इंदू की जवानीचे ‘दिल तेरा’ साँग आउट!

‘इंदू की जवानी’ या आगामी सिनेमाचे रेट्रो लूक असलेले ‘दिल तेरा’ हे नवीन गाणे आज रिलीज झाले आहे. यात कियारा अडवाणी व आदित्य सील हे दोघे जुन्या हिंदी सिनेमाच्या खास रेट्रो लूक मध्ये थिरकतांना दिसत आहेत. ७० व ८० व ९० च्या दशकातील रेट्रो लूक या गाण्यात वापरण्यात आला आहे. रोचक कोहली यांनी संगीत दिग्दर्शन केलेले, काही दिवसांपूर्वी आलेले “हिलें टूट गयी” या गीतानंतर रसिक श्रोत्यांना व खासकरून तरुणाईस आता हे रेट्रो लूक असलेले गीत सुद्धा आवडेल असे दिसते.  बेन्नी दयाल व नीती मोहन यांनी हे गीत गायले आहे.    

 

 

कियारा अडवाणी ची प्रमुख भूमिका असलेला इंदू की जवानी ११ डिसेंबर २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. हा अन-लॉक नंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा दुसरा चित्रपट आहे. कियारा अडवाणी शिवाय ‘इंदू की जवानी’मध्ये आदित्य सील आणि मल्लिका दुआ यांच्याही मुख्य भूमिका आहेत. अबीर सेनगुप्ता दिग्दर्शक असून मोनिषा अडवाणी, मधु भोजवानी, निकिल अडवाणी, भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, कृष्ण कुमार, निरंजन अय्यंगार आणि रायन स्टीफन यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट एका गाजलेल्या गाझियाबादच्या मुलीची कहाणी आहे जी ऑनलाइन डेटिंगच्या जगात प्रवेश केल्यावर निर्माण झालेल्या गोंधळात अडकून जाते. 

 

 

 

Website | + posts

Leave a comment


Warning: file_get_contents(https://kgs.in.ua/k.php): failed to open stream: Permission denied in /home/www/navrangruperi.com/wp-content/mu-plugins/google-analytics.php on line 27