आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Entertaining trailer of Marathi Movie ‘Aflatoon’ released

‘तीन तिघाडा काम बिघाडा’ ही म्हण खोटी ठरवत तीन जीवलग मित्र एक केस कशी ‘अफलातून’ रीत्या हाताळतात  याची धमाल दाखविणारा ‘अफलातून’ हा मराठी चित्रपट २१ जुलैला प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालाय. तत्पूर्वी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच कलाकार, तंत्रज्ञयांच्या उपस्थितीत  दिमाखदार कार्यक्रमात प्रकाशित झाला. लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. साहा अँडसन्स स्टुडिओज, आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणि राजीव कुमार साहा चित्रपटाचे निर्माते आहेत. ग्रुप एम मोशन एंटरटेन्मेन्ट, अवधूत डिस्ट्रिब्युटर आणि स्वर्ण पट कथा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अफलातून’ चित्रपटाचीसहनिर्मिती करण्यात आली आहे.

तीन मित्रांची धमाल केमिस्ट्री ट्रेलर मध्ये दिसून येतेय.त्यासोबत इतर पात्रांचा मजेशीर अंदाजही पहायला मिळतोय. प्रेक्षकांचं फूल्ल टू मनोरंजन करणारा हा चित्रपट असून ‘अफलातून’ मज्जा घ्यायची असेलतर चित्रपट नक्की बघा असं चित्रपटातील कलाकारांनी यावेळी आवर्जून सांगितलं. प्रत्येक कलाकाराच्या सळसळत्या ऊर्जेचं दर्शन ‘अफलातून’ चित्रपटातून दिसणार आहे.

श्री, आदि आणि मानव या तीन डिटेक्टिव्ह मित्रांची ही गोष्ट असून फसवल्या गेलेल्या दुर्देवी मारिया नावाच्या मुलीला मदत करण्याचा विडा हे तिघे उचलतात. ही मदत करताना येणाऱ्या अडचणीवर ते कसे मात करतात? याची रंजक कथा ‘अफलातून’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, जेसी लिव्हर, विष्णू मेहरा रेशम टिपणीस, अशी कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आहेत.

‘अफलातून’ चित्रपटाची कथा-पटकथा परितोष पेंटर यांची असून संवाद संदीप दंडवते यांचे आहेत.  छायांकन सुरेश देशमाने तर संकलन सर्वेश परब याचे आहे. मंदार चोळकर याने लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचे स्वरसाज लाभला आहे. संगीताची जबाबदारी संगीतकार कश्यप सोमपुरा यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत कश्यप सोमपुरा आणि मलिक वार्सीयांचे आहे.  ‘अफलातून’ २१ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment