आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम

————————

“मायेचे माहेर, तुझीच पायरी…होई रे कैवारी पांडुरंगा….”
पांडुरंग आणि त्याची पंढरी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी हक्काचं माहेर आहे यात काही शंका नाही. पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्यामुळे ‘आषाढी एकादशी’ला अनन्य साधारण महत्त्व आहे. आषाढी एकादशी म्हटले की प्रथम डोळ्यांसमोर येते ती विठू माऊलीच्या नामस्मरणात तल्लीन होणारी पंढरपूरची वारी. या पावन दिवशी ‘कडक एंटरटेनमेंट’ अंतर्गत सुरु असेलेले आणि मराठी प्रेक्षकांना त्यांच्या हक्काच्या भाषेत मनोरंजन करणारे ‘कडक भक्ती’ या युट्युब चॅनेलच्या नवीन उपक्रमाची सुरुवात झाली आहे. (Kadak Bhakti YouTube Channel Launched for Marathi Devotional songs )

कडक एंटरटेनमेंट’ आणि ‘कोल्हापूर फिल्म कंपनी’ निर्मित ‘पांडुरंग’ या भक्ती गीताची संकल्पना मनोरंजनसृष्टीतील स्वप्नील संजय मुनोत, अक्षय मुनोत आणि ‘पोश्टर बॉय’ उर्फ सचिन सुरेश गुरव यांची आहे. ‘कडक भक्ती’चं हे पहिलं भक्तीगीत गीतकार गुरु ठाकूर यांनी रचले आहे. या भक्ती गीताला विजय नारायण गवंडे यांनी संगीत दिले आहे तर कृष्णा बोंगाणे यांनी ते गायले आहे. छायाचित्रणाची जबाबदारी प्रथमेश रांगोळे यांनी उत्तमरित्या पेलली आहे तर संकलन वैभव पाटील आणि डिझाईन्स सचिन सुरेश गुरव यांनी केले आहे. या भक्तीगीताच्या निमित्ताने सचिन सुरेश गुरव यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.

भारत हा संस्कृती प्रिय देश आहे आणि आपला महाराष्ट्र तर संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. म्हणजेच संस्कृतीचा उत्तम वारसा आपल्याला लाभला आहे. भारतातल्या विविध प्रादेशिक भाषांमधून विविध संस्कृतीची भक्तिगीते तयार करून त्या-त्या प्रादेशिक भाषांमध्ये देखील ती प्रस्तुत करण्याचा ‘कडक एंटरटेनमेंट’चा मानस आहे आणि याच विचारातून ‘कडक भक्ती’ प्रेक्षकांच्या भेटीस आले. या व्यासपीठावर प्रेक्षकांना फक्त भक्तिगीते ऐकायला- पाहायला मिळणार आहेत.

‘अहमदनगर महाकरंडक’ एकांकिका स्पर्धेचे अध्यक्ष आणि प्रायोजक, ‘सोहम’, ‘अनुष्का मोशन पिक्चर्स’, ‘लेट्सअप’ प्रोजेक्ट्सचे प्रमुख, ‘अगंबाई अरेच्चा २’ आणि ‘ट्रिपल सीट’चे निर्माते आणि ‘लेट्सफ्लिक्स ओटीटी’चे प्रमुख उद्योजक नरेंद्र फिरोदिया हे ‘कडक मराठी’ या युट्यूब चॅनलचे पण संस्थापक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रुती अक्षय मूनोत आणि मयुरी स्वप्निल मूनोत ‘कडक मराठी’ च्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवणार आहेत.

हेही वाचा – आरएसवीपीने केली आदित्य सरपोतदार दिग्दर्शित हॉरर-कॉमेडी ‘ककुड़ा’ची घोषणा

Website | + posts

Leave a comment