आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

On the occasion of Gudhi Padwa on March 22, the movie ‘Phulrani’ will be released.

आपल्या असण्याने आनंद पसरवणारी ‘फुलराणी’ आज रंगमंचावर अवतरली. तिला पाहून चिडवणाऱ्याला ‘फुलवाली नाय फुलराणी’ असं ठणकावून सांगणारी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर रंगमंचावर अवतरली आणि सगळयांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. टाळ्यांच्या कडकडाटात ‘फुलराणी’ झालेल्या प्रियदर्शनीने सगळ्यांना जिंकून घेतलं. सोबत चित्रपटातील एक छोटी झलकही उपस्थितांना यावेळी पहायला मिळाली. २२ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘फुलराणी’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे .

या भूमिकेबद्दल बोलताना प्रियदर्शनी सांगते, ‘पूर्णपणे नवं असं काहीतरी करून दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. या भूमिकेच्या निमित्ताने मला ती संधी मिळाली. ‘फुलराणी’तील त्या फुलवालीनं माझ्या अभिनय विश्वातल्या येण्याचं वर्तुळ पूर्ण केलं असल्याची भावना प्रियदर्शनीने व्यक्त केली’. भाषेचा लहजा, हेलकावे, लकबी टिपत ही ‘फुलराणी’ मी साकारली आहे. खरं तर ‘फुलराणी’ सारखा इतका मोठा सिनेमा आणि त्यात टायटल रोल साकारण्याची संधी मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. त्यामुळे मीच ‘फुलराणी’ बनलेय हे मला स्वप्नवत असल्यासारखं वाटत होतं. खरंच आपली ‘फुलराणी’ म्हणून निवड झाली असून आपण सुबोध भावेसारख्या मोठ्या नटासोबत काम करणार आहोत यावर शूट सुरू होईपर्यंत माझा विश्वासच बसत नव्हता. ‘फुलराणी’ बनणं माझ्यासाठी सुखकारक आणि अनपेक्षित होतं असंही प्रियदर्शनी म्हणाली.

‘पिग्मॅलिअन’ या गाजलेल्या नाट्यकृतीवर १९६४ साली आलेली ‘माय फेअर लेडी’ म्युझिकल फिल्म ही चांगलीच गाजली होती. याच कलाकृतीने प्रेरित होऊन विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. ‘फिनक्राफ्ट मिडिया’ ‘अमृता फिल्म्स’ आणि ‘थर्ड एस एंटरटेन्मेंट’ने चित्रपटाची प्रस्तुती केली असून विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. गीते बालकवी व गुरु ठाकूर यांची असून संगीत निलेश मोहरीर यांचे आहे. छायांकन केदार गायकवाड, कलादिग्दर्शन संतोष फुटाणे, नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. २२ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘फुलराणी’ चित्रपटाचे वितरण वायकॉम १८ स्टुडिओ करणार आहे.

या सोहळ्याला लेखक-दिग्दर्शक विश्वास जोशी, जाई जोशी, स्वानंद केळकर, अमृता राव, श्वेता बापट, लेखक आणि कवी गुरू ठाकूर, यांच्यासह चित्रपटाची पडद्यामागची टीम उपस्थित होती. संगीतकार नीलेश मोहरीर, वरुण लिखाते, पार्श्वसंगीत दिग्दर्शक आदित्य बेडेकर आणि कवी मंदार चोळकर हे सुद्धा उपस्थित होते.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment