आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Bollywood Actor Javed Khan Amrohi passed away

हिंदी सिनेमा जगतातील सुपरिचित आणि ज्येष्ठ चरित्र अभिनेते जावेद खान अमरोही यांचे आज निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. त्यांनी जवळपास १५० चित्रपटांमधून विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. याशिवाय टीव्हीच्या दुनियेतही त्यांनी वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जावेद खान यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत होता आणि ते गेल्या एक वर्षापासून अंथरुणाला खिळले होते. त्यांना सांताक्रूझ येथील सूर्या नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते, तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची दोन्ही फुफ्फुसे निकामी झाली होती. आज संध्याकाळी ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Bollywood Actor Javed Khan Amrohi passed away

२००१ मध्ये आलेला ‘लगान’ याशिवाय ‘अंदाज अपना अपना’ आणि ‘चक दे ​​इंडिया’मधील त्याच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले होते.  नुरी, सत्यम शिवम सुंदरम, प्रेम रोग, वो सात दिन, त्रिदेव, आशिकी, बागी, सडक इत्यादी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष लक्षणीय होत्या. जावेद खानने मिर्झा गालिब, ये जो है जिंदगी, नुक्कड, कुछ भी हो सक्ता है, घर जमाई, किरदार, विष्णुपुराण, शक्तीमान सारख्या अनेक टीव्ही सीरियलमध्येही काम केले होते. जावेद खान अमरोही हे झी इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आर्ट्समध्ये शिक्षक या नात्याने  विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे सुद्धा देत असत. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment