आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

मागील काही महिन्यांपासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ (Planet Marathi OTT) प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची जोरदार चर्चा होती. या चर्चेला पूर्णविराम देत ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. माधुरी दीक्षितच्या हस्ते ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. (The Launch Ceremony of ‘Planet Marathi OTT’ was held with enthusiasm by Madhuri Dixit) या वेळी ‘प्लॅनेट मराठी’च्या ‘म’ या लोगोची पालखीतून मिरवणूकही काढण्यात आली. आज बॉलिवूडमध्ये आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी माधुरी दीक्षित या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’शी जोडली गेली आहे.

या भव्य कार्यक्रमाला ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख संस्थपक अक्षय बर्दापूरकर यांच्यासह ‘प्लॅनेट मराठी’च्या परिवारातील आणि मराठी मनोरंजन विश्वातील अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, सचित पाटील, प्राजक्ता माळी, भार्गवी चिरमुले, गायत्री दातार, संजय जाधव, सोनाली खरे, सायली संजीव, सुरभी हांडे, निखिल महाजन, दीप्ती देवी, भाग्यश्री मिलिंद, रेशम श्रीवर्धनकर, सुशांत शेलार या तारे-तारकांनी हजेरी लावली होती.

The Launch Ceremony of 'Planet Marathi OTT'

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ बरोबरच्या या नव्या नात्याबद्दल अभिनेत्री माधुरी दीक्षित म्हणते, ”जगभरातील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी केवळ मराठी ॲपची निर्मिती करणे, हे अक्षय बर्दापूरकर आणि त्यांच्या टीमने उचललेले एक कौतुकास्पद पाऊल आहे. त्यामुळे मराठी इंडस्ट्री एका वेगळ्याच उंचीवर पोहोचणार आहे. मराठी फिचर फिल्म्स आणि आशयामध्ये खूपच क्षमता आहे, जी अजून जगभरातील प्रेक्षकांनी अनुभवलेली नाही. या व्यासपीठामुळे चित्रपट निर्मात्यांना शोधणे आणि त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीस्कर होणार आहे. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ने प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा जो खजिना आणला आहे, तो खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे. या दर्जेदार कंटेन्टला तोड नाही. हा माझा सन्मान आहे, की या सोहळ्याला मला आमंत्रित करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणे, हा खरोखर अद्भुत अनुभव होता. मी सुद्धा एक अशी मराठी प्रेक्षक आहे, जी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असले तरी मराठी चित्रपट, वेबसिरीज आवर्जून पाहाते. माझ्या मते, ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ हे असे आहे, ज्याची जगभरातील मराठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते.”

The Launch Ceremony of 'Planet Marathi OTT'

प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’बद्दल ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”आज इतक्या महिन्यांची आमची मेहनत फळाला आली आहे. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असून दुग्धशर्करा योग म्हणजे माधुरी दीक्षित सारखी गुणी अभिनेत्री ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या परिवारात सहभागी झाली आहे. त्यामुळे विशेष आनंद आहे आणि यासाठी मी तिचा आभारी आहे. आमच्या या परिवारात अनेक नावाजलेल्या व्यक्तींचा सहभाग होत आहे, याहून मोठी गोष्ट कोणती असू शकते? माधुरी दीक्षितबद्दल सांगायचे तर तीन दशकांहून अधिक काळ जिने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले, तिची जादू आजही कायम आहे. माधुरी काही काळ परदेशातही राहिली. मात्र महाराष्ट्राशी तिची नाळ जोडली गेल्याने ती परत मायदेशी परतली. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ही माधुरीसारखेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ लाँचबाबत आनंदही आहे आणि कुठेतरी मनात एक उत्सुकता आहे की, प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल? मात्र प्रेक्षकांना दर्जेदार कंटेन्ट देण्याची आमची बांधिलकी आम्ही पूर्णपणे जपणार आहोत.”

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.