गॅल गॅडोट स्टारर ‘वंडर वूमन 1984’ येत्या 24 डिसेंबर रोजी भारतात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पॅटी जेनकिन्स दिग्दर्शित आणि गॅल गॅडोटच्या प्रमुख भूमिकेत ‘वंडर वूमन 1984’ ही वॉर्नर ब्रदर्स ची पेशकश आहे. २०१७ च्या सुपरहिट ‘वंडर वूमन’चा पुढील भाग असे याला म्हणता येईल. या सिनेमात ख्रिस पाइन , क्रिस्टन वाईग, पेड्रो पास्कल, रॉबिन राईट, आणि कॉनी निल्सन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

“टेनेट नंतर, आता प्रेक्षकांच्या आवडीचा असा सिनेमा देतांना आम्हाला फार अभिमान वाटतो. हा एक परिपूर्ण कौटुंबिक मनोरंजन करणारा सिनेमा आहे, ज्याचा आनंद फक्त मोठ्या स्क्रीनवर घेता येतो. ” – डेन्झील डायस, व्हीपी आणि एमडी, वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स (भारत)

Website | + posts

Leave a comment