ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री (Actor Surekha Sikri) यांचे शुक्रवारी सकाळी वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले आहे. माध्यमांना दिलेल्या निवेदनात त्यांच्या प्रतिनिधीने सांगितले आहे की,सुरेखा सिक्री या दुसऱ्या ब्रेन स्ट्रोक मुळे उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे आजारी होत्या. (Actor Surekha Sikri dies at 75 due to cardiac arrest) 

त्यांचे प्रतिनिधी अभिनेता विवेक सिधवानी यावेळी म्हणाले की, “तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे आज वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. दुसऱ्या ब्रेन स्ट्रोकमुळे उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे त्या आजारी होत्या. त्यांचे कुटुंबीय सध्या त्यांच्या सोबत आहेत. ओम साई राम”

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सिक्री यांना ब्रेन स्ट्रोक आला होता परंतु काही दिवसांनी त्या यातून बाहेर आल्या होत्या. उत्तर प्रदेशात जन्मलेल्या सुरेखा यांनी  आपले बालपण अल्मोडा आणि नैनितालमध्ये घालवले. नंतर त्यांनी  अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून शिक्षण घेतले. यानंतर त्या दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये दाखल झाल्या सुरेखा यांना १९८९ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला आहे. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सिक्री “तमस”, “मम्मो”, “सलीम लंगडे पे मत  रो”, “झुबेदा”, “बधाई हो” आणि टीव्ही मालिका “बालिका वधू” मधील अभिनयांसाठी प्रख्यात होत्या.  त्यांच्या पश्चात मुलगा राहुल सिक्री आहे. सुरेखा सिक्री अखेरीस नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या घोस्ट स्टोरीज या चित्रपटात दिसल्या होत्या.

Surekha Sikri while receiving National Film Award for Best Supporting Actress for Badhaai Ho (2018).

सुरेखा सिक्री यांचे वडील हवाई दलात होते आणि आई शिक्षिका होती. त्यांचे लग्न हेमंत रेगे याच्याशी झाले होते ज्यांचा मुलगा राहुल सिक्री आहे. राहुल सिक्री हा एक कलाकार आहे. अभिनेता नसीरुद्दीन शाह सुरेखा सिक्रीची मेहुणे आहेत. सुरेखा यांची बहीण मनारा सिक्री सोबत  नसीरुद्दीन शहा यांचे पहिले लग्न झाले होते. सुरेखा सिक्री यांनी बालिका वधूमध्ये दादी सा ​​(कल्याणी देवी धरमवीर सिंग) ची भूमिका साकारली होती, जी रसिकांना खूपच आवडली होती. ही मालिका २००८ ते २०१६ या काळात प्रसारित झाली होती. याशिवाय परदेस में है मेरा दिल, सीआईडी, सात फेरे, बनेगी अपनी बात यासारख्या अनेक मालिकांमध्ये तिने आजीच्या संस्मरणीय भूमिका केल्या. 

 

बॉलिवूडमधील अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.