अभिनेता कबीर बेदी (Kabir Bedi) यांचे आगामी आत्मचारित्र (Autobiography), ‘स्टोरीज़ आय मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द एक्टर’चे (Stories I Must Tell: The Emotional Life Of An Actor) अनावरण  प्रियंका चोप्रा जोनास (Priyanka Chopra Jonas) द्वारे करण्यात येणार आहे. अंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित हिंदीतील दोन दिग्गज व्यक्तिमत्व, जे आपल्या जीवन कहाणीसोबत लेखक बनले आहेत, ते आता कबीर यांच्या पुस्तकावर चर्चा करण्यासाठी आणि त्याचे अनावरण करण्यासाठी एकत्र येत आहेत. 

कबीरच्या पुस्तकासाठी प्रियंका लंडनहून वर्चुअल पद्धतीने जोडली जाणार असून त्याचा प्रीमियर एका मनोरंजन पोर्टल आणि कबीरच्या सोशल मीडियावर 19 एप्रिलला संध्याकाळी 6.30 वाजता होणार आहे.

“स्टोरीज आय मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द एक्टर” कबीर बेदी यांच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत जीवनातील उतार चढ़ावांबाबत, विवाह आणि घटस्फोटासोबत तुटणाऱ्या नात्यांची, बदलत्या विश्वासाची, त्याचे भयावह झटके यांसोबतच भारत, यूरोप आणि हॉलीवुडमधील रोमांचक दिवस आणि भारताला गौरवान्वित करण्याची कहाणी आहे. ही एका माणसाच्या घडण्याची, तुटण्याची आणि पुन्हा जुळण्याची कहाणी आहे.

Kabir Bedi's autobiography, Stories I Must Tell: The Emotional Life Of An Actor

कबीर बेदी यांच्या “स्टोरीज़ आय मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द एक्टर” 19 एप्रिल 2021 ला भारतातील ऑनलाइन आणि ऑफलाइन बुक स्टोर्स मध्ये प्रकाशित होणार आहे.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.