करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शंसने स्टील अँड स्टील मिडीया यांच्यासोबत मिळून सी. शंकरन नायर यांच्या अनटोल्ड स्टोरीवर आधारित सिनेमा बनविण्याचं ठरवलं असून त्यांनी त्याची तयारीही सुरु केली आहे. (Dharma Productions Bringing the untold story of C. Sankaran Nair to the big screens) 

जालियनवाला बाग हत्याकांडातील सत्य उलगडण्यासाठी शंकर नायर यांनी ब्रिटीश राजविरूद्ध लढाई केली होती. शंकर नायर यांच्या शौर्याने देशभरातील स्वातंत्र्यलढ्याला प्रजोलित केले होते आणि हा सत्यासाठी लढा देण्याच्या शक्तीचा दाखला आहे.

हा चित्रपट वास्तविक जीवनातील घटनांपासून प्रेरित आहे आणि रघु पलट (शंकर नायर यांचे नातू) आणि त्यांची पत्नी पुष्पा पलट यांनी लिहिलेल्या “द केस दॅट शॉक द एम्पायर” पुस्तकातून रूपांतरित केला आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन करण सिंग त्यागी करणार आहेत आणि लवकरच फ्लोरवर जाईल. लीड कास्ट ची माहिती लवकरच जाहीर होईल.

करमणूक जगतातील अधिक बातम्यांसाठी क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.