीज झाले. बंदिनी मधला वाॅर्डन ची भुमिका खूप गाजली. यानंतर त्यांना आॅफर्स आल्या. तिसरा कौन, रिश्ते नाते, शराफत, सावन भादो, नन्ही कलियां, लाल पथ्थर , आनंद आश्रम अश्या तीस सिनेमात त्यांनी अभिनय केला.

साहजिकच आई प्रमाणे सिनेमात अभिनय करावा असे रिटाला वाटू लागले. काॅलेज जीवनात अनेक नाटकात ती काम करायची. १९७१ साली तिने पुण्याच्या फिल्म इंस्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतला. गायक शैलेंद्र सिंग, शबाना आझमी , कवंलजीत सिंग हे तिच्या बॅच चे सहकारी होते. दोन वर्षाचाा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर तिला पहिला सिनेमा मिळाला आयना. १९७४ सालच्या राजेश खन्ना मुमताज जोडीच्या या सिनेमाचे दिग्दर्शक होते के.बालचंद्र आणि संगीतकार होते नौशाद. याच वेळी तिच्या बॅच मधला सहकारी मोहन शर्मा ने दाक्षिणात्य नामवंत दिग्दर्शक सेतुमाधव शी ओळख करुन दिली. त्यांनी आपल्या कन्याकुमारी या मल्याळम सिनेमात रिटाला प्रमुख भुमिका दिली. नायकाच्या भुमिकेत होते कमल हासन. या नंतर सेतुमाधवन आपल्या मल्याळी सिनेमा चट्टकारी चा हिंदी रिमेक ज्युली करत होते. यात रिटाला महत्वाची भुमिका दिली. ज्युली चे संगीत गाजले. यातले रिटा वर चित्रित झालेले ये राते नयी पुरानी लोकप्रिय झाले. पण बहिणीची भुमिका केल्यामुळे चरित्र भुमिकेचा शिक्का कायम बसला. उधार का सिंदूर, प्रतिमा और पायल, अनुरोध सिनेमात तिने चरित्र अभिनेत्री च्या भुमिका केल्या. पण याच वेळी एका घटनेने रिटा गुजराती सिनेमात टाॅप हिराॅईन बनली. तिचाच एक सहकारी परेश मेहता ने गुजराती सिनेमातले दिग्गज दिगंत ओझा आणि निरंजन मेहता यांच्याशी ओळख करुन दिली. या दोघांनी लाखो फुलनी सिनेमात तिला हिराॅईन चा रोल दिला. १९७६ सालचा हा सिनेमा तुफान यशस्वी झाला आणि रिटा गुजराती मधली टाॅप हिराॅईन बनली.

सतत आठ वर्षं कुलवधू, डिकरी अने गाय डोरे त्या न जाय, काशीनो डिकरो, दियार भोजायी, जुगल जोडी अश्या अनेक यशस्वी गुजराती सिनेमात रिटा टाॅप हिराॅईन होती. यामुळे ती वडोदरा येथे स्थायिक झाली. इथे तिच्या कारकिर्दीला वेगळे वळण लागले. १९८४ साली निर्माता दिग्दर्शक राकेश चौधरी तिच्या घरी आले. बनते बिगडते या दूरदर्शन मालिकेत महत्वाचा रोल दिला. दूरदर्शन मालिकांचा सुरवातीचा काळ होता. दूरदर्शन च्या रिटा ने काम केलेल्या या मालिकेने दूरदर्शन विश्वात ही ती लोकप्रिय झाली. खानदान, मुजरिम हाजीर हो, तारा, कुमकुम, संजीवनी, हद कर दी ,एक महल हो सपानो का, भागोवाली, एक नयी पहचान या मालिकांमुळे रिटा घरोघर पोहोचली. तिच्या मृत्युच्या वेळी पण तिने काम केलेली सिरीयल निमकी मुखिया दाखवली जात होती ज्यात ती दादी च्या भुमिकेत होती. या शिवाय तिने युध्दपथ, बेटा, आतंक ही आतंक, घर जमाई, रंग, कभी हां कभी ना, राजा आणि विरासत या सिनेमात अभिनय केला.

रिटा च्या मोठ्या बहिणीचा राका चा नवरा कॅमेरामन आहे. चक्र, गहराई, बागबान, बाबूल सिनेमाची फोटोग्राफी त्यांची होती. मधली बहिण रुमा सेनगुप्ता टाईम्स आॅफ इंडिया आणि धर्मयुग मासिकासाठी उपसंपादक म्हणून काम केले होते. नन्ही कलिया सिनेमात भुमिका केली. कही किसी रोज मालिकेत अभिनय केला. ना घर का ना घाट का हा तिचा शेवटचा सिनेमा जो २०१० ला रिलीज झाला. रुमा चा नवरा जाहिरात संस्थेसाठी काम करत असे. रुमा चा २०१३ साली मृत्यु झाल्यावर तो कलकत्ता येथे स्थायिक झाला. रिटा चा भाऊ रणदेव भादुरी गुजराती सिनेमात नामवंत कॅमेरामन आहे. वडोदरा येथे रहातो. रिटा चे वडिल १९८० ला गेले आणि आई १९९७ ला गेली. रिटा डायबेटीस ने त्रस्त होती. यात तिच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या. जुलै २०१८ ला तिला हाॅस्पिटल मध्ये आय.सी.सी.यु त अॅडमिट केले. १७ जुलै २०१८ ला ही देखणी अभिनेत्री आपल्यातून निघून गेली.

हेही वाचा – माई री…मैं कासे कहूँ पीर अपने जिया की..मदन मोहन यांनी राष्ट्रीय सन्मानाला दिलेली दस्तक

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment