आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

लवकरच आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार असून सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. हाच उत्साह द्विगुणित करण्यासाठी बाप्पाचे ‘देवा गणराया’ हे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचे टिझर पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित झाले असून या जल्लोषमय गाण्याला स्वप्नील बांदोडकर याचा आवाज लाभला आहे. (Teaser Poster of Singer Swapnil Bandodkar’s Deva Ganraya Song Released)

या गाण्याच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा ठाणे मनपा चे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते पार पडला. सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण करणारे हे गाणे चिन्मय उदगीरकर आणि रूपाली भोसले यांच्यावर चित्रित झाले असून संदीप माळवी यांनीच हे गाणे शब्दबद्ध केले आहे. सुमन एन्टरटेन्मेंट आणि मिडिया प्रा. लि. प्रस्तूत या गाण्याचे संगीत चिनार-महेश यांनी केले असून गाण्याची निर्मिती केदार जोशी यांनी केली आहे.

Teaser Poster of Singer Swapnil Bandodkar's Deva Ganraya Song Released

महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्साहवर्धक गाण्यामुळे भक्तांच्या आनंदात भर पडेल तसेच गणेशोत्सवातील वातावरण अधिकच चैतन्यमय होईल ही खात्री आहे. या गाण्याचे दिग्दर्शन आशिष नेवाळकर यांनी केले आहे. संकटसमयीच्या या काळात विघ्नहर्ता गणेशाचे हे गाणे सर्वांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करणारे आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.