आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Actress Madhura Velankar’s “Madhurav – Boru Te Blog” now on theaters. ‘मधुरव – बोरू ते ब्लॉग’ हा कार्यक्रम रंगमंचावर येण्यासाठी सज्ज झाला असून येत्या ३ डिसेंबरला या कार्यक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग शिवाजी मंदिर, दादर येथे संपन्न होणार आहे.

तथाकथित लेखक नसलेले पण लिखाणातून व्यक्त होणारे तुमच्यातले (प्रेक्षकांमधले) काही निवडक लेखक त्यांना रंगमंचावर बोलवून त्यांच्या लिखाणाचे सादरीकरण करणे.  त्यांच्याशी  तसेच प्रेक्षागृहातल्या प्रेक्षकांशी संवाद ,प्रश्नमंजुषा- भेटवस्तू असा परस्पर संवादाचा गंमतशीर प्रवाही असा हा कार्यक्रम. दोन तास हसत-खेळत मनोरंजन आणि प्रबोधन, तसंच साहित्याच्या जवळ नेणारा नवनिर्मित, अभिनव आणि पूर्वी न अनुभवलेला, आणि अनेक उत्तम कलाकार आणि तंत्रंज्ञ यांनी रंगलेला नटलेला असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. 

“मधुरव – बोरू ते ब्लॉग’  ह्या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती आणि दिग्दर्शन अशी तिहेरी भूमिका अभिनेत्री मधुरा वेलणकर पार पाडणार आहे. सदर कार्यक्रमाचे संशोधन लेखन डॉ. समीरा गुजर जोशी यांचे असून नृत्य दिग्दर्शन सोनिया परचुरे, प्रकाशयोजना शीतल तळपदे, नेपथ्य प्रदीप पाटील, पार्श्वसंगीत श्रीनाथ म्हात्रे, वेशभूषा श्वेता बापट, शीर्षकगीत संगीत ह्रुषिकेश रानडे, पार्श्वगायन ह्रुषिकेश रानडे, प्राजक्ता रानडे, अर्चना गोरे यांचे आहे. कलाकार म्हणून अभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्यासोबत तरुण पिढीतील नवोदित कलाकार आशिष गाडे आणि आकांक्षा गाडे, जुई भागवत आणि श्रीनाथ म्हात्रे रसिकांच्या भेटीला येणार आहेत. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment