सुपरहिट केजीएफ च्या निर्मात्यांनी आज अभिनेता प्रभास च्या प्रमुख भूमिकेत  ‘सलार’ नावाच्या  बहुभाषिक सिनेमाची घोषणा केली आहे. आज सोशल मीडियावर या सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले. राखाडी म्हणजेच ग्रे रंगाच्या वेगवेगळ्या शेड्स मध्ये असलेल्या या पोस्टर मध्ये प्रभास आपल्या सोबत मोठी रायफल घेऊन बसलेला दाखवलेला आहे. “The Most Violent Men…Called One Man…The Most Violent,” ही सिनेमाची टॅग लाईन आहे.

‘रॉकिंग स्टार’ यश अभिनीत आणि प्रशांत नील दिग्दर्शित, २०१८ चा कन्नड ब्लॉकबस्टर ‘केजीएफ: चॅप्टर १’ नंतर होम्बाले फिल्म्सने आज दुपारी ठीक २ वाजून ९ मिनिटांनी या सिनेमाची घोषणा केली. ‘सलार’ नावाच्या या चित्रपटामध्ये प्रभास मुख्य भूमिकेत असून, लॉकडाऊन दरम्यान त्याने केलेली ही तिसरी मोठी घोषणा आहे. पोस्टरमध्ये विजय किरंगदूर आणि प्रशांत नील यांची नावेही आहेत. प्रभासचा राधे श्याम हादेखील पुढील वर्षी रिलीज होणारा मोठा सिनेमा आहे. 

Website | + posts

Leave a comment