अमेझॉन प्राइम व्हिडिओने पाच शॉर्ट फिल्मचा संग्रह ‘अनपॉज्ड’ ची घोषणा आज एका टीझरद्वारे केली आहे. रत्ना पाठक शाह, रिचा चड्ढा, सुमित व्यास, गुलशन देवय्या आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. राज आणि डीके, निखील आडवाणी, तनिष्ठा चॅटर्जी, अविनाश अरुण आणि नित्या मेहरा यांनी या ५ कथांचे दिग्दर्शन केले आहे. मानवीय जीवनात असलेली आशा, नव्याने होणारा प्रारंभ आणि शक्यता यांच्याभोवती फिरणाऱ्या या कथा आहेत. 

पाच लघुपटांमध्ये ग्लिच, रॅट-ए-टॅट, विषाणू, चांद मुबारक आणि अपार्टमेंटचा समावेश आहे. ‘ग्लिच’चे दिग्दर्शन राज आणि डीके यांनी केले आहे. यात गुलशन देवय्या आणि सय्यामी खेर मुख्य भूमिकेत आहेत. निखील अडवाणी यांच्या ‘अपार्टमेंट’मध्ये रिचा चड्ढा, सुमित व्यास आणि ईश्वक सिंह आहेत. तन्निष्ठ चटर्जी दिग्दर्शित ‘रॅट-ए-टॅट’मध्ये रिंकू राजगुरू आणि लिलेट दुबे यांच्या मुख्य भूमिका आहेत. अभिषेक बॅनर्जी आणि गीतिका विद्या ओहल्यान यांच्या भूमिका असलेल्या ‘विषाणू’ चे दिग्दर्शन अविनाश अरुण यांनी केले आहे. तर नित्या मेहरा दिग्दर्शित ‘चांद मुबारक’ मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह आणि शार्दुल भारद्वाज यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘अनपॉज्ड’ चे ट्रेलर ८ डिसेंबर रोजी रिलीज होईल तर १८ डिसेंबर रोजी ‘अनपॉज्ड’ अमेझॉन प्राईम व्हिडीओ वर प्रदर्शित होईल. 

 

Website | + posts

Leave a comment