आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

इरोस एसटीएक्स ग्लोबल कॉर्पोरेशनच्या एसटीएक्स फिल्म्सने ग्लोबल इंडियन आयकॉन दीपिका पादुकोणसोबत एक रोमांटिक कॉमेडी बनवत असून ज्याची निर्मिती देखील दीपिकाच्या ‘का’ प्रोडक्शन्स बॅनरनंतर्गत करण्यात येणार असल्याची घोषणा एसटीएक्सफिल्म्स मोशन पिक्चर ग्रुपचे चेयरमैन एडम फोगेलसनद्वारे आज करण्यात आली आहे. (Deepika Padukone to star in STXfilms and Temple Hill’s Indian cross-cultural romantic comedy)

दीपिका पादुकोणभोवती केंद्रित असणाऱ्या या भारतीय क्रॉस-कल्चरल रोमँटिक कॉमेडीसाठी टेम्पल हिल प्रॉडक्शन्स विक गॉडफ्रे आणि मार्टी बोवेन, जे द ट्वायलाइट फ्रँचायझी, द फॉल्ट इन अवर स्टार्स, “लव, सायमन” यासाठी ओळखले जातात, त्यांच्याशी याबाबत चर्चा सुरु आहे. आयझॅक क्लॉसनर टेम्पल हिलच्या या प्रकल्पाची देखरेख करत आहे.

या घोषणेवर भाष्य करताना फॉगेलसन म्हणाले, “दीपिका भारतातील सर्वात मोठ्या जागतिक वलयांकित कलाकारांपैकी एक आहे. ती एक प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेली प्रचंड प्रतिभाशाली व्यक्ती असून तिचा लौकिक आंतरराष्ट्रीय सुपरस्टार म्हणून वाढत आहे. अनेक इरोस इंटरनॅशनल चित्रपटांमध्ये अभूतपूर्व यश तिने मिळवले असून आम्ही तिच्यासोबत आणि आमचे मित्र टेम्पल हिल यांच्यासोबत एक रोमँटिक कॉमेडी बनवण्यासाठी खूप रोमांचित आहोत.”

Deepika Padukone to star in STXfilms and Temple Hill's Indian cross-cultural romantic comedy

या सहभागाविषयी दीपिका म्हणाली, “का प्रोडक्शन्सची स्थापना जागतिक मानांकन असलेल्या कंटेंटची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि त्याची निर्मिती करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. एसटीएक्सफिल्म्स आणि टेम्पल हिल प्रॉडक्शन्ससोबतच्या भागीदारीचा मला विशेष आनंद होत आहे, जे ‘का’ची महत्वाकांक्षा आणि सर्जनशील दृष्टीकोन सामायिक करतात आणि प्रभावी आणि गतिशील अशा क्रॉस-सांस्कृतिक कथा जगासमोर आणण्यास उत्सुक आहेत. ”

दीपिका पादुकोणला 2018 मध्ये टाइम मासिकाने जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून नामांकित केले होते. 2018 आणि 2021 मध्ये, त्यांनी वैरिएटीच्या ‘इंटरनॅशनल वुमेन्स इम्पॅक्ट रिपोर्ट’ मध्ये फिचर करण्यात आले होते, जे जगभरातील मनोरंजनात महिलांच्या कामगिरीला अधोरेखित करते.

XXX: द रिटर्न ऑफ झेंडर केज या चित्रपटात विन डिझेल सह-कलाकार असलेल्या चित्रपटात अभिनेत्रीने हॉलीवूड मध्ये पदार्पण केले. तिने ‘का’ प्रॉडक्शन्सअंतर्गत, छपाक आणि आगामी चित्रपट द इंटर्न आणि ’83 वर काम करत असून सध्या शकुन बत्रा आणि सिद्धार्थ आनंदच्या अनटायटल्ड चित्रपटांच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहे.

याआधी, दीपिकाने अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित, समीक्षकांनी प्रशंसित केलेल्या ‘छपाक’ चित्रपटात काम केले. तिने पद्मावतमध्ये मुख्य भूमिका साकारली ज्याने बॉक्स ऑफिस वरचे सर्व रेकॉर्ड तोडले. इतर श्रेयांमध्ये पुरस्कारप्राप्त आणि समीक्षकांनी प्रशंसित चित्रपट पिकू आणि बाजीराव मस्तानी, अनुक्रमे सर्वाधिक आणि तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक कमाई करणारा आंतरराष्ट्रीय हिंदी भाषेतील चित्रपटांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी, दीपिकाला मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्याबाबत प्रतिष्ठित वल्ड इकोनोमिक फोरम तर्फे क्रिस्टल पुरस्कार मिळाला. ती भारतामध्ये कलेक्टिव आर्टिस्ट नेटवर्क आणि अमेरिकेतील आय.सी.एम तसेच डॅनिएल रॉबिन्सन अॅलन सिगल एंटरटेनमेंटचे प्रतिनिधित्व करते.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.