हिंदी सिनेमाच्या ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला (Shashikala) यांचे आज मुंबई येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. (Actress Shashikala passes away at 88)  २००७ साली त्यांना पद्मश्री ने सन्मानित करण्यात आले होते. आरती (१९६२) व गुमराह (१९६३) या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 

शशिकला जवळकर या मूळच्या सोलापूरच्या रहिवाशी होत्या. ४ ऑगस्ट १९३२ साली त्यांचा जन्म झाला. घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे लहानपणीच त्यांचे कुटुंब मुंबईत आले. शशिकला यांना चित्रपट क्षेत्रात संधी देण्यामागे अभिनेत्री नूरजहाँ यांचा मोठा वाटा होता. नूरजहाँ यांचे पती शौकत हुसेन रिझवी यांनी ‘झीनत’ या चित्रपटातील एका कव्वालीत त्यांना संधी दिली आणि तिथून खऱ्या अर्थाने शशिकला यांचा अभिनय प्रवास सुरु झाला.  नंतर व्ही. शांताराम यांच्या ‘तीन बत्ती चार रास्ता’मध्ये मराठी भावजयीची  भूमिका त्यांनी केली. १९५३ सालच्या या चित्रपटानंतर त्यांना खलनायिकेच्या भूमिका मिळू लागल्या. 

actress shashikala

अनुपमा, फुल और पत्थर, आई मिलन कि बेला, वक्त, खूबसूरत, छोटे सरकार या सिनेमातील त्यांच्या व्यक्तिरेखा गाजल्या.  पुढे ओम प्रकाश सैगल यांच्याशी शशिकला यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुली आहेत. चरित्र भूमिकांकडे वळल्यानंतर शशिकला यांना खाष्ट सासू च्या खलनायकी भूमिकाच जास्त प्रमाणात मिळाल्या.  शशिकला यांना पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’कडून जीवनगौरव पुरस्कार (२०१४) व महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे ‘राज कपूर कारकीर्द-गौरव पुरस्कार(२०१५) देऊन सन्मानित करण्यात आले होते. 

पहा शशिकला यांची पहिली कव्वाली – 

‘अनुपमा’ चित्रपटातील शशिकला यांच्यावर चित्रित गीत “भीगी भीगी फझा ….”- 

Website | + posts

Leave a comment