आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

The first song ‘Naiyo Lagda’ from ‘Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan’ released in the grand finale of Bigg Boss 16.

सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ मधील ‘नैयो लगदा’या पहिल्या गाण्याचा टीझर समोर आल्यापासून चाहत्यांमध्ये या गाण्याबद्दलची उत्सुकता वाढत आहे. अशातच, दर्शकांची उत्सुकता वाढत असतानाच, बिग बॉस 16 च्या ग्रँड फिनालेमध्ये ‘नैयो लगदा’हे गाणे अखेरीस रिलीज करण्यात आले आहे. ‘नैयो लगदा’हे गाणे हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केले असून याचे लिरिक्स शब्बीर अहमद यांनी लिहिले आहेत. तसेच पलक मुच्छल आणि कमाल खान यांनी हे गाणे गायले आहे.

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा ‘किसी का भाई किसी की जान’या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अशातच, अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला ‘किसी का भाई किसी की जान’हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment