अजय देवगण (Ajay Devgn) यांची निर्मिती असलेला ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ (Tanhaji: The Unsung Warrior) हा सिनेमा पहिल्यांदाच मराठीतून पहाण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. तानाजी मालुसरे हे इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षराने कोरलेलं नाव. या शूरवीराने जीवाची पर्वा न करता कोंढाणा सर केला. तानाजी मालुसरेंच्या या शौर्याची गाथा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ सिनेमातून दाखवण्यात आली आहे. हा दैदिप्यमान इतिहास आपल्या मातृभाषेत पाहायला मिळणं ही पर्वणीच म्हणायला हवं. 

स्टार प्रवाह वाहिनीवर २३ एप्रिलला दुपारी १२ वाजता हा सिनेमा मराठीतून (Tanhaji Movie in Marathi) अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

या भव्यदिव्य सिनेमाविषयी सांगताना स्टार प्रवाह (Star Pravah) कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘आपल्या मायबोली मराठीमध्ये हा सिनेमा स्टार प्रवाहवर प्रक्षेपित करताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो आहे. प्रेक्षकांसाठी ही अनोखी पर्वणी स्टार प्रवाह वाहिनीने आणली आहे.’

Marathi Trailer – Tanhaji: The Unsung Warrior – 

अजय देवगण, काजोल (Kajol), सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्यासोबतच अजिंक्य देव (Ajinkya Deo), शरद केळकर (Sharad Kelkar), देवदत्त नागे (Devdutta Nage) आणि दिग्दर्शक ओम राऊत (Director Om Raut) अशी अनेक मराठी नावं या सिनेमासोबत जोडली गेली आहेत. कलाकारांच्या उत्तम अभिनयासोबतच सिनेमातली दमदार गाणी, अजय-अतुल (Ajay-Atul) यांचं काळजाला भिडणारं संगीत आणि डोळे दिपवणारे व्हीएफएक्स हे सारं प्रेक्षकांना घरबसल्या पहाता येणार आहे.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.