‘सोन्याची पावलं’प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ५ जुलैपासून संध्या ६.३० वा. कलर्स मराठीवर. (New TV Serial Sonyachi Pavala on Colors Marathi)

एखाद्या घरी मुलगी जन्माला आली असो किंवा मुलीने सासरी माप ओलांडून सून म्हणून गृहप्रवेश केला असो तर असं म्हणतात की, “सोन्याच्या पावलांनी लक्ष्मीच घरात आली”.  ही एक भाबडी समजूत असते किंवा आपला विश्वास असतोनवी नवरी सोन्याच्या पावलांनी लक्ष्मीप्रमाणे घरात आली आणि सासरच्या अंगणात भरभराट झाली. सूनेच्या येण्याने कुटुंबावर ओढवलेलं मोठं संकट टळलंतिच्या येण्याने विस्कटलेल्या कुटुंबाची घडी पुन्हा एकदा बसू लागली. अशा अनेक गोष्टी आपल्या कानावर येत असतातकाही घटना आपण प्रत्यक्ष बघत देखील असतो. काहींचा या गोष्टीवर विश्वास असतो, तर काहींचा नसतो. काही म्हणतात योगायोग आहे, तर काही म्हणतात प्रत्येकाच्या विश्वासाचा भाग आहे.

भाग्यश्रीच्या नशिबात इनामदारांची सून होणं लिहिलेलच होतं म्हणून तिची भेट दुष्यंतशी झाली आणि ते अपघाताने लग्नबंधनात अडकले. पण लग्नानंतर भाग्यश्रीचं आयुष्य पूर्णतः बदललं. तिला ‘वाहिनीसाहेब’ हा मान मिळाला. ज्यामुळे भाग्यश्रीला वाहिनीसाहेब हा मान मिळाला त्या सोन्याच्या पावलांचा आणि भाग्यश्रीचा काय संबंध आहे ? इनामदार घराण्यातील वडीलोपार्जित सोन्याची पावलं याचं काय रहस्य आहे या पावलांच्या पुण्याईवर दुष्यंतचा मुळीच विश्वास नाहीये. भाग्यश्रीचे दैव आणि दुष्यंतचा त्यावरील अविश्वास यामध्ये कोण खरं ठरेल ?

या कथेची निर्मिती ‘पर्पल मॉर्निंग मुव्हीजने केली आहे. 

मालिकेच्या निर्मात्या श्रावणी देवधर म्हणाल्या, “आपण सगळेच जवळपास दीड वर्षापासून अत्यंत कठीण परिस्थितिला तोंड देतो आहे. पण मनोरंजनसृष्टी काही थांबलेली नाही. रसिक प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीचे आणि उत्तम विषय देण्याचा आमचा नेहेमी प्रयत्न असतो. कलर्स मराठीवर सुरू होणार्‍या ‘सोन्याची पावलं’ या नवीन मालिकेसाठी आमची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेत आहे. ही मालिका माझ्या विशेष जवळची आहे. या मालिकेनिमित्त माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट घडते आहेमाझी लेक सई देखील या मालिकेचा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. याआधी बरेचसे प्रोजेक्टस प्रोड्यूस केले, पण मालिका करण्याची ही आमची पहिलीच वेळ आहे. मालिकेविषयी सांगायचं झालं तर, मालिकेचा विषय अत्यंत वेगळा आहे. ही भाग्यश्री आणि दुष्यंत यांची प्रेमकथा आहे. यांच्या कहाणीची सुरुवातच मुळात अपघाताने होते. भाग्यश्री सोन पावलांनी इनामदारांच्या घरी येते आणि मग तिचा खरा लढा सुरू होतो. यामध्ये तिला दुष्यंतची साथ मिळेल ? त्यांच्या नात्यात प्रेमाचा ओलावा येईल या दोघांचा हा प्रवास बघायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल”.

हेही वाचा- ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत कश्यप परुळेकर साकारणार नेतोजी पालकर

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.