स्टार प्रवाहवर  ‘जय भवानी जय शिवाजी’ (Jay Bhavani Jay Shivaji on Star Pravah) ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या  शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी मालिका आहे. या ऐतिहासिक मालिकेत अभिनेता कश्यप परुळेकर नेतोजी पालकरांची भूमिका साकारणार आहे. नेतोजी पालकर (Kashyap Parulekar as Netaji Palkar) हे स्वराज्याच्या लढ्यातलं एक महत्त्वपूर्ण नाव. त्यांना प्रतिशिवाजी असं देखिल म्हण्टलं जायचं. स्वराज्याच्या हितासाठी आणि शिवरायांवर असलेल्या निष्ठेपायी त्यांनी शत्रुच्या गोठात राहणं देखिल स्वीकारलं. अश्या या शूरवीराची भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्य आहे अशी प्रतिक्रिया अभिनेता कश्यप परुळेकर याने व्यक्त केली.

स्टार प्रवाहच्या या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगतान कश्यप म्हणाला, ‘स्टार प्रवाहसोबत खूप जुनं नातं आहे. अगदी मन उधाण वाऱ्याचे मालिकेपासून सुरु झालेला हा प्रवास अविरत सुरुच आहे. या मालिकेसाठी जेव्हा विचारणा झाली तेव्हा मी लगेच होकार दिला. एकतर मालिकेची कल्पनाच फार वेगळी आहे. शिवरायांच्या शिलेदारांची गोष्ट मालिकेतून भेटीला येणार आहे. त्यामुळे नेतोजी पालकर साकारणं माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक आहे. मी याआधी एक ऐतिहासिक सिनेमा केला आहे. त्यामुळे तलवारबाजी आणि घोडेस्वारी याच प्रशिक्षण घेतलं होतं ज्याचा फायदा नेतोजी साकारताना होतो आहे. या भूमिकेसाठी लागणारा फिटनेस, एनर्जी, लवचिकता यावर मी मेहनत घेतोच आहे. सोबतच भाषेवरही मी विशेष लक्ष देतो आहे. नेतोजी साकारण्यासाठी घाटावरची भाषा आणि त्या भाषेचा लहेजा आत्मसात करतो आहे. एक अभिनेता म्हणून या भूमिकेतून मी संपन्न होतोय असं म्हण्टलं तरी चालेल.’ 

हेही वाचा- सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत साकारणार बाजीप्रभू देशपांडे

Website | + posts

Leave a comment