आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

The 25th show of “Madhurav Boru Tey Blog” will be staged at Maharashtra Sadan, Delhi

“राजभवन”, “गेट वे ऑफ इंडिया” अशा ऐतिहासिक वास्तूमध्ये सादर केला गेलेला एकमेव मराठी नाट्य प्रयोग “मधुरव बोरु ते ब्लॉग” आता थेट दिल्ली येथे सादर होणार असून त्याचे निमित्त ही ख़ास आहे . “मधुरव बोरु ते ब्लॉग” चा २५ वा (रौप्य महोत्सवी) प्रयोग दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे येत्या ३ ऑगस्टला सायंकाळी ६:३० वाजता होणार असून दिल्ली मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मराठी भाषेच्या जन्माची संगीतमय कहाणी! मराठी भाषेचा जन्म कसा झाला, मराठी भाषेचा रंजक इतिहास आणि त्यातली वेगवेगळी स्थित्यंतरे मधुरा वेलणकर आणि तिचे सहकलाकार नाट्य, नृत्य, संगीत या मनोरंजनाच्या माध्यमातून या कार्यक्रमातून सादर करतात.

भाषेविषयीच्या अनेक माहीत नसलेल्या गोष्टी कलेच्या माध्यमातून या कार्यक्रमांमध्ये उलगडत जातात त्यामुळे हा कार्यक्रम महत्वपूर्ण ठरतो म्हणून प्रेक्षकांनी जाणकारांनी प्रसार माध्यमांनी ह्या कार्यक्रमाचे कौतुक केलं आणि ह्या पुढेही कृतिशील पाठिंबा आणि प्रोत्साहन देत रहायला हवं. हा गौरव आपल्या मराठीचा आपल्या मातृभाषेचा आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा आहे.

या कार्यक्रमाचे उत्तरोत्तर भरपूर प्रयोग व्हावे, जिथे जिथे मराठी माणूस आहे त्यांच्या मनामध्ये मराठी विषयी प्रेम निर्माण व्हावं यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचून हा कार्यक्रम करण्याची इच्छा मधुरा वेलणकर साटम, अभिजीत साटम तसंच या कार्यक्रमाची लेखिका डॉक्टर समीरा गुजर आणि या कार्यक्रमातले कलाकार जुई भागवत, आकांक्षा गाडे, आशिष गाडे, श्रीनाथ म्हात्रे यांनी व्यक्त केली. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment