क्लेशदायी अशा मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या, मेजर संदीप उन्नीकृष्णन ला, 26/11 च्या स्मृतिदिनी ‘मेजर’ या सिनेमाच्या टीमने एका व्हिडिओद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. शशी किरण टिक्का दिग्दर्शित आगामी तेलगू व हिंदी भाषीक ‘मेजर’ या चित्रपटात अभिनेता अदीवी शेष हा संदीप उन्नीकृष्णनची व्यक्तिरेखा साकारणार आहे. त्यासाठी आदिवी ने संदीपच्या पात्रात फिट होण्यासाठी स्वतः मध्ये केवळ शारिरीकच नव्हे तर वैचारिक बदलही केले आहेत. उद्या त्याचा फर्स्ट लूक रिलीज होणार आहे.
त्याचा अनुभव सांगताना आणि मेजरच्या आठवणी सांगत अदीवी शेष यांनी सोशल मीडियावर टीझरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. आदिवीने पोस्ट केले आहे की, “आम्ही मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची कहाणी पुन्हा जिवंत करण्याचा प्रेरणादायी प्रवास सुरू केला आहे. आम्हाला जे काही वाटते त्या भावना शब्दांत सांगणे कठीण आहे, पण मी प्रयत्न केला आहे”
We've embarked on a heartfelt journey of bringing Major Sandeep Unnikrishnan’s story to life. Putting in words, what we felt, our emotions & feelings, is difficult but we did try and we share that piece of our heart tomorrow.
The journey begins
#MajorBeginnings
#MajorTheFilm pic.twitter.com/sJv5k9apqk— Adivi Sesh (@AdiviSesh) November 26, 2020
सोनी पिक्चर्स प्रस्तुत ‘मेजर’ या चित्रपटाची निर्मिती महेश बाबूंच्या जीएमबी एंटरटेन्मेंटने केली असून शशि किरण टिक्का दिग्दर्शक आहेत. अदीवी शेष, शोभिता धुलिपाला व सई मांजरेकर अभिनीत हा चित्रपट हिंदी व तेलगू दोन्ही भाषेत रिलीज होणार आहे.