रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा, फरहान अख्तर निर्मित ‘तुफान’ या सिनेमाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले आहे, अमेझॉन प्राइम व्हिडीओ सादर करत असलेल्या या सिनेमात परेश रावल आणि मृणाल ठाकुर यांच्याही मुख्य भूमिका. (Farhan Akhtar’s film ‘Toofaan’ to Premiere Globally on Amazon Prime Video on 16th July 2021)

मुंबई, 16 जून 2021: अमेझॉन प्राइम व्हिडीओने आज ‘तुफान’ या फरहान अख्तरची मुख्य भूमिका असलेल्या  सिनेमाच्या प्रीमिअरची तारीख जाहीर केली. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित आणि एक्सेल एंटरटेनमेंट (रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर) आणि आरओएमपी पिक्चर्स (राकेश ओमप्रकाश मेहरा) यांची निर्मिती असलेला तुफान  हा सिनेमा 16 जुलै पासून अमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहता येईल. तुफान मध्ये फरहान अख्तर प्रमुख भूमिकेत आहे. त्याचप्रमाणे मृणाल ठाकुर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसैन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राज यांच्याही या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.

Toofaan to Premiere on Amazon Prime Video

भाग मिल्खा भाग या सिनेमातील यशस्वी भागीदारीनंतर फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा ही दमदार जोडी तुफान मध्ये परत एकदा एकत्र आली आहे. ही प्रेरणादायी कथा आहे मुंबईतील डोंगरी भागात मोठा होऊन स्थानिक गुंड झालेल्या अज्जू या अनाथ मुलाची. अनन्या या हुशार, प्रेमळ मुलीला भेटल्यानंतर त्याचं आयुष्य बदलून जातं. तिचा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळेच त्याला स्वत:ची वेगळी ओळख शोधण्याची जिद्द लाभते. या जिद्दीतूनच अजीज अली हा बॉक्सिंग चॅम्पियन तयार होण्याचा प्रवास यात चितारला आहे.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.