डिज़्नी+ हॉटस्टारवरच्या यशस्वी पदार्पणानंतर, ‘ओके कंप्यूटर’ने (Ok Computer) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रॉटरडॅम’2021 मध्ये आपला यूरोपीयन प्रीमियर साजरा केला. पूजा शेट्टी आणि नील पेजदारद्वारा रचित आणि निर्देशित, ओके कंप्यूटर ब्राइट फ्यूचर प्रोग्राम (Bright Future Programme) अंतर्गत येणारी आणि प्रदर्शित होणारी पहिली वेब सीरिज असून जगभरातील उभरत्या चित्रपट प्रतिभांना समर्पित करण्यात आली आहे. (Web Series Ok Computer Premiered in Rotterdam International Film Festival 2021)

आनंद गांधी यांच्या मेमेसिस स्टूडियोजद्वारा निर्मित सहा भागांची ही सीरिज भारतीय मंचावर आतापर्यंत पाहण्यात न आलेल्या त्याच्या अभूतपूर्व दृष्टिकोन आणि कक्षेसाठी ओळखली गेली. ही एक दृष्टिपथात असलेल्या यथार्थवादी भविष्याची कल्पना आहे. ज्यात चहावाल्या ‘माउशी’ बॉट्स, इमर्सिव वीआर वर्ल्ड आणि रोबोट मसीहा आदींचा समावेश आहे. ब्लैक पैंथरने ज्या तऱ्हेने एफ्रोफ्यूचरिज्म मांडला अगदी त्याचप्रमाणे, ओके कंप्यूटर जगाला ‘इंडो-फ्यूचरिज्म’ची ओळख करून देतो.

निर्माता आनंद गांधी म्हणाले की, “हा दिग्दर्शक पूजा शेट्टी आणि नील पेजदार यांच्या दृष्टिकोनाचा गौरव आहे.” आनंद गांधी त्यांच्या तुंबाड आणि ‘शिप ऑफ थीसस’साठी ओळखले जातात. आनंद गांधी पुढे म्हणाले की, “ही मेमेसिसच्या दूरदृष्टिला आश्वासित करणारी गोष्ट आहे कि अभूतपूर्व कथा साकारणाऱ्या नव्या आवाजाला आणि त्यांच्या दूरदर्शीपणाला देखील निरंतर चांगला मंच उपलब्ध होतो आहे.”

‘ओके कंप्यूटर’ या जूनमध्ये अंतर्राष्ट्रीय फिल्म महोत्सव रॉटरडैम 2021 में प्रदर्शित करण्यात आला आहे. भारतीय दर्शक याला डिज़्नी+हॉटस्टार वर पाहू शकतात.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.