आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

On January 23, 2022 at 12 noon And evening 6. 00 pm. The Marathi movie ‘Vijeta’ will be aired on Zee Talkies. मैदानात जिद्दीने उतरलेल्या खेळाडूंवर आधारित विजेता हा चित्रपट पाहण्याची संधी ‘झी टॉकीज’ आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. येत्या रविवारी, २३ जानेवारी, २०२२ रोजी दुपारी १२०० वाआणि सायं०० वा. विजेता हा चित्रपट झी टॉकीजवर प्रसारित होणार आहे. 

बॉलिवूडचे शोमॅन सुभाष घई प्रस्तुत आणि अमोल शेटगे दिग्दर्शित विजेता‘ हा चित्रपट नॅशनल अॅथलीट्सवर प्रकाश टाकतो. गावखेड्यांमधून येणाऱ्या या खेळाडूंचे मनोबल वाढवत देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या महाराष्ट्र स्पोर्ट्स अकॅडमीची गोष्ट सांगणारी ही कथा अत्यंत प्रेरणादायी आहे. दर्जेदार कलाकारांच्या अभिनयाची जणू जुगलबंदीच विजेता चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. सुबोध भावे, पूजा सावंत, सुशांत शेलार, माधव देवचक्के, प्रीतम कागणे, मानसी कुलकर्णी, तन्वी किशोर, देवेंद्र चौगुले, दिप्ती धोत्रे, कृतिका तुळसकर आणि गौरीश शिपुरकर ह्या कलाकारांची दमदार फळी ‘विजेता’ चित्रपटात आहे.

टेलिव्हिजन जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment