आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

सुप्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी यांचे वडील राधाकांत बाजपेयी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. (Actor Manoj Bajpayee’s father RK Bajpayee passes away at 83 in Delhi) रविवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही आठवड्यांपूर्वी राधाकांत बाजपेयी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या गावात शोककळा पसरली आहे. ते बिहारमधील बेतिया शहराजवळील बेलवा या छोट्याशा गावाचे रहिवासी होते. 

सप्टेंबर महिन्यात मनोज बाजपेयींच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली. त्यावेळी मनोज हे  केरळमध्ये शूटिंग करत होते. वडिलांच्या तब्येतीबद्दल कळताच त्यांनी शूटिंग थांबवले आणि घरी परतले. जेव्हा त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली, तेव्हा मनोज वाजपेयी शूटिंगला परतले.

अलीकडेच एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, मनोज बाजपेयी म्हणाले होते की त्यांच्या वडिलांनी नेहमीच त्यांना आधी अभ्यास पूर्ण करण्याचा सल्ला दिला. मनोज म्हणाला, ‘वयाच्या १८ व्या वर्षी मी बिहारमधील एका गावातून दिल्लीला आलो. मी दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेतला. पदवी पूर्ण केली जे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. मी माझा अभ्यास सोडावा अशी त्याची इच्छा नव्हती. मला त्याची स्वप्ने पूर्ण करायची होती आणि कसा तरी मी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि पदवी मिळवली.’  

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.