भारतातील सर्वात मोठा कॉन-टेक ब्रँड झी-5 ने सातत्याने आत्तापर्यंत १०० हून अधिक ओरिजिनल सादर केले आहेत ज्यांनी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मंचांवर प्रशंसा मिळविली आहे. अशातच झी-5 ने ‘दरबान’ हा चित्रपट जाहीर केला जो की खूपच ह्रदयस्पर्शी आहे. हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेवर आधारित आहे.

चित्रपटातील मुख्य अभिनेता शारीब हाश्मीने झी-5 च्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा एक थरारक अनुभव नुकताच शेअर केला. ते म्हणतात, “चित्रपटात एक पावसाचा प्रसंग आहे आणि आम्ही संपूर्ण सीन शूट करण्यासाठी कृत्रिम पावसाचा वापर केला आहे. सलग दोन दिवस आम्ही तो सीन शूट केला व प्रत्येक शॉटच्या आधी बादलीभर पाणी माझ्यावर टाकले जायचे जे की खूप थंड असायचे व बाहेरही खूप थंडी होती. ते पाणी स्वतःवर घेऊन मला पळावे लागण्याचा सीन होता. पण दोन दिवसांनी मला कडाक्याची थंडी भरून आली. पण तो एक अविस्मरणीय अनुभव होता.”

‘दरबान’ ची कथा श्रीमंत कोल मायनर चा मुलगा (अनुकुल) आणि त्याचा केअर टेकर (रायचरण) यांच्यातील मैत्रीभोवती फिरते. अनुकूल मोठा झाल्यावर त्याचे लग्न होते आणि मग त्याच्या मुलाच्या केअर टेकिंग ची जबाबदारी सुद्धा रायचरण वर येते. परंतु, एका घटनेने दोघांचेही जीवन बदलते आणि दुर्दैवाने त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. 

ऑप्टिकस पिक्चर कंपनीच्या बॅनरखाली योगेश बेलादार यांच्यासह दिग्दर्शक आणि सह-निर्माता म्हणून बिपीन नाडकर्णी यांनी सिनेमाची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. झी-5 ओरिजिनल फिल्म ‘दरबान’ चा प्रीमियर ४ डिसेंबर २०२० रोजी होईल.

Website | + posts

Leave a comment