आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Waheeda Rehman to get this year’s Dadasaheb Phalke Award

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना यंदाचा भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी दिली.

भारतातील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी  एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वहिदा रेहमान ‘प्यासा’, ‘सीआयडी’, ‘गाइड’, ‘कागज के फूल’, ‘खामोशी’ आणि ‘त्रिशूल’ अशा अनेक चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत.

ठाकूर यांनी ही घोषणा करण्यासाठी त्यांच्या अधिकृत X खात्यावर म्हटले आहे की – “वहिदा रहमान जी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल या वर्षी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याची घोषणा करताना मला खूप आनंद आणि सन्मानाची भावना आहे,”

८५ वर्षीय वहिदा यांनी १९५५ मध्ये ‘रोजुलु मरायी’ आणि ‘जयसिम्हा’ या तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी १९५६ मध्ये देव आनंद यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘सीआयडी’ चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

पाच दशकांच्या कारकिर्दीत, या दिग्गज अभिनेत्रीने अनेक भाषांमधील ९० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

‘रेश्मा आणि शेरा’ (१९७१) मधील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्या आधीच पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराच्या मानकरी आहेत.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment