आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Diwali special issue of Navrang Ruperi-2022 has been published in Pune and Aurangabad. मनोरंजन जगतास वाहिलेला साहित्यिक दर्जाचा आणि माहितीपूर्ण दिवाळी अंक अशी ओळख असलेल्या “नवरंग रुपेरी-२०२२” च्या ३६ व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन पुण्यात आणि औरंगाबादेत संपन्न झाले. 

Navrang Ruperi Diwali Ank Magazine 2022

पुण्यात प्रबोध उद्योगसमूहाचे संचालक व ज्ञान प्रबोधिनी चे विश्वस्त श्री मोहन गुजराथी यांच्या हस्ते हे प्रकाशन संपन्न झाले. ज्ञान प्रबोधिनी, पुणे च्या माजी प्राचार्या व ज्येष्ठ लेखिका डॉ नलिनीताई गुजराथी यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख अतिथी मोहन गुजराथी यांचे स्वागत अंकाचे निवासी संपादक श्री धनंजय कुलकर्णी यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात कुलकर्णी यांनी नवरंग रुपेरी चा गेल्या ३६ वर्षांचा प्रवास कसा झाला याची माहिती दिली. या अंकाच्या पुण्यातील व्यवस्थापक  सौ नूतन उर्सेकर यांनी सौ नलिनी गुजराथी यांचे स्वागत केले. याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करतांना मोहन गुजराथी म्हणाले की, ” चित्रपटविषयक अंक असूनही त्यात गॉसिप्सला थारा न देता, केवळ माहिती आणि मनोरंजन हा वसा घेऊन, साहित्यिक दर्जाचा अंक सातत्याने ३६ वर्षांपासून प्रकाशित करणे हे खरंच कौतुकास्पद आहे. अंकाचे संस्थापक संपादक अशोक उजळंबकर व त्यांच्या पूर्ण टीमचे याकरिता विशेष अभिनंदन केले पाहिजे. यावर्षीचा  ३६ वा अंक प्रकाशित करताना मला खूप आनंद होतो आहे”  या प्रसंगी  सौ नलिनी गुजराथी म्हणाल्या, ” अंकातील चित्रपट विषयक लेख वाचकांना त्या कालखंडात घेऊन जातात आणि स्मरण रंजनाचा अनुपम आनंद देतात. नवरंग रुपेरी दिवाळी अंकाने आता मागच्या ३५  वर्षातील अंकातील निवडक लेख एकत्र करून पुस्तक रूपाने ते वाचकांसमोर आणावेत.” या कार्यक्रमास अंकाचे मुद्रक श्री व सौ आशिष बीडकर, पुण्यातील व्यवसायिक योगेश मालपाणी उपस्थित होते. अंकाचे कार्यकारी संपादक अजिंक्य उजळंबकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Navrang Ruperi Diwali Issue-2022 prakashan at aurangabad

औरंगाबादेत लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी चे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक श्री प्रवीण जाधव यांच्या हस्ते हे अंकाचे प्रकाशन संपन्न झाले. या कार्यक्रमास पल्लवी जैस्वाल, शिवानी पाटील, गोपाळ रत्नपारखी, कैलास राहतेकर, संदीप पैठणे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकाचे संस्थापक संपादक अशोक उजळंबकर यांनी केले. शिक्षकी व्यवसाय सांभाळत, १९८७ साली अंकाची सुरुवात कशी झाली आणि पुढे ३६ वर्षांचे सातत्य टिकवितांना कोणत्या आवाहनांचा सामना करावा लागला याबद्दल अशोक उजळंबकर यांनी माहिती दिली. अशोक उजळंबकर यांनी प्रवीण जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  . याप्रसंगी बोलताना प्रवीण जाधव म्हणाले की, ” सातत्य आणि दर्जेदार साहित्य ही नवरंग रुपेरी ची विशेषता आहे. अंकाला गेल्या ३६ वर्षांमध्ये प्राप्त झालेले अनेक राज्यस्तरीय पुरस्कार ही त्याचीच पावती आहे. यापुढेही अंकाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा.” अंकाचे कार्यकारी संपादक अजिंक्य उजळंबकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

Navrang Ruperi Diwali Ank Content List

‘नवरंग रुपेरी’च्या या ३६ व्या अंकात आपणास विविध विषयांना वाहिलेले माहितीपूर्ण लेख वाचायला मिळणार आहेत. यात प्रामुख्याने पडद्यावरील आई, महानायक दिलीप कुमार जन्मशताब्दी व अमिताभ बच्चन सहस्त्र चंद्रदर्शन निमित्त विशेष लेख, शाहरुख खान ची ३० वर्षे, ९० च्या व २००० च्या दशकातील हिंदी चित्रपट संगीताचा आढावा, जन्मशताब्दी निमित्त मुकेश, देव आनंद, मृणाल सेन, शैलेंद्र यांच्यावरील विशेष लेख, फिल्म पब्लिसिटीचा इतिहास, श्रद्धांजली पर लेखांमध्ये लता मंगेशकर, बप्पी लाहिरी, रमेश देव, भूपेंद्र यांच्यावरील लेख, तसेच ओटीटी, हॉलिवूड व रंगभूमी या विषयावरील लेखांचा समावेश आहे. या अंकाच्या लेखकांच्या टीममध्ये  ज्येष्ठ सिनेपत्रकार धनंजय कुलकर्णी, पूजा सामंत, दिलीप ठाकूर, ज्येष्ठ चित्रकार श्रीकांत धोंगडे, ज्येष्ठ सिने-अभ्यासक अरुण पुराणिक, कृपाशंकर शर्मा, जयंत राळेरासकर, विवेक पुणतांबेकर, पद्माकर पाठकजी, जयदीप पाठकजी, रविप्रकाश कुलकर्णी, जयश्री जयशंकर  दानवे, प्रकाश चांदे, प्रशांत गौतम, आशिष निनगुरकर, कृपा देशपांडे, सौरभ सदावर्ते, अजय पुरोहित, रा.को. खेडकर , आशिष देवडे , मानसी जोशी आदींचा समावेश आहे. हिंदी/मराठी सिनेमा, नाटक, टेलिव्हिजन, शॉर्ट फिल्म्स व ओटीटी असा सर्वसमावेशक करमणूक जगतास वाहिलेला नवरंग रुपेरी-२०२२ आता महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.