हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विश्वमोहन बडोला यांचे वयाच्या ८५  व्या वर्षी निधन झाले. ते पन्नास वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये कार्यरत होते. सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विश्वमोहन बडोला यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता वरुण बडोलाची पत्नी राजेश्वरी सचदेव यांनी दिली आहे. यानंतर वरुण बडोला यांनी स्वत: विश्वमोहन बडोलासाठी सोशल मीडियावर एक भावस्पर्शी पोस्ट लिहून आपल्या वडिलांना शेवटची श्रद्धांजली वाहिली.

ते एक गायक आणि पत्रकार देखील होते. विश्वमोहन म्हणजेच व्हीएम वडोला यांनी आपले संपूर्ण आयुष्य कलेसाठी समर्पित केले होते. ते नाट्यक्षेत्रातही सक्रिय होते. त्यांनी ऑल इंडिया रेडिओसाठी सुमारे ४०० नाटकांमध्ये काम केले. अभिनेता म्हणून, जोधा अकबर, मुन्ना भाई एमबीबीएस यासह अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्येही ते दिसले. त्यांनी शेवटचे मनोज बाजपेयी आणि तब्बूच्या ‘मिसिंग’ चित्रपटात काम केले होते.

Website | + posts

Leave a comment