गेल्या वर्षीचा लॉकडाऊन आपण सर्वांनी अनुभवला आणि यंदाचा लॉकडाऊन देखील अनुभवतोय. लॉकडाऊनमध्ये आपण काय करू शकतो तर आपण घराबाहेर न पडता स्वतःची काळजी आणि इतरांची काळजी घेऊ शकतो. घरी बसल्या आपल्याला आवडेल त्या गोष्टी करून आपलं मन गुंतवून ठेवू शकतो. अनेक ठिकाणी कामांना पुन्हा ब्रेक लागला आहे. वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यामुळे पुन्हा अनेकांना घरून काम  करावे लागतेय त्यामुळे ‘जग थांबलंय’ ही भावना पुन्हा एकदा बऱ्याच जणांच्या मनात सतत येतेय हे सोशल मीडियावरून लक्षात येते. यासाठी एकच उपाय म्हणजे ‘संयम’. सर्व काही सुरळीतपणे पुन्हा सुरू होईल असा विश्वास बाळगा, असं अभिनेत्री मोनालिसा बागल सांगतेय. (Actress Monalisa Bagal’s New Fit and Fine Look)

 

सिनेमाचे शूटिंग सुरू झाले होते, नवीन वर्षाची नवी उमेद मिळाली होती आणि असं असताना सिनेसृष्टीला देखील ब्रेक लागला. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा मोनालिसा बागलने पुरेपूर वापर केला, स्वतःला वेळ दिला आरोग्याची काळजी घेतली. नवीन वर्षात सर्वकाही सुरळीत चालू होते, त्यावेळी तिने वजन कमी करण्याकडे विशेष लक्ष दिले. एका सिनेमासाठी ती वजन कमी करत होती आणि पुन्हा लॉकडाऊन आला… पण आता मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत, फिटनेसकडे पूर्णपणे लक्ष देत, योग्य डाएट करून मोनालिसा कमी केलेले वजन तसेच मेन्टेन करण्याकडे विशेष लक्ष देतेय.

 

Monalisa Bagal's fit and fine look

 

मोनालिसा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. मध्यंतरी तिच्या फोटोंवरून, इंस्टाग्राम रिल्सवरून तिचा Fit & Fine  लूक तिच्या चाहत्यांच्या लक्षात आला होता.  वजन कमी केल्या नंतरचे नवीन स्टायलिश आणि ट्रेडिशनल फोटो मोनालिसाने शेअर केले होते. अर्थात, तिचे नवीन फोटोज् आणि तिच्या या नवीन लूक साठी त्यांनी तिचे कौतुक केले.

पाहा मोनालिसाचे नवीन फोटो:- 

 

View this post on Instagram

 

A post shared by Monalisa Bagal (@monalisabagal)

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.